पॅनासोनिक इंडियातर्फे नोव्‍हेल कोरोनाविषाणूला प्रतिबंध करण्‍यासाठी नॅनो™एक्‍स तंत्रज्ञानाने सुसज्‍ज एअर कंडिशनर्सची नवीन रेंज सादर

पॅनासोनिक इंडियातर्फे नोव्‍हेल कोरोनाविषाणूला

प्रतिबंध करण्‍यासाठी नॅनो™एक्‍स तंत्रज्ञानाने सुसज्‍ज एअर कंडिशनर्सची नवीन रेंज सादर

नवी दिल्‍ली: २८ जानेवारी २०२१: सध्‍याच्‍या महामारीदरम्‍यान सुरक्षित व आरोग्‍यदायी जीवनशैलीच्‍या खात्रीसाठी पॅनासोनिक इंडिया या आघाडीच्‍या वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञान कंपनीने आज नुकतेच सादर करण्‍यात आलेल्या नॅनो™एक्‍स तंत्रज्ञानाने (nanoe™X technology) सक्षम एचयू सिरीज अंतर्गत एअर कंडिशनर्सची नवीन रेंज सादर केली. नॅनो™एक्‍स तंत्रज्ञान पाण्‍यामध्‍ये असलेले हायड्रोक्सिल रॅडिकल्‍स उत्‍सर्जित करते. हायड्रोक्सिल रॅडिकल्‍स 'नेचर्स डिटर्जंट' म्‍हणून देखील ओळखले जातात, ज्‍यांच्‍यामध्‍ये ९९.९९ टक्‍के नोव्‍हेल कोरोनाविषाणूच्‍या (सार्स-कोव्‍ह-२) प्रतिबंधासह जीवाणू व विषाणूंचे प्रतिबंध करण्‍याची क्षमता आहे. पॅनासोनिकने टेक्‍ससेल लॅबोरेटरी, फ्रान्‍स येथे नोव्‍हेल कोरोनाविषाणूवरील (सार्स-कोव्‍ह-२) प्रतिबंधात्‍मक परिणामासाठी नॅनो™एक्‍स डिवाईस, तसेच नॅनो™एक्‍स एअर कंडिशनर्सची यशस्‍वीरित्‍या चाचणी* केली आहे. फाइव्‍ह-स्‍टार इन्‍व्‍हर्टर नॅनो™एक्‍स एअर कंडिशनर्स १-टन व १.५-टन आकारमानामध्‍ये उपलब्‍ध असतील. (CS/CU-HU18XKYF)ची किंमत ६६,००० रूपये असेल. भारतीय ग्राहक लवकरच प्रमुख रिटेल आऊटलेट्स, ऑनलाइन पोर्टल्‍स आणि पॅनासोनिक ब्रॅण्‍ड स्‍टोअर्समध्‍ये पॅनासोनिक एअर कंडिशनर्सच्‍या नवीन रेंजचा अनुभव घेऊ शकतात.


सादरीकरणाप्रसंगी बोलताना पॅनासोनिक इंडिया व साऊथ एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. मनिष शर्मा म्‍हणाले, ''पॅनासोनिक वर्षानुवर्षे ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी उल्‍लेखनीय तंत्रज्ञान विकसित करण्‍याच्‍या संदर्भात अग्रस्‍थानी राहिली आहे. एअर कंडिशनर्सची आमची नवीन रेंज नॅनो™एक्‍स तंत्रज्ञानासह सक्षम आहे, ज्‍यामधून ग्राहकांच्‍या गरजांना अनुसरून उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. पॅनासोनिकने प्रथम टेक्‍ससेल लॅबोरेटरी, फ्रान्‍स येथे नॅनो™एक्‍स डिवाईसची चाचणी केली, जेथे नोव्‍हेल कोरोनाविषाणू प्रतिबंध करण्‍यास यश मिळाले. आम्‍ही पुढे नॅनो™एक्‍स डिवाईस असलेल्‍या पॅनासोनिक एअर कंडिशनरची चाचणी करण्‍याचे आव्‍हान दिले आणि ही चाचणी देखील नोव्‍हेल कोरोनाविषाणूवर (सार्स-कोव्‍ह-२) प्रतिबंध राखण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली.''


पॅनासोनिक इंडियाच्‍या ग्राहक विक्री विभागाचे विभागीय प्रमुख श्री. सुगुरू तकामत्‍सू म्‍हणाले, ''भारतामध्‍ये एअर कंडिशनर्स विभागाचा प्रवेश जगाच्‍या तुलनेत खूपच कमी, म्‍हणजेच जवळपास ५ टक्‍के आहे. यामधून या विभागामध्‍ये संभाव्‍य प्रचंड विकासाची क्षमता दिसून येते. तसेच, खालावत चाललेला हवेचा दर्जा आणि नवीन आजारांच्‍या प्रसारासह ग्राहक आरोग्‍याची अधिक काळजी घेत आहेत. म्‍हणूनच आमच्‍या पॅनासोनिक नॅनो™एक्‍स एअर कंडिशनरच्‍या नवीन रेंजमध्‍ये अ‍ॅलर्जी, जीवाणू, विषाणू, मूस, दुर्गंधी अशी विशिष्‍ट प्रदूषके व घातक घटकांची वाढ नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे, ज्‍यामुळे ग्राहकांची जीवनशैली आरोग्‍यदायी व सुरक्षित राहिल.''


पॅनासोनिक इंडियाच्‍या एअर कंडिशनर्स ग्रुपचे व्‍यवसाय प्रमुख श्री. गौरव शाह म्‍हणाले, ''एअर कंडिशनर उत्‍पादनामधील आमच्‍या ६० वर्षांहून अधिक काळाच्‍या संपन्‍न अनुभवाने आम्‍हाला ग्राहकांच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये मूल्‍याची भर करणारी नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने निर्माण करण्‍यामध्‍ये मदत केली आहे. नॅनो™एक्‍स एअर कंडिशनर्सच्‍या नवीन रेंजमध्‍ये अधिक सुरक्षितता व आरामदायी सुविधेसाठी इको एनएव्‍हीआय, ट्विन कूल आयएनव्‍ही आणि जेटस्ट्रिम तंत्रज्ञान आहे. टेक्‍ससेलमधील प्रयोगशाळेमध्‍ये चाचणी* करण्‍यात आलेल्या नवीन नॅनो™एक्‍स एअर कंडिशनर्समध्‍ये नोव्‍हेल कोरोनाविषाणूवर (सार्स-कोव्‍ह-२) प्रति‍बंधितात्मक परिणाम करण्‍याची क्षमता आहे. या एसींमध्‍ये नॅनो™एक्‍स डिवाईस स्‍थापित करण्‍यात आले आहे, जे एका सेकंदामध्‍ये ४.८ ट्रिलियन हायड्रोक्सिल रॅडिकल्‍स उत्‍सर्जित करते आणि घरातील हवा शुद्ध करत दुर्गंधी दूर करते. हे नॅनो™एक्‍स एअर कंडिशनर्स फॅन मोडमध्‍ये चालू शकतात आणि ऊर्जा कार्यक्षमता व दिवसभर घरातील सुरक्षिततेच्‍या खात्रीसाठी प्रत्‍येकवेळी कम्‍प्रेसर/ एअर कूलिंग वैशिष्‍ट्याची गरज भासत नाही.'' 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202