परदेशी व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने किर्लोस्कर ब्रदर्सचा तिसऱ्या तिमाही नफ्यात थेट 174 टक्क्यांनी वाढ

 

परदेशी व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने किर्लोस्कर ब्रदर्सचा तिसऱ्या तिमाही नफ्यात थेट 174 टक्क्यांनी वाढ

 

जागतिक,13 February 2021 : किर्लोस्कर ब्रदर लि. (केबीएल) जो जगातील आघाडीच्या पंप उत्पादक आणि फ्ल्युड मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रोव्हाईडरपैकी एक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे त्यांच्या परकीय व्यवसायात गती मिळाल्याने नफ्यातही वाढ झाली आहे.

 

या कालावधीत केबीएलचा एकत्रित निव्वळ नफा म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत (क्यू 3), (एफवाय २१) देशांतर्गत आणि जागतिक कामकाजात तेजी आल्याने त्या पार्श्वभूमीवर कमालीची वाढ झाली. कोविड 19 या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळविल्यानंतर जगभरातील उद्योगधंदे सुरू झाले. लॉकडाऊन हळूहळू उठविल्याने कामकाजाला सुरुवात झाली. त्यामुळेच, तिसर्या तिमाहीत केबीएलचा नफा 174 टक्क्यांनी वाढला, जो दुसऱ्या तिमाहीच्या (क्यू २) निव्वळ नफ्याच्या तुलनेत 70.4 कोटीने वाढून थेट  25.7 करोडोंचा नफा झाला.

 

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे की, 2019-20 या आर्थिक वर्षातील तिमाहीतील केबीएलचा निव्वळ नफा संपूर्ण  71.9  कोटी रुपयांच्या जवळपास होता आणि 2019-20 (वित्तीय वर्ष २०)  च्या तिमाहीचा निव्वळ नफ्यातही घट झाली.  केबीएलच्या तिमाहीतील एकूण उत्पन्नात 18.8 टक्क्यांनी वाढ झाली असून ती एकूण उत्पन्नाच्या तुलनेत 772.4 कोटी रुपये इतकी होती आणि दुसऱ्या तिमाहीचा नफा 649.9 इतका होता.

 

किर्लोस्कर ब्रदर्स इंटरनेशनल बिझिनेस व्हर्टिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक किर्लोस्कर यांच्या मतेआम्ही नफा वाढवण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित करून व्यवसाय केला आहे. परदेशी व्यवसायाच्या वाढत्या योगदानामुळे केबीएलला वित्तीय वर्ष 2019-20 च्या मागील आर्थिक वर्षातील तिमाही निव्वळ नफा ओलांडण्यास सहाय्य केले. ”

 

जागतिक बाजारात केबीएलला मोठ्या प्रमाणात विकासाची संधी दिसते. 2000 सालापासून कंपनीने चार देशांत अधिग्रहण सुरू केले आहेत आणि आता लंडन, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, अमेरिका आणि थायलंड या देशांमध्ये सहा जागतिक उत्पादन सुविधा पुरवित आहोत. जगभरातील 165 देशांमध्ये आणि 18 उत्पादनांमध्ये केबीएलचे स्थान आहे.

 

मागील वर्षाच्या वार्षिक अहवालानुसार, केबीएलने सहाय्यक कंपन्या व संयुक्त प्रकल्पांमध्ये 297.9 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीकडे सध्या एक परदेशी उपकंपनी असून 18 स्टेप-डाउन परदेशी सहाय्यक कंपन्या आणि एक परदेशी संयुक्त उद्यम कंपन्यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth