स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेडचा आयपीओ २५ जानेवारी २०२१ रोजी खुला होणार

 

स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेडचा आयपीओ २५ जानेवारी २०२१ रोजी खुला होणार

 

·     प्राईस बँड प्रति समभाग ३८४ रूपये ते ३८५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. 

·     ऑफर सोमवार २५ जानेवारी २०२१ ते गुरुवार २८ जानेवारी २०२१ या कालावधीत खुली राहील.

 

 

मुंबई, २१ जानेवारी, २०२१:  स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड (कंपनी) या स्वयंपाकघरातील उपकरणांच्या भारतातील आघाडीच्या ब्रॅंड्सपैकी एक, प्रेशर कुकर्सच्या बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आणि फ्री स्टँडिंग हॉब्स व कूकटॉप्सच्या विक्रीत दमदार कामगिरी बजावणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनीने आपल्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागांच्या विक्रीची इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) सोमवार २५ जानेवारी २०२१ रोजी खुली केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या ऑफरसाठी प्राईस बँड प्रति समभाग ३८४ रूपये ते ३८५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ गुरुवार २८ जानेवारी २०२१ रोजी बंद होईल.   कंपनी आणि तिचे विक्रेते समभागधारक बीआरएलएमसोबत विचारविनिमय करून अँकर गुंतवणूकदारांच्या सहभागाबद्दल निर्णय घेतील आणि त्यांना ऑफर खुली होण्याच्या तारखेच्या एक दिवस (कामकाजाचा दिवस) आधी या ऑफरमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाऊ शकते.

 

या आयपीओमध्ये ९५०.०० मिलियन रुपयांचे फ्रेश इश्यू आणि प्रमोटर राजेंद्र गांधी यांच्याकडील ६,९०,७०० पर्यंत व प्रमोटर सुनीता राजेंद्र गांधी यांच्याकडील ५९,३०० पर्यंत समभाग (एकूण समभाग राजेंद्र गांधी यांच्याकडे, "समभाग विकत असलेले प्रमोटर्स"), सिकोया कॅपिटल इंडिया ग्रोथ इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स I ("एससीआय - जीआयएच") यांच्याकडील १४,९२,०८० पर्यंत समभाग, आणि एससीआय ग्रोथ इन्वेस्ट्मेन्ट्स II ("एससीआय", एकूण समभाग एससीआय - जीआयएचकडे, "समभाग विकणारे गुंतवणूकदार") ("समभाग विकणारे गुंतवणूकदार" आणि "समभाग विकत असलेले प्रमोटर्स" यांना समभाग विकणारे असे संबोधण्यात आले आहे) यांच्याकडील ६०,०७,९२० पर्यंत समभाग असे मिळून ८२,५०,००० पर्यंत समभागांच्या विक्रीचा समावेश असेल.

 

कमीत कमी ३८ समभाग विकत घेतले जाऊ शकतात आणि त्यापुढे ही संख्या ३८ च्या पटीत वाढवली जाऊ शकते.

 

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार संशोधित ("एससीआरआर"), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम, २०१८ च्या नियम ३१ नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(२) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील.  अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे.  अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.  क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.