अॅमेझॉनतर्फे भारतात विश्‍वव्‍यापी पहिला मोबाइल-ओन्‍ली व्हिडिओ प्‍लान 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन' सादर

अॅमेझॉनतर्फे भारतात विश्‍वव्‍यापी पहिला मोबाइल-ओन्‍ली व्हिडिओ प्‍लान 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन' सादर


प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्‍या सादरीकरणासाठी एअरटेलसोबत सहयोग, करोडो एअरटेल ग्राहकांना उच्‍च दर्जाचे मनोरंजन उपलब्‍ध होणार

प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन हा विशेषत: भारतासारख्‍या मोबाइल-फर्स्‍ट देशासाठी तयार करण्‍यात आलेला सिंगल-युजर मोबाइल-ओन्‍ली प्‍लान आहे

प्री-पेडवरील सर्व एअरटेल ग्राहकांना पॅकेजमध्‍ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे 30 दिवसांचे मोफत ट्रायल. तसेच, ग्राहक सुरूवातीची ऑफर 89 रूपयांपासून सुरू होणा-या रिचार्ज बंडल्‍सच्‍या माध्‍यमातून मोबाइल एडिशन कार्यान्वित करू शकतात

मुंबई, 13 जानेवारी 2021: प्रत्‍येक भारतीयांना उच्‍च दर्जात्म्क मनोरंजन उपलब्‍ध करून देण्‍याचे प्रमाण वाढवण्‍याला चालना देत अॅमेझॉनने आज 89 रूपयांच्‍या अद्वितीय सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये मोबाइल-ओन्‍ली प्‍लान 'प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन' सादर केला. भारत हा ग्राहकांना मोबाइल-ओन्‍ली प्राइम व्हिडिओ प्‍लान देणारा जगातील पहिला अॅमेझॉन प्राइम देश बनला आहे. किफायतशीर डेटाने समर्थित सर्वव्‍यापी स्‍मार्टफोनचा देशभरात मनोरंजनासाठी अधिक वापर केला जात आहे. प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन हा सिंगल-युजर मोबाइल-ओन्‍ली प्‍लान आहे. हा प्‍लान ग्राहकांना एसडी दर्जाचे स्ट्रिमिंग देतो आणि विशेषत: भारतासारख्‍या मोबाइल-फर्स्‍ट देशासाठी निर्माण करण्‍यात आला आहे. प्राइम व्हिडिओ प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्‍या प्रथम सादरीकरणासाठी भारताची प्रमुख संपर्क उपाययोजना देणारी कंपनी भारती एअरटेलसोबत (''एअरटेल'') सहयोग करत आहे.

भारतातील प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन सादरीकरणाचा भाग म्‍हणून प्री-पेड पॅक्‍स असलेले सर्व एअरटेल ग्राहक त्‍यांच्‍या मोबाइल क्रमांकाचा वापर करत एअरटेल थँक्‍स अॅपमधून अॅमेझॉनमध्‍ये साइन इन करत 30 दिवस मोफत ट्रायलचा लाभ घेऊ शकतात. 30 दिवसांच्‍या मोफत ट्रायलनंतर एअरटेल ग्राहक 6 जीबी डेटासह 28 दिवसांचे प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन मिळवण्‍यासाठी 89 रूपयांपासून सुरू होणा-या सुरूवातीच्‍या ऑफरमध्‍ये प्री-पेड रिचार्जच्‍या माध्‍यमातून प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा आनंद घेणे सुरू ठेवू शकतात किंवा 28 दिवस वैधता असलेल्‍या 299 रूपयांच्‍या पॅकची निवड करू शकतात. या पॅकमध्‍ये प्रतिदिन 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचा समावेश आहे.

परिपूर्ण प्राइम व्हिडिओ अनुभवासह मल्‍टी-युजर अॅक्‍सेस, स्‍मार्ट टीव्‍हीसोबत इतर डिवाईसेसमध्‍ये स्ट्रिमिंग आणि एचडी/यूएचडीमध्‍ये कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद, जाहिरात-मुक्‍त संगीत सारखे इतर प्राइम लाभ, Amazon.in वर मोफत जलद शिपिंग यांचा लाभ घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांना 131 रूपयांमध्‍ये 30 दिवसांच्‍या अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वासह रिचार्जचा पर्याय असेल किंवा 28 दिवस वैधता असलेल्‍या 349 रूपयांच्‍या पॅकसह रिचार्ज करण्‍याचा पर्याय असेल. या पॅकमध्‍ये प्रतिदिन 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्‍ससह अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वाचा समावेश आहे.

हे रिचार्ज एअरटेल थँक्‍स अॅपवर किंवा देशभरातील लाखोंहून अधिक रिचार्ज पॉइण्‍ट्सवर उपलब्‍ध असतील. या ऑफरिंग्‍ज प्राइम व्हिडिओच्‍या संपूर्ण मनोरंजन कन्‍टेन्‍ट लायब्ररीची अमर्यादित सुविधा देतात आणि ग्राहकांना प्राइम व्हिडिओ उपलब्‍ध होण्‍याच्‍या अधिक निवडी व पर्यायांसह सक्षम करतात.

या सादरीकरणाबाबत बोलताना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वर्ल्‍डवाइडचे उपाध्‍यक्ष जय मरिन म्‍हणाले, ''भारत हा उच्‍च सहभाग प्रमाणांसह जगातील आमचा झपाट्याने विकसित होणारा देश आहे. या प्रतिसादाव्‍यतिरिक्‍त आम्‍ही अधिकाधिक भारतीय ग्राहकांना आमचे लोकप्रिय मनोरंजन कन्‍टेन्‍ट ऑफर करत सुविधा दुप्‍पट करू इच्छितो. देशातील उच्‍च मोबाइल ब्रॉडबॅण्‍ड प्रवेश पाहता मोबाइल फोन हे सर्वाधिक वापरण्‍यात येणारे स्ट्रिमिंग डिवाईस बनले आहेत. प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्‍या सादरीकरणासह आम्‍ही आमच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह व ओरिजिनल कन्‍टेन्‍टसह प्रत्‍येक भारतीयाचे मनोरंजन करण्‍यास उत्‍सुक आहोत.''

एअरटेल वापरकर्ते प्री-पेड बंडल्‍सच्‍या व्‍यापक रेंजमधून निवड करत त्‍यांच्‍या मोबाइलवर प्राइम व्हिडिओ पाहू शकतात. 

89 रूपयांचा रिचार्ज: 28 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि 6 जीबी डेटा.

299 रूपयांचे प्री-पेड बंडल: 28 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 1.5 जीबी

131 रूपयांचा रिचार्ज: 30 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, तसेच फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अमर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत  

349 रूपयांचा रिचार्ज: 28 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व, फुल प्राइम व्हिडिओ अॅक्‍सेस, मोफत जलद शिपिंग आणि अर्यादित जाहिरात-मुक्‍त संगीत, तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 2 जीबी   

ग्राहक हे प्री-पेड पॅक्‍स एअरटेल थँक्‍स अॅपवर किंवा भारतभरातील एक मिलियनहून अधिक एअरटेल स्‍टोअर्समध्‍ये खरेदी करू शकतात. 

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक व देशातील महा-व्‍यवस्‍थापक गौरव गांधी म्‍हणाले, ''गेल्‍या 4 वर्षांमध्‍ये प्राइम व्हिडिओ 4.300 हून अधिक नगर व शहरांमधील दर्शकत्‍वासह देशाची लोकप्रिय प्रिमिअम स्ट्रिमिंग सेवा बनली आहे. आमचा विश्‍वास आहे की, मोबाइल एडिशन प्‍लान प्राइम व्हिडिओच्‍या भारतातील उपस्थितीला अधिक चालना देईल आणि अधिकाधिक ग्राहकांना आमचा लोकप्रिय मनोरंजन कन्‍टेन्‍ट उपलब्‍ध करून देईल. अॅमेझॉनसाठी हा उपक्रम ग्राहकांना अधिकाधिक सुविधा (प्‍लान्‍सच्‍या) देण्‍यासोबत मोबाइल डेटा प्‍लान्‍ससह प्राइम व्हिडिओ सुलभपणे सबस्‍क्राइब करण्‍याची सुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. आम्‍हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनसाठी भारतातील आमचा पहिला भागीदार म्‍हणून एअरटेलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.''

भारती एअरटेलचे मुख्‍य विपणन अधिकारी शाश्‍वत शर्मा म्‍हणाले, ''एअरटेलमध्‍ये आम्‍ही आमच्‍या एअरटेल थँक्‍स प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून आमच्‍या ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍हाला एअरटेलच्‍या खास ग्राहकांच्‍या मूलभूत क्षमता, सखोल वितरण आणि व्हिडिओसाठी दर्जात्‍मक नेटवर्कचा लाभ घेत भारतातील दर्जात्‍मक डिजिटल मनोरंजनाचे लोकशाहीकरण करण्‍यासाठी अॅमेझॉनसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.''

एअरटेलसोबतच्‍या सहयोगाबाबत बोलताना अॅमेझॉन मोबाइल बिझनेस डेव्‍हलपमेंटचे संचालक समीर बत्रा म्‍हणाले, ''आम्‍हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्‍या सादरीकरणासाठी आमचे पहिले भागीदार म्‍हणून एअरटेलसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हा सहयोग अॅमेझॉन व एअरटेल मधील धोरणात्‍मक संबंधांना अधिक सखोल करतो. भारतीय ग्राहक प्री-पेड कनेक्‍शन्‍स आणि किफायतशीर डेटाने युक्‍त स्‍मार्टफोन्‍सचा अधिक प्रमाणात वापर करतात. मोबाइल एडिशन या व्‍यापक ग्राहकवर्गासाठी प्राइम व्हिडिओला दर्जात्‍मक मनोरंजनाशी संलग्‍न करेल. आम्‍ही भारतभरातील संपूर्ण प्री-पेड ग्राहकवर्गापर्यंत आमची सेवा पोहोचवण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.'

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24