मेकॅनिकल माइन लेयर - सेल्फ प्रॉपेल्ड’च्या (एमएमएल-एसपी) उत्पादनासाठी ‘डीआरडीओ’कडून ‘गोदरेज अँड बॉइस’ कंपनीला ‘एअरो इंडिया 2021’मध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण परवाना करार (एलएटीओटी) सुपूर्द

 मेकॅनिकल माइन लेयर - सेल्फ प्रॉपेल्डच्या (एमएमएल-एसपी) उत्पादनासाठी डीआरडीओकडून गोदरेज अँड बॉइस’ कंपनीला एअरो इंडिया 2021मध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण परवाना करार (एलएटीओटी) सुपूर्द

·         एलएटीओटीमुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेस चालना

·         संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व सशस्त्र दलांच्या क्षमता वाढविण्यासाठी स्वावलंबनावर जोर देऊन मदतीसाठी तयार

 

मुंबई23 फेब्रुवारी2021 : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, गोदरेज अँड बॉ हिचा व्यवसाय असलेल्या गोदरेज प्रीसिजन इंजिनिअरिंगला संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ प्रयोगशाळेकडून मेकॅनिकल माईन लेयर, सेल्फ प्रॉपेल्ड (एमएमएल-एसपी) या यंत्राच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा परवाना करारनामा (एलएटीओटी) प्राप्त झाला आहे. एअरो इंडिया 2021 येथे बंधन सोहळ्यामध्ये हा करारनामा गोदरेज प्रसिजन इंजिनिअरिंगला सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहचीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावततिन्ही सैन्य दलांचे प्रमुखसंरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी आणि संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव राज कुमार यांच्यासह संरक्षण खात्यातीलकर्नाटक सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारीतसेच संपूर्ण देशातील अनेक उद्योजक उपस्थित होते.

मातीच्या वेगवेगळ्या स्वरुपानुसारजमिनीत रणगाडा-विरोधी भू-सुरुंग पेरण्यासाठीते झाकून त्यांची अचूक नोंद ठेवण्याच्या दृष्टीने एमएमएल-एसपीची रचना करण्यात आली आहे. संरक्षण खात्याच्या कामकाजात हे यंत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि भारताच्या सीमांचे संरक्षण करणार आहे. गोदरेज प्रीसिजन इंजिनिअरिंगकडे अत्याधुनिक उत्पादन सुविधाकडक गुणवत्ता नियंत्रण  चाचणी प्रणाली यांची उपलब्धता आहेयांबरोबरच संरक्षण खात्यासाठीची अनेक उत्पादने भारतात प्रथमच बनविण्याचा अनेक दशकांचा अनुभवही आहे. त्यामुळे एमएमएल-एसपी हे यंत्र कंपनीला लवकर बनविता आले आणि संरक्षण खात्याकडे ते लवकर सुपूर्द करता आले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी जनतेला संबोधित करताना म्हटले, बंधन ही योजना सार्वजनिक-खासगी भागीदारी या संकल्पनेचे एक चांगले उदाहरण आहे. कोणत्याही क्षमतेचा मूळ स्रोत हा तिच्या पायापासून निर्माण होतो आणि आमच्या धोरणाचा हा पाया संशोधन आणि विकाससार्वजनिक व खासगी संरक्षण उत्पादन आणि संरक्षण निर्यात या तीन स्तंभांवर उभा आहे. संरक्षण संबंधित वस्तूंच्या निर्मितीस भारतातच प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. 2022 पर्यंत किमान दोन अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याची संरक्षण आयात कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आयातीसंबंधीची निगेटिव्ह लिस्ट ही देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला संधी देण्याच्या दृष्टीकोनातून बनविण्यात आली आहे. या संधीमधून देशी उद्योगांना आपला पाया मजबूत करता येईल व आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावता येईल.

डीआरडीओ मुख्यालयातील डीआयआयटीएम विभागाचे संचालक आणि जी श्रेणीचे शास्त्रज्ञ डॉ. मयंक द्विवेदी म्हणाले, डीआरडीओचे विविध उपक्रम व प्रकल्प यांमध्ये गोदरेज हा आमचा महत्त्वाचा उद्योजकीय भागीदार आहे. अनेक प्रकल्पांमध्ये व उपक्रमांमध्ये गोदरेजने दिलेल्या योगदानाची डीआरडीओला जाणीव आहे. डीआरडीओला विश्वास वाटतो की या एलएटीओटीमुळे आपली देशांतर्गत संरक्षण-उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात बळकट होणार आहेचत्याशिवाय आमच्यातील भागीदारी आणखी काही दशके टिकून राहणार आहे.

गोदरेज अँड बॉचे औद्योगिक उत्पादन गटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ शुक्ला म्हणाले, “डीआरडीओबरोबर तीन दशकांहून अधिक काळ भागीदारीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. एमएमएल-एसपीसारख्या अतिशय महत्त्वाच्या यंत्रणेच्या उत्पादनाबाबत डीआरडीओने आमच्यावर विश्वास ठेवलात्यामुळे आमचा गौरव झाला आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आमचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आमचा या क्षेत्रातील अनेत दशकांचा अनुभव यांचे योगदान देणे हे आपले सर्वात महत्त्वाचे व पवित्र कर्तव्य असल्याचे आम्ही नेहमीच मानले आहे. मेकॅनिकल माईन लेयर, सेल्फ प्रॉपेल्ड (एमएमएल-एसपी) या यंत्रासंबंधी एलएटीओटी’ मिळाल्याने आमची डीआरडीओशी असलेली भागीदारी आणखी मजबूत होणार आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गेल्या अनेक वर्षांत गोदरेज अँड बॉइस या कंपनीने डीआरडीओबरोबर विविध प्रकल्पांसाठी यशस्वीरित्या भागीदारी केली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपक’, क्षेपणास्त्र वाहक यांसारखी डिफेन्स लॅंड सिस्टीम्स’, तसेच डायव्हिंग अँड सर्फेसिंग मॅकेनिझम’, ‘हल इक्विपमेंट’, ‘लाइफ राफ्ट कंटेनर इजेक्शन सिस्टीम’, ‘स्टीयरिंग गियर यांसारख्या नौदलासाठीच्या यंत्रणा गोदरेज प्रीसिजन इंजिनीअरिंगने यशस्वीपणे बनविल्या आहेत.

गोदरेज एअरोस्पेस हा गोदरेज अँड बॉइसचा आणखी एक व्यवसाय डीआरडीओबरोबर काम करतो. तो डीआरडीओच्या मिशन क्रिटिकल सिस्टीम विकसित करण्यात मदत करतो. या व्यवसायाला एकदा ब्राह्मोस एअरफ्रेम्स विकसित करण्यासाठी आणि दुसऱ्यांदा, एलसीएसाठी पॉवर टेक ऑफ (पीटीओ) शाफ्ट विकसनाकरीताअशी दोन डिफेन्स टेक्नॉलॉजी अॅबसॉर्प्शन अॅवॉर्ड मिळाल्याचा दुर्मिळ सन्मान मिळालेला आहे.

गोदरेजचे डीआरडीओशी सहकार्य हे केवळ संरक्षण उपकरणांपुरतेच मर्यादीत नाही. कोविड साथीच्या काळात, गोदरेजने व्हेंटिलेटर्स बनविण्यासाठी आवश्यक असणारा प्रोपोरेशनल सोलेनॉइड व्हॉल्व्ह हा महत्त्वाचा घटक विकसीत व वितरीत करण्यातही भाग घेतलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.