भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत; सेन्सेक्स २४७ अंकांनी वधारला

 भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत; सेन्सेक्स २४७ अंकांनी वधारला


मुंबई, १२ जानेवारी २०२१: पीएसयू बँक आणि ऑटो स्टॉक्सच्या नेतृत्वात बेंचमार्क निर्देशांकांनीनिफ्टी ०.५४% किंवा ७८.७० अंकांनी वधारला व १४,५०० अंकांपुढे जात १४,५६३.४५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५०% किंवा २४७.७९ अंकांनी वधारला व ४९,५१७.११ अंकांवर विसावला. आज जवळपास १,६४७ शेअर्सनी नफा कमावला. १,३७ शेअर्स घसरले तर १५८ शेअर्स स्थिर राहिले. आज उच्चांकी कामगिरी केली तर जागतिक ट्रेंड मात्र संमिश्र स्थितीत दिसून आले.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमरदेव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्स (७.५२%), गेल (४.६८%), आयशर मोटर्स (२.९९%), एसबीआय (३.७९%) आणि कोल इंडिया (३.६०%) हे टॉप निफ्टी गेनर्समध्ये समाविष्ट झाले तर याउलट एशियन पेंट्स (३.२४%), टायटन कंपनी (२.१७%), नेस्ले (२.१३%), एचयुएल (१.९९%) आणि सन फार्मा (१.७८%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


क्षेत्रीय निर्देशांकानुसार, पीएसयू बँकेने ६% चा नफा कमावला. निफ्टी बँक, ऑटो, इन्फ्रा आणि एनर्जी या क्षेत्रांनी प्रत्येक १% नफा कमावला. बीएसई मिडकॅप व बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.४४% आणि ०.२५% नफा कमावला.


महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.: महिंद्रा लाइफस्पेसचे स्टॉक्स २.३०% नी वाढले व त्यांनी ३९६.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने गृह खरेदी करणा-यांसाठीचा अनुभव वृद्धींगत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला. त्यानंतर हे परिणाम दिसून आले.


लार्सन अँड टर्बो इन्फोटेक लि.: हायब्रिड क्लाउड स्वीकाराद्वारे व्यवसायांना त्यांची कार्यपद्धती बदलण्यास मदत करतण्याकरिता एलअँडटी इन्फोटेक आयबीएमसोबत बहुवार्षिक, जागतिक भागीदारी विस्तारत आहे. कंपनीचे स्टॉक्स १.४८% नी वाढले व त्यांनी ४,३०८.०० रुपयांवर व्यापार केला.


आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.: कंपनीने २३१.७७ कोटी रुपये किंमतीची नवी ऑर्डर हायवे डिपार्टमेंटकडून मिळवली. चेन्नई-कन्याकुमारी इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्टसाठी ही ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.०८% नी वाढले व त्यांनी ६८.८० रुपयांवर व्यापार केला.


अशोक लेलँड लि.: कंपनीने जानेवारी महिन्यात २२.५ % चा नफा कमावला व ऑटो क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा स्टॉकचा दर्जा मिळवला. स्टॉक्स ४.१०% नी वाढले व त्यांनी १२१.७५ रुपयांवर व्यापार केला.


कर्नाटक बँक लि.: कंपनीने तिमाही निकाल जाहिर केल्यानंतर कर्नाटक बँकेचे स्टॉक्स ५.१४% नी वाढले व त्यांनी ६७.४५ रुपयांवर व्यापार केला. बँकेचा तिस-या तिमाहितील निव्वळ नफा १०% नी वाढला व निव्वळ व्याज उत्पन्न २०.८% नी वधारले.


भारतीय रुपया: भारतीय रुपयाने घसरणीतून सावरत उच्चांकी मार्ग पत्करला. देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७३.२५ रुपयांचे मूल्य कमावले.


जागतिक बाजार: वॉशिंग्टन येथील राजकीय गदारोळ आणि वेगाने वाढणारी कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या यामुळे बाजारभावनेवर परिणाम झाला. जागतिक बाजाराने संमिश्र ट्रेंड दर्शवले. एफटीएसई १०० ने ०.६०% वृद्धी घेतली तर एफटीएसई एमआयबीने ०.१७% नी घसरण अनुभवली. याउलट निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.०९% आणि १.३२% नी वाढले.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202