भास्कर पुरणपोळी घरचे ठाणे इथे पहिले आउटलेट सुरु
भास्कर पुरणपोळी घरचे ठाणे इथे पहिले आउटलेट सुरु
ठाणे, गरम आणि चविष्ट पुरणपोळीच्या प्रकारासाठी प्रसिद्ध असलेले भास्कर पुरणपोळी घर, हे नेहमीच त्यांच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. भास्कर पुरणपोळी घर, ज्यांच्या चविष्ट पुराणपोळीच्या विस्तृत श्रेणीने बंगळुरू वासियांची मने जिंकली आहेत आणि आता त्यांनी ठाणे इथे त्यांचे पहिले आउटलेट सुरु करत महाराष्ट्रात देखील प्रवेश केला आहे.
कपिल शर्मा शो मधील किकू शारदा यांच्या हस्ते, शॉप नंबर १ आणि २ वाटिका, घंटाळीदेवी रोड,नौपाडा, ठाणे वेस्ट, येथील या आउटलेटचे उद्घाटन करण्यात आले. या आउटलेटच्या लाँचच्या वेळी ०३ ग्रुपचे फाउंडर आणि रत्नाकर शेट्टी - उद्योजक इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भास्कर पुरणपोळी घर इथे संपूर्ण स्वच्छता उपायांचे पालन करत पुरणपोळ्या या काउंटरवर ग्राहकांसमोर बनविल्या जातात आणि ग्राहकांना गरम आणि फ्रेश पुरणपोळ्या दिल्या जातात. ग्राहक दाळ, नारळ, गाजर, खजूर, खोवा, अननस, शुगर फ्री इत्यादी पर्यायांसह त्यांच्या चवीनुसार आवडीची पुरणपोळी निवडू शकतात.भास्कर पूरणपोळी घर येथील प्रशिक्षित कर्मचारी त्यांच्या खास खाद्यपदार्थाबद्दल ग्राहकांना मार्गदर्शन देखील देतात.
या अद्वितीय आणि विशेष पदार्थ म्हणजेच पुरणपोळीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे ग्राहकांना ऑफर करण्यासाठी फरसाण ची संपूर्ण श्रेणी, घरगुती मसाले,मसाला, स्नॅक्स,लोणचे, पापड, मसाला आयटम, ड्राय फ्रूट्स आणि मिठाई इत्यादी देखील उपलब्ध आहे. तर या आऊटलेट ला भेट देऊन ग्राहक त्यांच्या डोळ्यांची तसेच पोटाची भूक देखील भागवू शकतात.
Comments
Post a Comment