२०२१ मध्येएसव्हीसी बँक घेऊन येत आहे लोन उत्सवदर कपातीची घोषणा करत ११ राज्यात १९८ शाखांच्या माध्यमातून लोन उत्सव आयोजित

 २०२१ मध्येएसव्हीसी बँक घेऊन येत आहे  लोन उत्सवदर कपातीची घोषणा करत 

११ राज्यात  १९८ शाखांच्या  माध्यमातून लोन उत्सव आयोजित


 मुंबई १३, जानेवारी २०२१ : एसव्हीसी बँक (एसव्हीसी कोऑपरेटिव बँक लिमिटेड) , ह्या भारताच्या एका अग्रगण्य को-ऑपरेटिव बँकेने, आज एसव्हीसी लोन उत्सवाची तिसरी आवृत्ती घोषित केली आहे. ह्या आधीच्या दोन  आवृत्तींना मिळालेली  सफलता लक्षात घेऊन  २०२१ एसव्हीसी लोन उत्सवाला ‘ फँटास्टिक २०२१ ’असे नाव देण्यात आले आहे , ज्यामागे  २०२०सालच्या अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर पडून २०२१ साल हे भारतीयांसाठी नव्यानेउमेद देणारे ठरेल असा विचार आहे. ह्या भावनेला अनुसरून, एसव्हीसी बँकेने त्यांच्याकर्जदरांमध्ये कपात केली आहे तसेच  त्यांच्या अनेक लोन प्रॉडक्ट्‌समध्ये जलदप्रक्रिया आणि झटपट वितरणाची तरतूद उपलब्ध केली आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, डॉक्टरांसाठीकर्ज आणि सोने तारण  कर्ज अशा रीटेल प्रॉडक्ट्सच्या संपूर्णश्रेणीसाठी बँकेने आजवरचे सर्वात कमी दर घोषित केले आहेत. 

ह्या ऑफर्स ११ राज्यांमधील बँकेच्या १९८शाखांमध्ये ३१ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असतील.  प्रॉडक्ट्स ( or उत्पादने) ऑफरच्या कालावधीमध्ये सुधारित व्याज दर गृह कर्ज द.सा.7.00% पासून मालमत्ता तारण कर्ज कर्ज द.सा.8.75 % पासून डॉक्टरांसाठी कर्ज द.सा.8.75 % पासून वाहन कर्ज द.सा.7.75% पासून सोने तारण कर्ज द.सा.8.75 % पासून  ह्या उपक्रमाबद्दल बोलताना श्री. वसंत श्रीवास्तव,हेड-रीटेल बँकिंग ,एसव्हीसी बँक म्हणाले की  “2020 साल हे‘न भूतो न भविष्यती’ असे खडतर गेले. एसव्हीसी बँकेमध्ये आम्हाला असे ठामपणे वाटतेकी उदासीच्या अंधारातच आशेचा किरण उगम पावतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये आम्हालाआमच्या ग्राहकांमध्ये नव्याने  उभारीघेण्याचे चैतन्य जाणवते आहे- ज्यातून त्यांना ’न्यू नॉर्मल’ च्या काळात  प्रगतीची वाट मिळेल.  आमचे ग्राहक आता त्यांच्या स्वप्नांच्यापूर्ततेसाठी नव्याने पुढे सरसावले आहेत 

तर त्यांच्या उद्दिष्टांकडे झपाट्यानेभरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याच्या हेतूने आम्ही आमचा सहभाग देतआहोत, ‘ एसव्हीसी लोन उत्सव ’ ह्या आमच्या प्रमुख उपक्रमाच्या गेल्या दोनआवृत्तींमधून  आम्ही देशभरातील एकलाखांपेक्षा अधिक ग्राहकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. ह्या आवृत्तींमधून आम्हीहीच अपेक्षा करतो की ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सहज परवडणारे कर्ज सोप्यापद्धतीने उपलब्ध होईल .” कर्ज हवेअसल्यास ग्राहकाने आम्हाला  “LOAN” असा SMS9820620454 या क्रमांकावर पाठवावा किंवा 18003132120 या टोल फ्री वर कॉल करावा.बँकेचे देशातील 198 शाखांमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक ग्राहकआहेत. एसव्हीसीबँक विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते , ज्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्टसेवांपैकी एक आहेत. बँक डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर सुसज्ज आहे .   ज्यामध्ये  उत्तम ग्राहक संबंध , समर्पित कर्मचारी आणिसुसूत्र प्रक्रिया ह्यांची सांगड घातली गेल्यामुळे  ‘ न्यू नॉर्मल’शी ते अत्यंत सुसंगत ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth