'फ्युचर ऑफ होम्स' ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

 'फ्युचर ऑफ होम्स' ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च


~ क्रिएटिसिटीची निर्मिती; होम फर्निचर आणि डेकोर इकोसिस्टिमबद्दल सखोल माहिती ~


मुंबई, २१ जानेवारी २०२१: होम फर्निचर आणि डेकोर इकोसिस्टिमबद्दल सखोल माहिती पुरविणारे 'फ्युचर ऑफ होम्स' या ई-बुकची दुसरी आवृत्ती क्रिएटिसिटी, या भारतातील सर्वात मोठ्या होम व फर्निचर मॉलने सादर केली आहे. क्रिएटिसिटीचे सीईओ महेश एम यांनी संकलित आणि संपादित केलेल्या या ई-बुकमध्ये घरातील फर्निचर, फर्निशिंग्स, डेकोर आणि संबंधित क्षेत्रातील दिग्गजांकडून अनेक दशकांपासून मिळालेले सल्ले उपलब्ध आहेत.


संघटीत व्यापारातील इतर श्रेणींच्या तुलनेत होम फर्निचर आणि डेकोर श्रेणी ही लेखी स्वरुपात फार कमी प्रमाणात सादर करण्यात आली आहे. म्हणूनच, ई-बुक हा फरक भरून काढत आहे. कोव्हिड-१९ च्या उद्रेकानंतर, जगात घराला एकाएकी प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे क्रिएटिसिटी घरासंबंधी क्षेत्र उदा. होम फर्निचर, फर्निशिंग्स, सजावट आणि संबंधित क्षेत्रांना वास्तविक ज्ञान आणि प्रासंगिक पद्धतीने देत येथील स्टेकहोल्डर्सना सक्षम करत आहे. अशा प्रकारचा पाठींबा आणि मार्गदर्शन हे या क्षेत्रात, विशेषत: सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत नव्या काळातील व्यावसायिकांना यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे ठरते.


कविता कृष्णा राव (आयकिया, इंडिया), आशीष शाह (पेपरफ्राय), अनिल माथूर (गोदरेज) आणि गोविंद श्रीखंडे (मेंटॉर आणि शॉपर्स स्टॉपचे माजी एमडी) हे यंदाच्या आवृत्तीतील या क्षेत्रातील दिग्गज आहेत. तसेच मनोहर गोपाल (फेदरलाइट) व लतिका खोससला (फ्रीडम ट्री), रजत वाही (डिलॉइट), यश अहुजा (पॅनासोनिक) यांचाही समावेश आहे. तसेच ई बुकमध्ये कुमार राजागोपालन (रिटेलर असोसिएशन ऑफ इंडिया) यांची प्रस्तावना लाभली आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.