जावा 2.1ची स्टाईलबाज एन्ट्री

जावा 2.1ची स्टाईलबाज एन्ट्री

 


मुंबईभारत, 12 फेब्रुवारी, 2021 – जावा 2.1 च्या प्रवेशाची घोषणा करत जावा फोर्टी टू परिवारात तीन देखणे सदस्य दाखल होत आहेत. देशातील रस्त्यांकरिता सज्ज असणाऱ्या मॉडेल लाईन-अपमध्ये आधुनिक रुबाबाची घोषणा करताना क्लासिक लिजंड्सला अभिमान वाटत असून विक्रेत्यांकडे ही उत्पादने उपलब्ध होतील.

2018 मध्ये सुरू झालेला हा प्रवास जावा 42 या ‘रेट्रो कूल क्रांतीला पुढे घेऊन जात आहे. सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्ट्सचा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत रु. 1,83,942 प्रमाणे असेल.   

या नव्याने दाखल होणाऱ्या उत्पादनांविषयी बोलताना क्लासिक लिजंड्सचे सीईओ आशिष सिंग जोशी  म्हणाले की, “आम्ही मागील वर्षी बीएस6 इंजिन घेऊन दाखल झालो. आमच्या मोटरसायकलची कामगिरी आणखी चांगली व्हावी, ती चालवताना बाईकस्वाराने आमचे नाव काढावे या दृष्टीने या नवीन उत्पादनांना 2.1 संबोधन दिले आहे. या नव्याकोऱ्या दिमाखात ग्राहकांना आकर्षित करणारी वैशिष्ट्ये समाविष्ट असून मोठी सीट देण्यात आली आहे, त्यामधील चांगल्या पद्धतीने ट्यून होणारे क्रॉस पोर्ट इंजिन सुखद धक्का देणारे ठरेल.

आमच्या ग्राहकांनी कायमच स्वत:ची सर्जनशीलता स्पष्ट करण्यासाठी 42 चा कॅनव्हास उपलब्ध करून दिला आहे. यातून प्रेरणा घेत आम्ही ‘क्लासिक स्पोर्टस् पट्ट्यांसोबत तीन नवीन रंगसंगती दाखल केल्या आहेत. यामध्ये दर्जेदार अलॉय व्हील तसेच ट्यूबलेस टायर्स आणि ट्रीप मीटर उपलब्ध होतील, तसेच फ्लाय स्क्रीन आणि हेडलँप ग्रील एक्सेसरी  म्हणून मिळतील.जावा आणि फोर्टी टू उत्पादन श्रेणी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना नवीन एक्सेसरी ची निवड करण्याची संधी देखील आहे.”

मोटरसायकलविषयी

उत्कृष्ट कामगिरीला साजेसा रुबाब दिसावा म्हणून मोटरसायकलचे बाह्य स्वरूप ‘स्पोर्टी क्लासिक’ करण्यात आले आहे. तिची नवीन रंगसंगती पहिल्यांदा पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. मोटरसायकलच्या मॅकेनिकल भागांवरील तीन आकर्षक रंग पूर्णपणे काळ्या रंगावर उठून दिसतात. ग्राहकांकरिता ओरीयन रेड, सिरीयस व्हाईट आणि ऑल स्टार ब्लॅक रंग उपलब्ध आहेत. ग्रे क्लासिक स्पोर्टस् स्ट्रीप मोटरसायकलच्या लांबीनुसार आखण्यात आले असून 42 च्या डीएनएमध्ये मुरलेला स्पोर्टी बाज अधोरेखित करतो.

13 स्पोक अलॉय चाकांवर नवीन 42 धावते, प्रामुख्याने मोटरसायकलला नजरेसमो ठेवून याची डिझाईन तयार करण्यात आली. तसेच ट्यूबलेस टायरही दिलेले आहेत. हिच्या क्लासिक स्पोर्टस् देखणेपणाची शोभा बार-एंड मिररमुळे वाढते. सगळे तजेलदार काळ्या रंगात उपलब्ध. आता मोटरसायकल ट्रीप मीटरने सुसज्ज आहे.

या उत्पादनाची आणखी एक लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे लांब सीटज्यामुळे प्रवासाचा आरामदायक आनंद घेणे शक्य होते. सीट पॅन नव्याने डिझाईन करण्यात आले असून आरामदायी प्रवासाची खातरजमा करतात. यावरील कुशन प्रवासाची मजा देऊन जाते. यामधील सस्पेन्शन आणि फ्रेमच्या सेट-अपवर देखील नव्याने काम करण्यात आले असून ग्राउंड क्लिअरन्स सुधारला आहे. ज्यामुळे सर्वोत्तम प्रवासाची संधी मिळते, शिवाय फोर्टी टूची वैशिष्ट्ये प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय करतात.

 

बाईक सफर रोमांचक होण्याच्या दिशेने एक्झॉस्ट स्वरुपावर देखील काम केले असून त्यात ट्वीन एक्झॉस्टची सुविधा आहे, ज्यामुळे बाईक भटकंती अधिक गुंगवणारी ठरते.

हिच्या ब्रेकिंग क्षमता सर्वोत्तम आहेत. सर्व जावा मोटरसायकल या कॉन्टीनेंटल विकसीत एबीएसने सुसज्जित असून मोटरसायकल हाताळणीचा अनुभव अधिक आत्मविश्वास-संपन्न करते.

 

जावाच्या सध्याच्या उत्पादन श्रेणी – जावा आणि फोर्टी टू सुधारीत कामगिरीनिशी या सर्व घटकांनी परिपूर्ण असणार आहेत.

इंजिन

संपूर्ण श्रेणीमध्ये अंतर्बाह्य बदल दिसून येतील-

-    27.33 पीएस उर्जा आणि 27.02 एनएम टॉर्क इतक्या वाढीव क्षमतेचे 293 सीसी लिक्विड कुल्ड आणि फ्युअल इंजेक्टेड इंजिन

-    इंजिनाची आकारमानात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रॉस पोर्ट तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे पहिले एकच सिलेंडर असणारे इंजिन आहे.  या तंत्रज्ञानामुळे उर्जेचा प्रवाह जास्त सुरळीत आणि वायूचा निकास चांगल्या प्रकारे होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून चांगली उर्जा आणि टॉर्क आउटपुट प्राप्त होतो

-    रस्त्याच्या अवस्थेची काळजी न करता सातत्यपूर्ण कार्यक्षमता आणि जास्त स्वच्छ उत्सर्जनासाठी इंजिनमध्ये आता नव्या जागेत बसवलेला लँबडा सेन्सर अंतर्गत आणि बाहेरच्या भागतील बदलावर जास्त प्रभावीरीत्या नजर ठेवतो

-    सुधारित इंधनाद्वारे अगदी सूक्ष्मतम इनपुट्सना प्रतिसाद देण्यासाठी संवेदनशील थ्रॉटल प्रतिसाद निर्माण करण्यात आला आहे

रेव्ह श्रेणीतील एकंदर परिणाम हा जास्त आखीव-रेखीव आहे.  मधल्या श्रेणीत तो लक्षणीय असल्याने जास्त गती देणारा आहे. 

सानुकूलन

मोटरसायकलचा सानुकूलन परिणाम वाढविण्यासाठी क्लासिक लिजंड्समध्ये फ्लायस्क्रीन आणि हेडलॅम्प ग्रील देण्यात आली असून सर्व वितरकांना ते स्वतंत्रपणे विकण्यात येणार आहे.  भटकंती करणाऱ्यांसाठी त्यांना आवडेल अशी आणि रस्त्यावर उपयोगी ठरेल अशी गरजेनुसार तयार करण्यात आलेली सॅडलबॅग देण्यात आली आहे आणि एक्सेसरी श्रेणी आणखी वाढवली गेली आहे.  

ग्राहकांना त्यांच्या आत्ताच्या मोटरसायकसाठी उपयोगी ठरतील असे प्रमाणित 42 मिक्स अलॉय व्हील्स देखील वितरकांकडे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.  

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202