रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे, शस्त्रक्रिया आणि एकदिवसीय उपचारासांसाठी एकरकमी रक्कम मिळावी यासाठी हॉस्पि केअर पॉलिसी सादर

 रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फेशस्त्रक्रिया आणि एकदिवसीय उपचारासांसाठी एकरकमी रक्कम मिळावी यासाठी हॉस्पि केअर पॉलिसी सादर

 

मुंबई२२ जानेवारी, २०२१ : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स या रिलायन्स कॅपिटलच्या १००% उपकंपनीतर्फे हॉस्पि केअर पॉलिसी सादर करण्यात आली. हे एक हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिट प्रोडक्ट असून या पॉलिसीअंतर्गतआजार किंवा अपघातामुळे कराव्या लागणाऱ्या १५०+ सूचिबद्ध शस्त्रक्रिया आणि १४०+ एकदिवसीय उपचारांसाठी एकरकमी रक्कम उपलब्ध करून करण्यात येते. आमच्या रिटेल कस्टमर्सच्या आरोग्यविषयक गरजांसाठी सुरळीतपणे रोख रक्कम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या पॉलिसीची रचना करण्यात आली आहे.

 

या पॉलिसीमध्ये शस्त्रक्रियेसाठी रोख रक्कमहॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान दररोज लागणारी रोख रक्कमएकदिवसीय उपचारांसाठी लागणारी रोख रक्कमइतर शस्त्रक्रियांसाठी लागणारी रोख रक्कम आणि डेंग्यू/मलेरिया/चिकनगुनिया यासाठीचे हॉस्पिटलायझेशन कव्हर करण्यात येते. वैद्यकीय खर्चात होणाऱ्या वाढीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहकांनी या प्रोडक्टची निवड करावी. रिलायन्स हॉस्पि केअरमध्ये पॉलिसीधारक शस्त्रक्रियेनुसार १००% पर्यंत पॉलिसी रकमेचा दावा करू शकतात. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाची आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होते. उदा. जर विमाधारकाने १० लाखांची पॉलिसी घेतली असेलतर हृदय किंवा फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी विम्याची १००% रक्कम देय असतेत्याचप्रमाणे या पॉलिसीच्या स्पेशल फीचरनुसार पॉलिसीधारकाला सूचिबद्ध शस्त्रक्रियांपेक्षा वेगळ्या शस्त्रक्रियांसाठीही संरक्षण मिळते आणि २०,००० पर्यंत एकरकमी रक्कम प्राप्त होते.

 

डेंग्यूमलेरिया आणि चिकनगुनिया या आजारांसाठी ३ दिवसांहून अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर विमाधारकाला २०,००० पर्यंत एकरकमी रक्कम मिळते.

 

या लाँचबद्दल प्रतिक्रिया देताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन म्हणाले, “वर्षागणिक वैद्यकीय खर्चामध्ये वाढ होत आहे आणि ग्राहकांना सर्वंकष व पुरेसे संरक्षण देणाऱ्या आरोग्य विमा पॉलिसी हव्या आहेत. हॉस्पिटलायझेशनसाठी एकरकमी रक्कम देणारी पॉलिसी घेण्याचा ज्या ग्राहकांचा विचार आहेकिंवा हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीत स्वतःच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्या विद्यमान आरोग्य विमा योजनेला पूर योजना ज्या ग्राहकांना हवी असेल त्यांच्यासाठी रिलायन्स हॉस्पिकेअर ही ग्राहकांसाठी फायदेशीर पॉलिसी आहे.

 

रिलायन्स हॉस्पि केअर पॉलिसीमध्ये १ लाख ते १० लाखापर्यंत पॉलिसी घेता येऊ शकते आणि या पॉलिसीचा वार्षिक प्रिमिअम ‘फक्त ,६६९ अधिक कर’ यापासून सुरू होतो.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth