ईजोहरीवर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

 ईजोहरीवर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

~ ग्राहकांना सेवा घेण्यापूर्वी कस्टमर केअरच्या प्रतिनिधींशी थेट बोलता येईल ~

मुंबई, ५ जानेवारी २०२१: भारतातील दागिन्यांचे सर्वात मोठे आणि एकमेव ओम्नीचॅनेल बाजारस्थळ ईजोहरीने आपल्या मंचावर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. ग्राहकांना एखादी सेवा घेण्यापूर्वी कस्टमर केअरच्या प्रतिनिधींशी थेट बोलता येईल. सोने खरेदी किंवा विक्रीच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शनाद्वारे ग्राहकांचा अनुभव वाढवण्याचा उद्देश यामागे आहे. तसेच गोल्ड लोनसारख्या सुविधा उपलब्ध करत ग्राहकांचा प्रवासही अडथळारहित करण्याचा कंपनीचा मानस आहे.

सोन्याचा व्यवहार करताना ग्राहकांच्या शंका-कुशंका कमी करण्यासाठीही याचा फायदा होईल. ग्राहक आता स्मार्टफोन्स, लॅपटॉप किंवा वेबकॅमद्वारे विक्री प्रतिनिधींशी कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओकॉल करु शकतो. कंपनीच्या स्टेकहोल्डर्सना विविध आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराकरिता सक्रिय दृष्टीकोन ठेवण्याचा ब्रँडचा दृष्टीकोन असून त्या दिशेनेच ही सुविधा देण्यात आली आहे.

ईजोहरीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंह म्हणाले, “गुंतवणूक व तंत्रज्ञान व्यवहाराचा विचार येतो तेव्हा काही लोक, विशेषत: ज्येष्ठ लोक प्रत्यक्ष माणसांच्या मदतीशिवाय काम करण्यात संकोच करतात. कारण या सर्वांमागे प्रणाली कशी काम करते, हे त्यांना माहिती नसते. त्यांचा पैसा कुठे जातो, ही गुंतवणूक योग्य आहे की नाही इत्यादी गोष्टींबद्दल त्यांच्या मनात भीती असू शकते. पण समोरील बाजूस एखादी व्यक्तीच दिसल्यास ग्राहकांना खात्रीचा अनुभव येतो. त्यामुळे व्हिडिओ कॉल सुविधेमुळे ग्राहकांना या बाबतीत पुढे जाण्याकरिता अधिक आत्मविश्वास मिळेल व त्यातून ग्राहक-ब्रँडचे नाते अधिक बळकट होऊ शकेल.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.