भारतपे ने सुमित सिंग’ यांची जनरल कॉऊंसेल आणि कॉर्पोरेट रणनीती प्रमुख म्हणून नेमणूक केली

 भारतपे  ने सुमित सिंग’ यांची जनरल कॉऊंसेल आणि कॉर्पोरेट रणनीती प्रमुख म्हणून नेमणूक केली

 शार्दुल अमरचंद (एसएएम) मधील सुमीत सर्वात तरुण भागीदारांपैकी एक होते

 


मुंबई, ०५ जानेवारी, २०२१: व्यापार्‍यांसाठी भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी भारतपे यांनी आज ‘जनरल कॉऊंसेल आणि कॉर्पोरेट रणनीती प्रमुख’ म्हणून ‘सुमित सिंग’ यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. या नियुक्तीमुळे भारतपे च्या नेतृत्व संघाला चालना मिळेल, ज्यामध्ये सध्या उद्योगातील नामांकित व्यावसायिक समाविष्ट आहेत.

 सुमित सिंग हे एक अनुभवी कायदेशीर व्यावसायिक आहेत आणि त्यांच्याकडे एझेडबी अँड पार्टनर्स, डीएसके लीगल आणि अमरचंद मंगलदास यांच्यासह आघाडीच्या कायदेशीर संस्थांमध्ये १०+ वर्षांचा अनुभव आहे. सुमित यांच्याकडे नॉन-बँकिंग फायनान्शियल, रिटेल, ई-कॉमर्स, एफएमसीजी, डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांच्या कायदेशीर, अनुपालन, नियामक आणि रचनात्मक बाबींचे सखोल ज्ञान आहे.

 लवकलरच भारतपे मध्ये जॉईन होणारे सुमित हे सध्या नवी दिल्ली स्थित शार्दूल अमरचंद मंगलदास येथे भागीदार आहेत. सुमित यांनी पूर्वीचे अमरचंद मंगलदास सुरेश ए श्रॉफ २०१३ मध्ये जॉईन केले होते आणि त्यापूर्वी ते एझेडबी मध्ये होते. सुमितने भारतातील काही मोठ्या ई-कॉमर्स, रिटेल घटक, वित्तीय कंपन्या आणि स्टार्ट-अपचे सक्रियपणे प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडेच, किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपच्या संपूर्ण रिटेल व होलसेल व लॉजिस्टिक्स व वेअरहाउसिंग व्यवसायाचे अधिग्रहण करण्याच्या संदर्भात ते रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडला सल्ला देणार्‍या कोअर टीमचा भाग होते.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.