दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र कटिबद्ध
दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र कटिबद्ध
एनटीडींच्या समूळ उच्चाटनाप्रती आपली कटिबद्धता नव्याने दृढ करण्यासाठी भारताचा जागतिक एनटीडी चळवळीमध्ये प्रवेश
मुंबई ३० जानेवारी २०२१ : आज भारतभरात पाळला जाणारा दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिवस (वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिजिज- एनटीडी) म्हणजे दरवर्षी भारतातील लक्षावधी माणसांच्या मृत्यूस वा अपंगत्वास कारणीभूत ठरणा-या लिम्फॅटिक फायलेरियासिस (हत्तीरोग), व्हिसेरल लिशमॅनियासिस (काळा आजार), लेप्रसी (कुष्ठरोग), डेंग्यू, चिकनगुन्या, सर्पदंश, रेबीज इत्यादी प्रतिबंध करता येण्याजोग्या आजारांच्या समूहाविरोधातील अर्थात एनटीडींविरोधातील लढ्यामधला एक महत्त्वाचा क्षण आहे.
आता, भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१-२०३० या काळासाठी आखलेल्या पथदर्शी आराखड्यानुसारपाऊल उचलले असताना, महाराष्ट्रानेही भारताने एनटीडींच्या उच्चाटनासाठी आखलेली लक्ष्ये साध्य करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. एनटीडींच्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या आपल्या दृढनिश्चयाबद्दल बोलताना राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. एन. डी. देशमुख, (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोगद्ध) म्हणाले, भारताने एनटीडींच्या उच्चाटनासाठी आखलेली उद्दीष्टे २०३०च्या आधीच पूर्ण करावीत, याची दक्षता घेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आम्ही आमचे सर्व संसाधने व उपाययोजनांचा वापर करुन हे उददीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु
एनटीडींच्या साथींच्या प्रतिबंध आणि नियंत्रणाला लिम्फॅटिक फायलेरियासिस, व्हिसेरल लिशमॅनियासिस, कुष्ठरोग, रेबीज, मातीतून संक्रमित होणारा हेल्मिन्थियासिस आणि डेंग्यू या आजारांसाठीच्या राष्ट्रीय आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जात आहे. या कार्यक्रमांची ध्येयधोरणे ही जागतिक पातळीवरील उद्दीष्टांबरहुकुम आखली जातात व त्यांच्यासाठी वर्षाकाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद केली जाते. भारतामध्ये व्हिसेरल लिशमॅनियासिस (काळा- आजार) आणि लिम्फॅटिक फायलेरियासिस (एलएफ) यांच्या उच्चाटनासाठी आखलेल्या उद्दीष्टांच्या दिशेने लक्षणीय प्रगती साधली गेली आहे. यापैकी व्हिसेरल लिशमॅनियासिसच्या साथीचा प्रादुर्भाव असलेल्या ९७% ब्लॉक्समध्ये या आजाराच्या उच्चाटनाचे लक्ष्य साध्य झाले असून (प्रती १०,००० लोकसंख्येमध्ये एकाहून कमी रुग्णसंख्या).
एलएफची साथ असलेल्या जिल्ह्यांबाबत सांगायचे तर, अशा २७२ जिल्ह्यांपैकी ९८ जिल्ह्यांमध्ये साथीच्या फैलावास अटकाव झाल्याचे (TAS-1) अधिकृतरित्या सिद्ध झाले आहे आणि या जिल्ह्यांमध्ये औषधांचे सार्वजनिक पातळीवरील वाटप अर्थात एमडीए यशस्वीरित्या थांबविण्यात आले आहे. डेंग्यू आजार झपाट्याने पसरत असल्याने या आजाराचे आव्हान अद्यापही देशासमोर आहे, मात्र २००८ पासून या आजारापायी होणा-या मृत्यूंचे प्रमाण १% हून कमी राखण्यामध्ये भारताला यश मिळाले आहे. एनटीडींसह सर्वच आजारांसाठी आवश्यक सेवा सार्वजनिक आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. फायलेरिया, व्हिसेरल लिशमॅनियासिस, मातीतून संक्रमित होणारा हेल्मिथियासिस आणि कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेणे, या आजारांच्या फैलावास कारणीभूत ठरणा-या उपद्रवी प्राण्यांच्या, किटकांच्या पैदाशीवर नियंत्रण आणणे (व्हेक्टर कंट्रोल), सार्वजनिक पातळीवर औषधांचे वाटप अर्थात मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन इत्यादी गोष्टींसाठी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे खास मंच निर्माण केले जात आहेत. व्हेक्टर कंट्रोलसाठी आंतरविभागीय समन्वयन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून डेंग्यू, फायलेरिया आणि व्हीएल यांच्या उच्चाटनासाठी केलेल्या प्रयत्नांमधून स्वतंत्रपणे मिळालेल्या परिणामांचा सामाईक लाभ एकमेकांना मिळावा.
महाराष्ट्रामध्ये एकुण १८ जिल्हे फायलेरियासीस प्रवण क्षेञ असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोरील मोठेच आव्हान आहे. मात्र राज्यांकडून या आजारांविरोधात ठोस पावले उचलली जात आहेत. कोव्हिड-१९ मुळे एनटीडींसारख्या इतर महत्त्वाच्या आरोग्य समस्यांना समर्पित संसाधने दुसरीकडे वळवली गेली व या आजारांकडे काही काळ दुर्लक्ष झाले, मात्र महाराष्ट्राने डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लगेचच एनटीडींशी निगडित कामे पुन्हा सुरू केली आहेत. एनटीडींविरोधातील राज्याच्या प्रयत्नांविषयी सांगताना डॉ. एन. डी. देशमुख म्हणाले, आमच्या प्रयत्नांमुळे भारतामध्ये एनटीडींपासून मुक्त पिढीची उभारणी करण्याचा मार्ग प्रशस्त होईल, याची आम्हाला खात्री आहे.
जागतिक एनटीडी दिनाच्या पुढेमागे व या दिवशी राज्यामध्ये एनटीडींबद्दल जनजागृती घडवून आणणा-या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात हायड्रोसील शस्ञक्रिया शिबीरे, जनजागृतीसाठी आरोग्य शिक्षण, एमएमडीपी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
Comments
Post a Comment