फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स’च्या वतीने मानसिक आरोग्यविषयक संवादाला वाचा फोडण्याचे आवाहन, सर्जनशील व्हीडीओमालिका लॉन्च

  

 

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स’च्या वतीने मानसिक आरोग्यविषयक संवादाला वाचा फोडण्याचे आवाहन, सर्जनशील व्हीडीओमालिका लॉन्च


आपला भावनिक तणावाचा भार एखाद्या निर्जीव वस्तूवर काढणे हे मानसिक आजाराचे प्रारंभिक लक्षण असते


मुंबई, 21 जानेवारी, 2021: मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायक संवादाची सुरुवात करण्याकरिता वचनबद्ध असलेल्या फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय)च्या वतीने व्हीडीओ मालिका तयार करण्यात आली. मनातील राग एखाद्या निर्जीव वस्तूवर काढणे हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते हे या व्हीडीओंमधून रेखाटण्यात आले आहे. हाउपक्रम त्यांच्या #HealthInsideOut कॅम्पेनचा दुसरा टप्पा आहे. मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या, मात्र जाणीव नसलेल्या विकाराविषयी सजगता निर्माण करण्याचा आहे. याला बळी पडलेल्या व्यक्ती एखाद्या निर्जीव वस्तूवरमनातील सगळा राग काढतात आणि जेव्हा त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला इजा पोहोचते, त्यावेळी भावनिक अस्थिरतेचा सामना पीडितांना करावा लागतो. प्रत्येकाने अशा लक्षणांकडे सजगतेने पाहावे, आपल्या मानसिक आरोग्याचा लोकांनी गांभीर्याने विचार करावा. या दिशेने प्रोत्साहित करणारे हे डिजीटल कॅम्पेन एफजीआयआय’ने तयार केले आहे.

 

या कॅम्पेनकरिता तयार करण्यात आलेल्या विविध व्हीडीओंमध्ये उदास उशी, अर्धा फाटलेला स्ट्रेस बॉल तसेच अर्धवट भग्न अवस्थेतील फुलदाणी आपल्या मालकाच्या रागाबद्दल तक्रार करताना दिसतात. हिंसात्मक रोष, सतत मन:स्थितीत होणारा  बदल, राग, तणाव, चिंता, भूकेत झालेले बदल, खिन्नता, निद्रानाश तसेच सातत्याने रडत राहणे या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज हे व्हीडीओ सरतेशेवटी अधोरेखित करतात.

 

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सच्या सीएमओ रुचिका वर्मा सांगतात की, “सध्या भारतातील 7.5% हून अधिक लोकसंख्येला मानसिक आजाराचा सामना करावा लागतो. वर्षाखेरीज हा आकडा 20% पर्यंत वाढण्याचा डब्ल्यूएचओ’चा अंदाज आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही भारतात मानसिक विकाराकडे मोकळ्या मनाने पाहिले जात नाही; आपण आजारग्रस्त असल्याची जाणीव फार थोड्या लोकांना असते आणि अगदी क्षुल्लक व्यक्ती याविषयी साह्य घेतात. हा ब्रँड कल्पकता तसेच सहानुभूतीकरिता ओळखला जातो. भारतीयांनी मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्यासाठी ही चळवळ उभारण्यात येते आहे. पहिल्या टप्प्यात, आम्ही लोकांना मानसिक आरोग्य तपासण्यासाठी मोजमापाचे साधन, टोटल हेल्थ स्कोअर दिले. हे कॅम्पेन पहिल्या टप्प्यावर उभारलेले असून एखाद्या विकारग्रस्त मात्र सजग नसणाऱ्यांमध्ये जागरुकता आणण्याचा उद्देश आहे. 

 

मानसिक अनारोग्य असल्यास त्याचा रोष निर्जीव वस्तूंवर निघत असल्याचे आम्हाला मानसिक आरोग्य तज्ज्ञ व पीडित व्यक्तिंसमवेत झालेल्या विविध संभाषणांदरम्यान जाणवले. या कॅम्पेनच्या आधारे अशा वस्तूंना मानवी रुप देऊन वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्यवेळी साह्य घेण्याचे आवाहन या कॅम्पेनमधून करण्यात आले, असेही रुचिका वर्मा पुढे म्हणाल्या.

 

वंडरलॅबचे सह-संस्थापक आणि मुख्य क्रिएटीव्ह ऑफिसर अमित अकाली म्हणाले की, “संपूर्ण भारताला हा विकार अमान्य आहे. मानसिक विकार असतात, हा विचार आपल्या लेखी नसतोच. त्यामुळेच त्याची लक्षणे तसेच संकेतांची माहिती आपल्याला नसते. आपल्या मनात असलेला राग साचून राहतो. आयुष्यातला एक वाईट दिवस यापलीकडे त्याचा विचार आपण करत नाही.  त्यामुळे दरदिवशी आपल्या वागणुकीतून उमटणाऱ्या वर्तनाचा खोलवर वेध घ्या, स्वत:ची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोकांना केवळ जागरूक करण्याचा नव्हे, तर त्यांना लक्षणांची माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेकदा मनातील रागाचा भार निर्जीव वस्तूंवर निघतो, त्यांना बोलके करून व्यथेला मोकळीक करून देण्याची कल्पना आम्हाला सुचली. हुशार ई सुरेश आणि ईकासौरस स्टुडिओने संकल्पनेला मूर्त रूप आणले. स्ट्रेस बॉल किंवा फुलदाणी मनमोकळे करते, कोणत्याही स्पेशल इफेक्ट अथवा कम्प्युटर ग्राफिकशिवाय दोन महिन्यांच्या स्टॉप-मोशनवर अथक, प्रसंगी वेदना सोसत हे जगातील अशास्वरुपाचे पहिले कॅम्पेन तयार झाले.”

 

व्हीडीओ लिंक :

उशी - https://youtu.be/hYeUqON3PhU

स्ट्रेस बॉल - https://youtu.be/q5_lhKj7BCk

फुलदाणी - https://youtu.be/7ZYzpcSc9dw


फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडबद्दल

फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ही भारतीय रिटेल विश्वातील गेम चेंजर ठरलेल्या फ्युचर ग्रुप व जगभरातील 60 सर्वोत्तम कंपन्यांमधील 189 वर्षे जुनी जागतिक विमा कंपनी- जनरालीची संयुक्त सहयोगी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना सप्टेंबर 2007मध्ये झाली. या माध्यमातून रिटेल, व्यापारी, वैयक्तिक आणि ग्रामीण विमा पर्याय व्यक्ती आणि कॉर्पोरेटसना पुरवले जातात. ज्यामुळे त्यांना जोखमीचे व्यवस्थापन आणि ती दूर करण्यात मदत मिळेल.

 

फ्युचर जनराली इंडियाला जनराली समूह आणि भारतीय रिटेल गेम चेंजर फ्युचर ग्रुपच्या वैविध्यपूर्ण उत्पादनात असलेल्या जागतिक विमा प्रविण्याचा लाभ मिळतो आहे. त्यांनी या सेगमेंटमध्ये आपला मजबूत ठसा उमटवला असून दोन्ही संयुक्त भागीदारांच्या कौशल्याचा उपयोग करून घेताना दिसतो. ज्यामुळे फ्युचर जनराली इंडिया ही एक टोटल इन्श्युरन्स सोल्युशन कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे.

 

* फॉर्च्यून ग्लोबल 500 क्रमवारी (2017)अनुसार

*फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणित आहे (डिसेंबर 2019-नोव्हेंबर 2020)

 

जनराली ग्रुपबद्दल

जनराली हा स्वतंत्र इटालियन इन्शुरन्स समूह असून त्याचे मजबूत आंतरराष्ट्रीय अस्तित्व आहे. 1831 मध्ये स्थापन झालेला हा एक सर्वात मोठा जागतिक विमा पुरवठादार असून त्याचे अस्तित्व 60 पेक्षा अधिक देशांमध्ये पाहायला मिळते. 2017 पर्यंत या समुहाचे एकूण प्रीमियम उत्पन्न €68 बिलियनहून अधिक आहे. जगभर जवळपास 71,000 कर्मचारी आणि 57 मिलियन ग्राहक लाभलेला हा समूह पश्चिम युरोपात सर्वोच्च स्थानावर असून मध्य आणि पूर्व युरोपसह आशियातील संचारही लक्षणीय दिसतो.

 


 


 

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24