हेटरोट्रॉफिक प्रेग्नन्सी असणाऱ्या महिलांवर शहरातील आयव्हीएफ क्लिनिकमध्ये उपचार

 हेटरोट्रॉफिक प्रेग्नन्सी असणाऱ्या महिलांवर शहरातील आयव्हीएफ क्लिनिकमध्ये उपचार

पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ क्लिनिकमधील तज्ज्ञांनी प्रगत असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निकच्या मदतीने जोडप्यावर केले उपचार ~

 जानेवारी 19, 2021: पुणे येथील इंदिरा आयव्हीएफ क्लिनिक येथे 38 वर्षीय महिलेवर हेटरोट्रॉफिक प्रेग्नन्सीसंबंधी उपचार करण्यात आले. हेटरोट्रॉफिक (एचटी) प्रकारच्या गर्भावस्थेमध्ये दोन भ्रुण तयार होतातपण एक गर्भाशयाच्या आतमध्ये असतो आणि दुसरा भ्रुण इक्टोपिकली तयार होतोम्हणजेच तो अन्यत्र कुठेही असतोपण गर्भाशयाच्या आतील अस्तरामध्ये नसतो. अनिता (नाव बदलले आहे) आणि त्यांचा पती यांनी तीन वेळा आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) उपचार घेण्याचा प्रयत्न केलापण त्यांना प्रत्येक वेळी अपयश आले. त्यांना 6-7 आठवड्यांचा गर्भपाताचा सामनाही करावा लागला. त्यानंतर त्यांनी शहरातील क्लिनिकचा सल्ला घ्यायचे ठरवले.

अनेक चाचण्या केल्यानंतर अनिता यांच्यामध्ये अँटि-म्युलेरिअन हार्मोन्सची पातळी अत्यंत कमी (AMH 0.76) असल्याचे आणि अंडाशयातील साठा घटत असल्याचे आढळले. त्यांच्या अंडाशयामध्ये उपयुक्त अंड्यांची संख्या नगण्य असल्याचे यातून सूचित झाले. त्यांच्या पतीला अझोस्पर्मियाचे निदान झालेम्हणजेच त्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूचा अभाव होता. या कारणानेत्यांना आयव्हीएफ उपचार घेण्यास व डोनर एम्ब्रियोची मदत घेण्यास सांगण्यात आले. यामध्येजोडप्याऐवजी डोनरची अंडी व शुक्राणू यांचा वापर केला जातो.

या उपचारांविषयी अधिक माहिती देतानाइंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षितिज मुद्रिया यांनी सांगितले, वंध्यत्व हे केवळ महिलांमध्येच नाहीतर पुरुषांमध्येही दिसून येते. एक तृतियांश जोडप्यांमध्ये आरोग्याच्या समस्या असू शकतात व त्यामुळे महिलांमधील वंध्यत्व निर्माण होऊ शकते. याचे कारणपुरुषांमधील आजार हेही असू शकते. एक तृतियांश जोडप्यांच्या बाबतीत दोघांमध्ये समस्या आढळू शकतेजसे अनिता व त्यांचे पती यांच्यामध्ये दिसून आले. अशा वेळीडोनर एम्ब्रियोचा पर्याय आदर्श ठरतो.”

डॉ. अमोल लुंकड व डॉ. सतीश लुंकड यांनी अनितांवर उपचार केले. सप्टेंबर 2020 मध्ये अनिता यांच्या गर्भाशयामध्ये दोन भ्रूण हस्तांतरित करण्यात आले आणि त्यानंतर beta-HCG (ह्युमन क्रॉनिक गोन्रडोट्रॉफिन) चाचणीद्वारे त्या क्लिनिकली प्रेग्नंट झाल्याचे जाहीर करण्यात आले. अल्ट्रासाउंडच्या मदतीनेएक भ्रूण गर्भाशयामध्ये असल्याची खात्री करण्यात आलीपरंतु अन्य भ्रूण डाव्या अंडवाहिनी नलिकेच्या भागात असल्याचे आढळले. अशा प्रकारच्या गर्भाधारणेतून गुंतागुंत निर्माण होते आणि सहसा गर्भपात होतात.

शस्त्रक्रिया करून अनिता यांची डावी अंडवाहिनी नलिका काढून टाकण्यात आली (सॅलपिमगेक्टॉमी)त्यामुळे तेथे रोपण झालेले भ्रूणही काढण्यात आले. गर्भाशयामध्ये योग्य ठिकाणी एकच गर्भधारणा राहिली असल्याचे शस्त्रक्रियेनंतर घेण्यात आलेल्या इमेजमधून स्पष्ट झाले.

एचटी प्रेग्नन्सीपैकी अंदाजे 20-25% रुग्णांच्या बाबतीत कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. अंदाजे 70-75% रुग्णांच्या बाबतीत वेदना होतात आणि अंदाजे 50% रुग्णांच्या बाबतीत व्हजायनल रक्तस्राव होतोकमीत कमी त्रास व हानी होईलतसेच जोडप्याला शक्य तितके चांगले परिणाम मिळतीलअसा मार्ग पत्करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सर्व गर्भावस्था व सोनोग्राफी यांची बारकाईने पाहणी करायला हवीजेणे करून अशा असाधारणा केसेसचे निदान लवकर होईल आणि लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार करता येतील,” असे डॉ. मुर्दिया यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.