हिअरिंग केअरसाठी भारतात पहिलेवहिले जागतिक दर्जाचे साऊंड सेंटर



हिअरिंग केअरसाठी भारतात पहिलेवहिले जागतिक दर्जाचे साऊंड सेंटर

 

या प्रकारचे पहिलेच केंद्र अंधेरीत सुरू,

माजी कसोटी क्रिकेटपटू श्री सईद किरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन


 

मुंबई18 जानेवारी 2021: हिअरिंग केअरसाठी भारतातील पहिल्यावहिल्या साऊंड सेंटरचे आज माजी कसोटी क्रिकेटपटू आणि साऊंड एम्बेसेडर पद्मश्री सईद किरमाणी आणि डब्ल्यूएसए इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीअविनाश पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

 

जागतिक दर्जाचे हे साऊंड सेंटरचे व्यवस्थापन आणि कार्यचलन अर्थव स्पीच अॅण्ड हिअरिंग केअर प्रा.लि.तर्फे केले जाणार आहेमुंबईठाणेगोवा आणि आता मुंबईत या कंपनीतर्फे हिअरिंग अॅण्ड स्पीच थेरपी सेंटर्सची व्यावसायिक चेन चालवली जातेया सेंटरमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने सर्व वयोगटासाठीचे श्रवण माध्यमांचे सुयोग्य पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

 

साऊंड एम्बेसेडर सईद किरामाणीही आजवर वाइडेक्स मुमेंट या अत्यंत आधुनिक हिअरिंग एडचे वापरकर्ते होतेविलंबकाल शून्यावर आणणाऱ्या तंत्रज्ञानामुळे वाइडेक्स मुमेंट या क्रांतीकारी यंत्राने अत्यंत नैसर्गिक आणि मूळ स्वरूपाचा आवाज ऐकू येण्याची किमया साधलीवाइडेक्स या जगातील अव्वल क्रमांकाच्या ब्रँडमधील वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आणि विश्वासार्ह आहेत.

 

या नव्या साऊंड सेंटरमुळे वैयक्तिक श्रवण समस्यांवर खास व्यक्तिगणिक तयार केलेले पर्याय उपलब्ध होतीलबोलण्यात आणि ऐकण्यात समस्या जाणवणाऱ्या मुलांमधील निदानापासून वैयक्तिक गरजा आणि आवश्यकतांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला योग्य पर्याय पुरवणे अशा सोयी इथे आहेत.

 

या साऊंड सेंटरमध्ये श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी टिनिटस (कानात सतत एक गुणगुण असा आवाज येत राहणे), हिअरिंग स्क्रीनिंगवाइडेक्स डिजिटल हिअरिंग एड्सबॅटरीज आणि हिअरिंग एड अॅक्सेसरीज अशा खास सेवाही उपलब्ध आहेत.

या उद्घाटनप्रसंगी श्रीअविनाश पवार म्हणाले, : अर्थव साऊंड सेंटरमध्ये साऊंड स्टेशन आणि अॅक्सेसरी लाऊंज आहेत्यामुळेवापरकर्त्यांना कोणत्याही विपर्यास किंवा अडथळ्याविना कनेक्टिव्हिटी आणि श्रवणातील स्पष्टतेचा अनुभव घेता येतो.

 

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना अथर्वचे व्यवस्थापकीय संचालक श्रीविकास राऊत म्हणालेया साऊंड सेंटरमागील मूळ विचार म्हणजे जागतिक दर्जाची हिअरिंग केअर डिलिव्हरी प्रणाली उभारणे आणि श्रवणदोष असलेल्या मुंबईतील व्यक्तींसाठी श्रवणयंत्रांचे वितरण आणि सेवेचा दर्जा वृद्धिंग करणे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth