एचसीएल फाऊंडेशनतर्फे ग्रामीण भागाच्या विकासाची सातत्यपूर्ण बांधिलकी, एचसीएल ग्रँटच्या सहाव्या पर्वात स्वयंसेवी संस्थांना 16.5 कोटी रुपये (2.27 दशलक्ष डॉलर्स)चा निधी जाहीर

 

एचसीएल फाऊंडेशनतर्फे ग्रामीण भागाच्या विकासाची सातत्यपूर्ण बांधिलकी, एचसीएल ग्रँटच्या सहाव्या पर्वात स्वयंसेवी संस्थांना 16.5 कोटी रुपये (2.27 दशलक्ष डॉलर्स)चा निधी जाहीर 

सामाजिक बदलांची पायाभरणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना साह्य, एचसीएल ग्रँटमधून विकासात्मक बदलांच्या यशोगाथा रचण्याचा उद्देश 

 

भारत, 16 फेब्रुवारी 2021: एचसीएल फाऊंडेशन या एचसीएल टेक्नॉलॉजिस लि.च्या कॉर्पोरेट सोशल रीस्पॉन्सिबिलिटी विभागाने आज एचसीएल ग्रँटच्या सहाव्या पर्वाच्या विजेत्यांची घोषणा केली. राष्ट्रउभारणीसाठी कार्यरत भारताच्या 'पाचव्या स्तंभा'ला म्हणजेच स्वयंसेवी संस्थांना बळकटी देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जातो. 

पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकी एक अशा तीन स्वयंसेवी संस्थांना तीन ते पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा (685,000 डॉलर्स)चा निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक विभागातील अंतिम फेरीतील दोन सहभागींना एका वर्षासाठी 25 लाखांचा (34,000 डॉलर्स)चा निधी मिळेल. यामुळे निधीची एकूण रक्कम 16.5 कोटी रुपयांवर पोहोचते. 

बळकट आणि दमदार समुदायाची उभारणी करण्यातील बांधिलकीचे एक दशक यंदा एचसीएल फाऊंडेशन पूर्ण करत आहे. राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावण्यास ही संस्था बांधिल आहे. आपल्या एचसीएल ग्रँट उपक्रमाअंतर्गत या फाऊंडेशनने आजवर 60 कोटी रुपये (8.26 दशलक्ष डॉलर्स) निधी म्हणून दिले आहेत. यात यंदाच्या निधीचा समावेश नाही. भारतातील एनजीओ परिसंस्थेत एक प्राधान्यक्रमाची मान्यता अशी ओळख असलेल्या एचसीएल ग्रँटने मागील पाच वर्षात 733,000 लाभार्थींचा टप्पा गाठला आहे. भारतातील दोन केंद्रशासित प्रदेश आणि 18 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमधील 8598 गावांमधील किमान 1.72 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश या ग्रँटमागे आहे. 

एचसीएल ग्रँट 2021 मधील विजेत्या एनजीओज :   

·  साहस (पर्यावरण) 

·  इंडिया हेल्थ अॅक्शन ट्रस्ट (आरोग्य) 

·  चाईल्ड राईट्स अॅण्ड यू (शिक्षण) 

 

मान्यवर परीक्षकांचे परीक्षण, एचसीएल ग्रँटचे गव्हर्नन्स पार्टनर ग्रँट थोर्नटन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली मागील आठ महिने हजारो अर्जांची छाननी करून या एनजीओजची निवड करण्यात आली आहे. या परीक्षकांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजिसच्या संचालक आणि परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष श्रीम. रॉबिन अबराम्स, नेस्ले इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश नारायण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशनचे माजी संचालक आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे माजी सचिव श्री. बी. एस. बासवान, शार्दुल अमरचंद मंगलदास अॅण्ड कं. लॉ फर्मच्या व्यवस्थापकीय भागीदार श्रीम. पल्लवी श्रॉफ, फिल्ड म्युझिअम (शिकागो)चे प्रेसिडंट एमिराट्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ ओरिगॉनचे माजी अध्यक्ष डॉ. रीचर्ड लॅरिवेर आणि एचसीएलचे संस्थापक, एचसीएल टेक्नॉलॉजिसचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि शिव नादार फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. शिव नादार यांचा समावेश होता. 

"मागील वर्ष हे तगून राहण्याची क्षमता आणि बदल या संदर्भात फार अनोखे वर्ष होते आणि त्यातून आपल्याला अडथळे पार कसे करायचे हे शिकता आले, प्रतिकुल परिस्थितीतही पुढे जाणे शिकता आले," असे श्रीम. अबराम्स म्हणाल्या. "महासंकट असतानाही आमचे एनजीओ भागीदार, तज्ज्ञ, परीक्षक मंडळ सदस्य आणि संपूर्ण टीमने जी कार्यक्षमता दाखवली ती कौतुकास्पदच आहे. आमच्या एनजीओ भागीदारांमध्ये व्यापक आणि परिणामकारक पर्याय अमलात आणण्याचा जो उत्साह, ऊर्जा आहे त्यामुळे विविध भागांमध्ये सुयोग्य बदल घडून आले आणि त्यातून शाश्वत विकासाच्या उद्देशाला हातभार लागला. या वर्षीच्या विजेते आणि अंतिम फेरीतील स्पर्धकांकडे अनेक लक्षणीय कथा आहे ज्यांचे दृश्य परिणाम दिसत आहेत. या एनजीओजना माझ्या शुभेच्छा. पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या विकास विभागात देशातील अत्यंत दुर्गम भागांमध्ये या संस्था काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत." 

एचसीएल फाऊंडेशनच्या संचालक श्रीम. निधी पुंधीर म्हणाल्या, "2020 हे वर्ष खासही आहे आणि वेगळंही. विशेषत: ही फाऊंडेशन ग्रामीण भागतील आपल्या उच्च परिणामकारक, शाश्वत सामाजिक-आर्थिक विकासाची दहा वर्षे पूर्ण करत आहे. यातील अनोखा भाग म्हणजे आम्ही पाठबळ देत असलेल्या एनजीओना आपली विकास कामे सुरू करताना, त्यांची अमलबजावणी करताना या संकटामुळे अनेक आव्हानांचा, अनेक नैसर्गिक दुर्घटनांचा  सामना करावा लागला. मात्र, या एनजीओजबद्दल एक प्रेरणादायी बाब म्हणजे कोविड-19 कडे ते 'न्यू नॉर्मल' म्हणून पाहत आहेत आणि आपली नव्या वाटेवरची कामे न थांबता, शेवटच्या व्यक्तीपर्यंत साह्यकारी परिसंस्था उभारून आपले काम त्यांनी सुरूच ठेवले आहे." 

निधी देण्याच्या या कार्यक्रमात एचसीएल फाऊंडेशनने 'फिफ्थ इस्टेट-एनजीओ ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया इन एन्व्हॉयर्न्मेंट, हेल्थ अॅण्ड एज्युकेशन' हा सारग्रंथ सादर केला. यात मागील वर्षाच्या विजेत्या एनजीओ तसेच सब-ज्युरी राऊंडमध्ये निवडण्यात आलेल्या 30 एनजीओजचा समावेश आहे. 

 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार