टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२१ चा नवा ऑनलाईन फॉरमॅट

 टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२१ चा नवा ऑनलाईन फॉरमॅट 

यंदा अनुभवा जास्त वेगवान, जास्त अटीतटीची आणि जास्त स्मार्ट स्पर्धा!

 

२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत करता येईल ऑनलाईन नोंदणी 

यंदा या स्पर्धेत फक्त व्यक्तिगत सहभाग घेता येईल 

२ ऑनलाईन प्रिलिम्स, २४ क्लस्टर अंतिम फेऱ्या, ४ झोन्सच्या अंतिम फेऱ्या आणि १ राष्ट्रीय महाअंतिम फेरी


मुंबई, ४ जानेवारी, २०२१: भारतामध्ये कॅम्पसेससाठी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित बिझनेस क्विझ टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझची घोषणा करण्यात आली आहे.  यंदा या स्पर्धेचे १७वे वर्ष असून यावेळी ही स्पर्धा अतिशय रोमांचक आणि अटीतटीची असणार आहे.  टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२१ नव्या व्हर्च्युअल स्वरूपात आयोजित केली जाणार असून त्यामध्ये भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांना २ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान नोंदणी करता येईल.  देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हुशारीला, प्रतिभेला वाव मिळावा यासाठी दर वर्षी टाटा समूहातर्फे ही क्विझ आयोजित केली जाते.


सध्याच्या साथीच्या काळात सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२० चे आयोजन संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.  कॅम्पस क्विझमध्ये देखील त्याच पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.  ऑनलाईन स्पर्धेत भाग घेणे विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी यंदा या स्पर्धेत सांघिक नाही तर फक्त वैयक्तिक सहभागास परवानगी देण्यात आली आहे.


ऑनलाईन कॅम्पस क्विझसाठी देशभरात २४ क्लस्टर्स ठरवण्यात आले आहेत.  ऑनलाईन प्रिलिम्सच्या दोन पातळ्यांनंतर प्रत्येक क्लस्टरमधील पहिल्या १२ स्पर्धकांना वाइल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित करण्यात येईल.  यापैकी पहिले ६ स्पर्धक २४ ऑनलाईन क्लस्टर फायनल्समध्ये सहभागी होतील.  २४ क्लस्टर्सचे मिळून दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे ४ झोन तयार करण्यात आले आहेत.  प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर्स आहेत. 


प्रत्येक क्लस्टरच्या अंतिम फेरीतील विजेत्याला / विजेतीला झोनच्या अंतिम फेरीत भाग घेता येईल.  क्लस्टर अंतिम फेरीच्या विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३५,०००* रुपये आणि १८,०००* रुपयांची बक्षिसे दिली जातील.  चार झोन्सचे विजेते थेट राष्ट्रीय महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.  चार झोन्समधील उपविजेते वाइल्ड कार्ड फायनलमध्ये सहभागी होतील आणि त्या चार स्पर्धकांपैकी पहिले दोन स्पर्धक देखील राष्ट्रीय महाअंतिम फेरीसाठी पात्र होतील.  अशाप्रकारे टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझची राष्ट्रीय महाअंतिम फेरी देशभरातील आघाडीच्या ६ स्पर्धकांमध्ये होईल आणि त्यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरणारा/ठरणारी स्पर्धक राष्ट्रीय विजेता/विजेती बनेल.  राष्ट्रीय विजेत्याला / विजेतीला २.५ लाख* रुपयांचा महापुरस्कार आणि अतिशय मानाची टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल.

टाटा सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट ब्रँड आणि मार्केटिंगचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. अतुल अग्रवाल यांनी सांगितले, "टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ हा एक ज्ञान महोत्सव आहे.  विद्यार्थ्यांना त्यांची बौद्धिक क्षमता प्रदर्शित करता यावी यासाठी आम्ही हा मंच त्यांना उपलब्ध करवून देतो.  यंदा ही स्पर्धा संपूर्णतः नवीन ऑनलाईन स्वरूपात सादर केली जात असल्याने तिची व्यापकता वाढली आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातील, अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देखील यामध्ये सहज सहभागी होता येईल.  आम्हाला पक्की खात्री आहे की, अतिशय आव्हानात्मक ऑनलाईन पद्धतीची ही स्पर्धा देशातील हुशार, जिज्ञासू आणि महत्त्वाकांक्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खूपच रोमांचक आणि प्रभावी ठरेल.  आजच्या डिजिटल युगात उज्वल भवितव्यासाठी स्वतःला सज्ज करत असतानाच्या वयात ही स्पर्धा विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवेल."       


'पिकब्रेन' म्हणून नावाजले जाणारे, प्रख्यात क्विझमास्टर श्री गिरी बालसुब्रमण्यम जे सुरुवातीपासून या स्पर्धेचे सूत्रसंचालन करत आले आहेत तेच यंदा देखील ऑनलाईन स्पर्धेचे क्विझमास्टर असतील.


या वर्षीची स्पर्धेची बक्षिसे टाटा क्लीकच्या सहयोगाने देण्यात येणार आहेत.


टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२१ साठी लवकरात लवकर नोंदणी करा आणि देशातील सर्वात मोठ्या कॅम्पस क्वीझिंग स्पर्धेत सहभागी व्हा.  नोंदणी करण्यासाठी आणि स्पर्धेचे नियम, पात्रता तसेच इतर नवनवीन घडामोडींसाठी कृपया या वेबसाईटवर भेट द्या -  www.tatacrucible.com. 


*या रकमेवर स्रोत करकपात लागू आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.