एमटीएआर टेक्नोलॉजिज लि.च्या इक्विटी शेअर्सचा पब्लिक इश्यु 3 मार्च 2021 रोजी खुला होईल
एमटीएआर टेक्नोलॉजिज लि.च्या इक्विटी शेअर्सचा पब्लिक इश्यु 3 मार्च 2021 रोजी खुला होईल
- Rs.574 - Rs.575 दरम्यान प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत असेल, दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 10 (इक्विटी शेअर)
- बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - बुधवार, 3 मार्च 2021 आणि बिड/ऑफर समाप्त होण्याची तारीख - शुक्रवार, 5 मार्च 2021
- किमान बोली (मिनिमम बिड लॉट) 26 समभाग आणि त्यानंतर 26 समभागांच्या पटीत
- फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 57.40 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 57.50 पट आहे.
मुंबई, 25 फेब्रुवारी 2021 : एमटीएआर टेक्नोलॉजिज ही हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनी असून ही कंपनी क्लीन एनर्जी, अणु आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रामधील मिशनसाठी महत्त्वाच्या प्रिसीजन भागांसाठी आणि महत्त्वाच्या असेंब्लीच्या उत्पादन निर्मिती आणि विकासामध्ये कार्यरत आहे. 3 मार्च 2021 रोजी या कंपनीची खुली भागविक्रीसाठी (आयपीओ) बिड/ऑफर खुली करणार आहेत आणि ती शुक्रवारी, 5 मार्च 2021 रोजी समाप्त होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी Rs.574-Rs.575 हा प्राइस बँड आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारक बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (BRLMs) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषी विचार करू शकतात, जे बिड/ऑफर दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 2 मार्च 2021 रोजी असेल. एमटीएआरने बुर रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने 1,851,851 शेअर्सची आयपीओपूर्व प्लेसमेंट घेतली असून अॅक्सिस आणि एसबीआय म्युच्युअल फंडांसह त्यांचे मूल्य Rs. 1,000.00 दशलक्ष इतके आहे.
आयपीओ हा 21,48,149 इक्विटी शेअर्सपर्यंत फ्रेश इश्युअन्स आहे. याचे दर्शनी मूल्य Rs.10 आहे आणि एकूण मूल्य 124 कोटीपर्यंत आहे आणि 8,22,270 इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री करण्याची ऑफर असून त्यांचे एकूण मूल्य Rs.473 कोटीपर्यंत आहे, ज्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी Rs.10 आहे, जे विक्रेत्या समभागधारकांकडून आहे. या फ्रेश इश्युमधून संकलित होणारी रक्कम कंपनीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतांसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी क्षमता ही कंपनीची महत्त्वाचे बलस्थान आहे. या क्षमतेमुळे क्लीन एनर्जी, अणु, अवकाश आणि संरक्षण क्षेत्र या उच्च मूल्य असलेल्या धोरणात्मक व महत्त्वाच्या क्षेत्रांना कंपनी सातत्याने उच्च दर्जाच्या गुंतागुंतीच्या प्रिसीजन मॅन्युफॅक्चर्ड असेंब्लीज आणि सुटे भाग आपल्या ग्राहकांना पुरवू शकते. एमटीएआर टेक्नोलॉजिजच्या महत्त्वाच्या पोर्टफोलिओमध्ये क्लीन एनर्जी क्षेत्रताली तीन प्रकारची उत्पादने, अणु क्षेत्रातील 14 प्रकारची उत्पादने आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रातील 6 प्रकारची उत्पादने समाविष्ट आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये निश्चित वेळेत कठोर गुणवत्ता आवश्यकतांचे पालन करत गुंतागुंतीच्या उत्पादनांची डिलिव्हरी करणे यामुळे एमटीएआरने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल), इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन्स (इस्रो), डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन (डीआरडीओ) आणि ब्लू एनर्जी (यूएसए) यांच्याशी दीर्घकालीन संबंध दृढ केले आहेत.
या इश्युसाठी बीआरएलएम म्हणून जेएम फायनान्शिअल आणि आयआयएफएल सिक्युरिटीज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून आणि सिक्युरिडीज अँड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यु ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर आवश्यकत्ता) नियमनांच्या नियम 6(1) चे अनुपालन करून ही ऑफर देण्यात आली आहे. यात क्वालिफाइड इन्स्टिट्युशन बायरर्सना प्रमाणानुसारी पायाच्या आधारे (क्यूआयबी, क्यूआयबी पोर्शन) नेट ऑफरच्या 50%हून अधिक ऑफर उपलब्ध असणार नाही. त्याचप्रमाणे ऑफर किमतच्या किंवा त्याहून अधिक किमतीच्या वैध बिड्स उपलब्ध झाल्यास सेबी आयसीडीआर नियमनांच्या आधारे नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्सना प्रामाणानुसारी पायाच्या आधारे 15% पर्यंत ऑफर उपलब्ध असेल आणि रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्सना वाटपासाठी 35% पर्यंत ऑफर उपलब्ध असेल.
Comments
Post a Comment