एफसी गोवातर्फे आरबी लिपझिगचा सहयोग लाभलेल्या क्लबच्या नॅशनल सॉकर कॅम्प्स ऑनलाइनचा तपशील जाहीर

 एफसी गोवातर्फे आरबी लिपझिगचा सहयोग लाभलेल्या 

क्लबच्या नॅशनल सॉकर कॅम्प्स ऑनलाइनचा तपशील जाहीर


~ सहभागी बेसिक प्रोग्रॅमचा लाभ मोफत घेऊ शकतात किंवा ॲडव्हान्स्ड प्रशिक्षणासाठी पेड पॅकेजचा पर्याय निवडू शकतात ~

' जानेवारी , 2021: एफसी गोवा यांच्यातर्फे घोषणा करण्यात आली की, आरबी लिपझिगचा सहयोग लाभलेला क्लबचा नॅशनल सॉकर कॅम्प ऑनलाइन प्रोग्रॅम तीन पॅकेजेसच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. ६ त १८ या वयोगटातील मुलांसाठी हा प्रोग्रॅम आखण्यात आला असून सहभागी त्यांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्ये यानुसार तीन पॅकेजपैकी कोणत्याही पॅकेजसाठी नावनोंदणी करता येऊ शकते.

बिगिनर फ्री, बिगिनर स्टँडर्ड आणि बिगिनर मॅक्स अशी तीन पॅकेजेस लॉन्च करण्यात आली आहेत.  

“आरबी लिपझिग यांचा सहयोग लाभालेल्या नॅशनल सॉकर कॅम्प ऑनलाइनचा पुढील टप्पा जाहीर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून दर्जेदार फुटबॉल प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना त्यांची ध्येये साध्य करण्यास मदत मिळणार आहे आणि ऑनलाइन माध्यमामुळे त्यांच्या सुविधेनुसार शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.”, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवि पुस्कर म्हणाले.

देशभरातील फुटबॉल खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधेचा ॲक्सेस मिळेल आणि त्यांना महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकासही होईल, याची खातरजमा आमच्या आरबी लिपझिगसोबत करण्यात आलेल्या भागीदारीने करण्यात येईल.”

आरबी लिपझिग टेक्निकल संचालक क्रिस्तोफर व्हिव्हेल यांनीही एफसी गोवा नॅशनल सॉकर कॅम्प्स ऑनलाइन उपक्रमाची प्रशंसा केली.

“नॅशनल सॉकर कॅम्प्स ऑनलाइन प्रोग्रॅमशी संबंधित असलेल्या सर्वांसाठीच आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आरबी लिपझिगमध्ये आम्ही उद्याचे गुणवंत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि एफसी गोवासोबत केलेल्या भागीदारीने मुलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करून दिली जातील याची खातरजमा करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.”

“या प्रोग्रॅममुळे मुलांचे भविष्य घडविण्यास आणि मुलांना मुक्तपणे अभिव्यक्त होण्याची सुविधा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व सहभागींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

नॅशनल सॉकर कॅम्प ऑनलाइन हे एफसी गोवा आणि आरबी लिपझिग यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे पहिले पाऊल आहे. हा अशा प्रकारचा एकमेव उपक्रम आहे, ज्यात मुलांना त्यांच्या घरूनच फुटबॉलचे बेसिक प्रशिक्षण रचनात्मक पद्धतीने आणि देशातील कोणत्याही कोपऱ्यातून शिकता येईल.

बिगिनर फ्री पॅकेजमध्ये २० ट्रेनिंग व्हिडियो, आरबी लिपझिगच्या प्रशिक्षकांची २ स्पेशल सत्रे आणि दर महिन्याला एक व्हॅल्यू  ॲड सत्र यांचा समावेश आहे. व्हॅल्यू  ॲड सत्रामध्ये आहार, इजा व्यवस्थापन, क्लृप्त्या (टॅक्टिक्स) इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांची सत्रे समाविष्ट असतील. हे पॅकेज मोफत आहे आणि कोणीही यासाठी नोंदणी करू शकेल.

बिगिनर स्टँडर्ड मासिक पॅकेजमध्ये २० ट्रेनिंग व्हिडियो, आरबी लिपझिगच्या प्रशिक्षकांची ६ स्पेशल सत्रे आणि दोन व्हॅल्यू  ॲड सत्रे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षकांशी २ चर्चासत्रे, एफसी गोवाचे खेळाडू व प्रशिक्षकांसोबत २ मास्टरक्लासेस आणि महिन्याभराचा प्रशिक्षण प्लॅन समाविष्ट आहे. या पॅकेजची किंमत दरमहा रु.१७५० आहे आणि यासाठीही नोंदणी सुरू आहे.

शेवटचे आहे ३ महिन्यांचे बिगिनर मॅक्स पॅकेज. यात सहभागीला बिगिनर स्टँडर्ड पॅकेजचे सर्व लाभ मिळतातच, त्याचबरोबर आरबी लिपझिग आणि एफसी गोवा को-ब्रँडेड नॅशनल सॉकर कॅम्प्स जर्सीसुद्धा मिळते. या प्लॅनची किंमत तीन महिन्यांसाठी रु.५२५० आहे आणि यासाठीही नावनोंदणी सुरू आहे.

एफसी गोवा ज्युनियर मेंबर्सना अतिरिक्त १०% सवलत मिळणार आहे. ज्युनिअर मेंबरशिपमुळे मुलांना एफसी गोवाच्या प्लेअर इंटरॅक्शनचा अतुलनीय ॲक्सेस मिळतो, मोफत जर्सी मिळतो आणि अनेक लाभ मिळतात. fcgoa.in/junior या वेबसाइटवर तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

बिगिनर स्टँडर्ड आणि मॅक्स पॅकेजेसमध्ये मर्यादित उपलब्धता आहे, जी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आहे. नॅशनल सॉकर कॅम्प्स ऑनलाइन १५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होणार आहे आणि याची नोंदणी १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.

वर नमूद केलेल्या कोणत्याही पॅकेजसाठी नोंदणी करण्यासाठी या https://soccercamps.fcgoa.in/courses वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या फुटबॉलिंग महत्त्वाकांक्षा साध्य करण्याची संधी मिळवा.


Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.