‘नायका लक्स’च्या दालनाचा चर्चगेट येथे शुभारंभ
‘नायका लक्स’च्या दालनाचा चर्चगेट येथे शुभारंभ
मुंबई, २८ जानेवारी २०२१ : भारतातील आघाडीचा सौंदर्य आणि वैयक्तिक निगा ब्रँड ‘नायका’ने आपला ‘लक्स’चा चर्चगेट येथे शुभारंभ केला आहे. त्या माध्यमातून देशातील त्यांच्या ऑफलाईन दुकानांची संख्या ७५ एवढी भव्य झाली आहे. सौंदर्य आणि ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वच बाबतीत शहराच्या पुढारलेल्या अशा दक्षिण मुंबईतील ‘नायका’चा विशेष असा हा स्टोअर आहे. या शुभारंभामुळे महराष्ट्रातील त्यांच्या स्टोअर्सची संख्या तब्बल १५ वर पोहोचली असून त्यातील १२ हे एकट्या मुंबईत आहेत. त्यातील ५ हे ‘लक्स’ प्रकारातील आहेत. त्याद्वारे मुंबई हे शहर ‘नायका’साठी एक महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. ‘नायका’चे भारतातील ३४ शहरांमध्ये सध्या ७५ स्टोआर्स आहेत.
हे दुकान मुंबईत मरीन ड्राईव्ह येथील सुंदर महल येथे स्थित असून ते ११०० हूनही अधिक चौरस फुट जागेत विस्तारले आहे. ‘नायका लक्स’मध्ये सौंदर्य, त्वचानिगा आणि सुगंधी ब्रँड उपलब्ध असून त्यांमध्ये एस्टी लाऊडर, बॉब्बी ब्राऊन, स्मॅश बॉक्स, क्लिनिक, एमएसी, मुराद, सुल्वाहसू, टू फेस्ड, नायका कॉस्मेटीक्स, हुडा ब्युटी, काय ब्युटी, व्हर्सेस, हर्म्स, गिओर्जिओ अरमानी, बिव्हील्गरी आणि इतर अनेक ब्रँडचा समावेश आहे. तुमच्या सौदर्यकलेचा विस्तार करा आणि या लोकप्रिय अशा ब्रँडच्या माध्यमातून २०२१मध्ये अगदी ग्लॅमरसपणे पाय ठेवा. ही सर्व उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
‘नायका डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंचीत नायर म्हणाले, “दक्षिण मुंबईतील ‘नायका लक्स’ हा आमचा पहिला विशेष असा स्टोअर असून ते भारतातील आमचा ७५वे दुकान आहे. दक्षिण मुंबई आमच्यासाठी खूप विशेष अशी जागा आहे कारण येथील आमचे ग्राहक फार पारखी आहेत. आम्हाला आमच्या रिटेल दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे. त्याद्वारे आम्हाला येथील ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून द्यायचा आहे. हे ग्राहक आधुनिक अशा सौंदर्य ट्रेंड्सबद्दल खूप माहिती ठेवतात आणि झपाटलेले असतात. ग्राहकांचे समाधान पाहताना आणि त्यांची सुरक्षा ध्ञानात घेवून आम्ही आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत अनेक मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणली असून त्याद्वारे प्रत्येकाची सुरक्षा जपली जाते.”
Comments
Post a Comment