मिनी रत्न (प्रवर्ग-1) प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव 16 फेब्रुवारी 2021 दरम्यान खुला होणार; किंमत पट्टा ₹ 93-₹ 94 प्रती इक्विटी शेअर

 मिनी रत्न (प्रवर्ग-1) प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव 16 फेब्रुवारी 2021 दरम्यान खुला होणार; किंमत पट्टा ₹ 93-₹ 94 प्रती इक्विटी शेअर



किंमत पट्टा प्रती रु. 10 दर्शनी मूल्याचे ₹ 93-₹ 94 प्रती इक्विटी शेअर (“इक्विटी शेअर”)
बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख– मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021आणि बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख – गुरुवार, 18 फेब्रुवारी, 2021
किमान बोली 155 इक्विटी शेअरची आणि त्यानंतर 155 इक्विटी शेअरच्या पटीत  
फ्लोअर प्राईज इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 9.30 पटीत आणि भांडवली मूल्य इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 9.40  पटीत 
 

मुंबई, 11 फेब्रुवारी, 2021: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (“रेलटेल”), हा देशातील सर्वात मोठा तटस्थ दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार आहे (स्त्रोत: “क्रिसील रिपोर्ट “असेसमेंट ऑफ द टेलिकॉम अँड टेलिकॉम डेटा सर्विसेस इंडस्ट्री इन इंडिया, दिनांक सप्टेंबर 2020) त्यांच्या मालकीचे ऑप्टीक फायबर नेटवर्क भारतातील काही शहरे-उपनगरांत तसेच ग्रामीण भागांत आहे; त्यांच्या वतीने इक्विटी शेअरच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव/बोली (“प्रस्ताव” / “आयपीओ”) मंगळवार, 16 फेब्रुवारी 2020 रोजी खुला करण्यात येणार आहे. तर हा व्यवहार गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021 रोजी बंद होईल. रेलटेल हा मिनी रत्न (प्रवर्ग-1) प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असून भारत सरकारच्या मालकीचा असून त्याचे कामकाज रेल्वे मंत्रालयातंर्गत नियंत्रित होते) या प्रस्तावाची किंमत रु. 10 दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअर रु. 93 ते Rs. 94 दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारक, बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”)च्या सल्ल्यानुसार, पायाभूत गुंतवणूकदारांचा सहभाग सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वाअरमेंट्स) रेग्युलेशन 2018 अन्वये सुधारित करण्यात आल्या आहेत. पायाभूत गुंतवणुकदारांची बोली दिनांक बोली/प्रस्ताव खुला होण्याच्या तारखेपासून, म्हणजे सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 च्या एक कार्यालयीन दिवसापूर्वी असेल.
या प्रस्तावात प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्याचे 87,153,369 पर्यंत इक्विटी शेअर समाविष्ट असतील आणि हा विक्रीचा प्रस्ताव भारत सरकारकडून पूर्ण होणार आहे. या व्यवहारातून जमा रक्कम कंपनीला थेट प्राप्त होणार नसून प्रस्तावातून मिळालेली रक्कम विक्रेत्या समभागधारकांना प्राप्त होईल. विक्रेत्या समभागधारकांकडीlल 87,153,369 इक्विटी शेअरची निर्गुंतवणूक करणे हा या व्यवहाराचा उद्देश आहे; स्टॉक एक्सचेंजमध्ये इक्विटी समभाग सूचीबद्ध होण्यासाठी हा व्यवहार उपयुक्त ठरेल.
एकूण प्रस्तावात क्यूआयबी वाटा 50% हून अधिक नसावा तसेच एकूण प्रस्तावापेक्षा 35% नी कमी देखील नसावा. त्याचप्रमाणे विक्रेत्या वैयक्तिक बोलीकर्त्याच्या वाटपासाठी उपलब्ध असेल. बिगर-संस्थात्मक बोलीकर्त्यांना गुणोत्तर प्रमाणावर एकूण प्रस्तावाच्या 15% हून कमी रकमेच्या वाटपाकरिता उपलब्ध नसेल.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (“रेलटेल”), हा देशातील सर्वात मोठा तटस्थ दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार आहे (स्त्रोत: “क्रिसील रिपोर्ट “असेसमेंट ऑफ द टेलिकॉम अँड टेलिकॉम डेटा सर्विसेस इंडस्ट्री इन इंडिया, दिनांक सप्टेंबर 2020) त्यांच्या मालकीचे ऑप्टीक फायबर नेटवर्क भारतातील काही शहरे-उपनगरांत 59,098 किलोमीटर पर्यंत पसरले असून देशातील 5,929 रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे (31 जानेवारी 2021 रोजी). रेलटेलच्या वतीने आयसीटी सेवा आणि पर्याय; जसे की, एमपीएलएस-व्हीपीएन, भाड्यावरील लाईन सेवा, TPaaS, ई-ऑफिस सेवा आणि डेटा सर्विस, विस्तृत नेटवर्क हार्डवेअर सिस्टीम इंटीग्रेशन, उपक्रमांना सॉफ्टवेअर तसेच डिजीटल सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, संरक्षण संघटना आणि शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत; भारतीय रेल्वेसह अन्य ग्राहकांना गुरूग्राम, हरियाणा, सिकंदराबाद आणि तेलंगणा येथील डेटा सेंटरमधून महत्त्वाच्या अॅप्लिकेशनचे कामकाज उपलब्ध करून दिले जाते. रेलटेलची नियुक्ती भारतीय रेल्वेकडून हॉस्पिटल मनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीमच्या अमलबजावणीकरिता करण्यात आली आणि रेलटेलला त्यांचे ई-ऑफिस प्रोजेक्ट फेज 3 प्रकल्प सुपूर्द करण्यात आलेला आहे.  

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयडीबीआय कपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड तसेच एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड यांना प्रस्तावाचे बीआरएलएम म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24