एंजल ब्रोकिंगने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले
एंजल ब्रोकिंगने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले
मुंबई, २९ जानेवारी २०२१: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊ महिन्यांचे अन-ऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणाम जाहीर केले. कंपनीने एकूण इक्विटी मार्केट शेअरमध्ये वार्षिक स्तरावर मजबूत ३८४ बीपीएसची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा पीबीटी वार्षिक ५% ने वाढून ₹ १,०४५ दशलक्ष झाला आहे.
आर्थिक वर्ष २०२१च्या दुस-या तिमाहीच्या रु. ३१७९ दशलक्षच्या तुलनेत तिस-या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. ३१५६ दशलक्ष झाले आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर ६% कमी टेडिंग दिवस उपलब्ध झाल्याने यात ०.७ टक्क्यांची घसरण झाली. कंपनीने ईबीटीडीएमध्ये ४.८% टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. ते दुस-या तिमाहीच्या रु. १०४३ दशलक्षच्या तुलनेत रु. १०९३ दशलक्ष झाले आहे. आर्थिक वर्ष २०२१च्या तिस-या तिमाहीत कंपनीचे ईबीटीडीए मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या % नुसार) ४९.३% राहिले आहे. कंपनीचा कर पश्चात नफा दुस-या तिमाहीच्या रु. ७४६ दशलक्षच्या तुलनेत मागील वर्षाच्या कर प्रभावामुळे त्रैमासिक -१.८% कमी होऊन तिस-या तिमाहीत रु.७३२ दशलक्ष झाला आहे.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अध्यक्ष व एमडी श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “आमची एकूण ग्राहकांची जोड सलग दुस-या तिमाहीत ५ लाखांच्या पातळीपुढे गेली. यातून आमच्या व्यवसायाची मजबूत प्रगती दिसून येते. एनएसईवर आम्ही चौथ्या क्रमांकावर राहिलो. सक्रिय ग्राहकांच्या बाबतीत सर्वात मोठे व आर्थिक वर्ष २०२१च्या ९ महिन्यात इनक्रिमेंटल एनएसई सक्रिय ग्राहकांमध्ये तिस-या क्रमांकाचे स्थान राहिले. आम्ही व्यवसायासाठी आमचा डिजिटल फर्स्ट दृष्टीकोन वापरत असून तो निरोगी मार्जिन प्रोफाइल व कॉस्ट टूू नेट इन्कम गुणोत्तरात अग्रेसर आहे. वित्तीय गुंतवणूक ही उद्दिष्टे व अपेक्षा पूर्तीसाठी एक आवश्यक उपयुक्त साधन बनले आहे. आमची डिजिटल उत्पादने व प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना सहकार्य करण्यात आम्हाला आनंद वाटतो.'
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले, 'तंत्रज्ञान व उत्पादनाच्या विकासात आमची सुरू असलेली गुंतवणूक जी मप्रामुख्याने ग्राहकांचा अनुभव वाढवण्यावर भर देते, तीच आमच्या वृद्धीचे कारण आहे. आमच्या पूर्णत: डिजिटल बिझनेस मॉडेलने सस्पर्धात्मक व वाढत्या बाजारातील वाटा सहजपणे वाढवला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेच आमची एकूण एडिटिओ व एफअँडओ एडिटिओ लक्षणीयरित्या वाढली आहे. नवे मार्जिन नियामक लागू केल्यामुळे कॅश एडिटिओ कमी झाला होता, तथापि, नवीन नियमानंतरही एकूण व्हॉल्यूमची वृद्धी कायम राहिली. कृत्रिम बुद्धीमत्ता वमसीन लर्निंगच्या मदतीने आम्ही नियमितपणे ग्राहकांसोबत राहतो. स्टॉक, उत्पादने, अॅडव्हायजरी प्लॅटफॉर्म, शैक्षणिक व्हिडिओ इत्यादींच्या बातम्यांनुसार त्यांना अपडेट ठेवत सजग ठेवतो. आमच्या डिजिटल फर्स्ट व ग्राहक केंद्रित दृष्टीकोनाद्वारे आमच्या वृद्धीत भर घालतच राहू.'
Comments
Post a Comment