कू आणि रिपब्लिक टीव्हीची 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेला पाठिंबा देण्याच्या हेतून अभूतपूर्व भागीदारी
कू आणि रिपब्लिक टीव्हीची 'आत्मनिर्भर भारत'
संकल्पनेला पाठिंबा देण्याच्या हेतून अभूतपूर्व भागीदारी
मुंबई , जानेवारी २०२१: भारताचा सर्वात मोठा मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ हा भारतीय प्रेक्षकांना दररोजच्या ट्रेंडिंग घडामोडींवर चर्चा तसेच आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने रिपब्लिक टीव्ही सोबत आपली भागीदारी जाहीर करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या "आत्मनिर्भर भारत" संकल्पनेला चालना देत प्रथमच २ स्वदेशी ब्रँड अश्याप्रकारे भागीदारीत येत आहेत.
भागीदारीचा एक भाग म्हणून, रिपब्लिक भारत कू प्लॅटफॉर्मचा वापर करून दररोजच्या हॅशटॅगचा ट्रेंड करेल आणि कू वरील त्यांच्या फॉलोवर्सनां त्या विषयांवर त्यांचे विचार आणि मते व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करेल. सर्वोत्कृष्ट कू हा रिपब्लिक टीव्ही वर दाखविला जाईल. देशातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी रिपब्लिक टीव्ही कू वर दररोज पोल्स तयार करून आपल्या टेलिव्हिजन नेटवर्क मध्ये प्रदर्शित करेल. २६ जानेवारी २०२१, प्रजासत्ताक दिनापासून कू आणि रिपब्लिक भारत यांची भागीदारी सुरु होऊन ती रिपब्लिक टीव्हीवर दिसून येईल.
कू चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अप्रमेय राधाकृष्णा म्हणाले की, आमचा ठाम विश्वास आहे कि कोणत्याही भाषेच्या बंधनाशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे डिजिटल स्वरूपातहि असले पाहिजे. आज इंटरनेटवर इंग्रजी प्रेक्षकांचे बरेच विचार आणि मत उपलब्ध आहेत. रिपब्लिक सोबतच्या या करारामुळे अनेक भारतीय भाषिकांनाही आपले विचार सोशल मीडिया वर मांडण्यासाठी प्रोत्सहन मिळेल.
रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी म्हणाले, हि आमच्या प्रजासत्ताक आत्मनिर्भर भारत संकल्पनेची अभूतपूर्व सुरुवात आहे. आत्मनिर्भर भारत चळवळीमध्ये कू चे अप्रमेय आणि मयंक हे एक उत्तम उदाहरण ठरले आहेत. या तरुण उद्योजकांनी जे घडवले ते खरोखर उल्लेखनीय आहे. जे भारताचा अभिमान बाळगतात आणि राष्ट्र हिताच्या दिशेने वाटचाल करतात अश्या तेजस्वी, बुद्धिमान नाविन्यपूर्ण उदयोजकांना प्रोत्साहन देउन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत.
रिपब्लिक भारत आणि कू संपादकीय रूपाने सहयोग करून आपले विचार एकत्रित करतील. कू हा एक पुरस्कार विजेता अँप आहे. जो आत्मनिर्भर भारत अँप अवॉर्ड जिंकला असून २०२० चा गूगल प्ले स्टेअरचा 'सर्वोत्कृष्ट अत्यावश्यक दैनंदिन अँप' म्हणूनही निवडला गेला आहे. 'मन की बात' या कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांनी कू अँप चा विशेष उल्लेख केला आहे. कू हे गुणवत्ता आणि टीमवर्कच सर्वोत्तम उदाहरण आहे. ज्यांनी भारताला स्वतःची टेक इको सिस्टिम देण्याचा निर्धार केला आहे.
Comments
Post a Comment