आकाश आयएसीएसटी आता देणार 90% शिष्यवृत्ती

 आकाश आयएसीएसटी आता देणार 90% शिष्यवृत्ती  09 फेब्रुवारी, 2021 - सर्जनशील आणि विद्यार्थीस्नेही नवनवीन उपक्रमासाठी  शैक्षणिक क्षेत्रात ओळखली जाणारी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड, डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चाचणीची तयारी करण्यासाठी सेवा देणारी देशभरात 215 पेक्षा जास्त केंद्र असलेली त्वरीत ॲडमिशन-कम-स्कॉलरशिप टेस्ट (आयएसीएसटी) घेणारी अग्रगण्य संस्था आहे. कल्पकतेने तयार करण्यात आलेली विशेष चाचणी 7 वी ते11 वीच्या हुशार आणि सक्षम विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन सुरक्षितपणे त्यांच्या सोयीनुसार 90% शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनवते. 

परीक्षेची सविस्तर माहिती  

आयएसीएसटी परीक्षा ऑनलाईन असून 60 मिनिटे कालावधीची असेल. 

निवडलेल्या परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत परीक्षा देऊ शकतात. 

पात्र विद्यार्थ्यांना 90% पर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकते. 

इयत्ता 7-11 च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसता येणार  

इयत्ता 12 च्या विद्यार्थ्यांकडे स्पेशल रिपीटर कोर्सची निवड करण्याची संधी.   

  कोविडनंतर शाळा आणि शैक्षणिक संस्था उघडल्यानंतर विद्यार्थी पुन्हा वर्गात जाण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आयएसीएसटी 60 मिनिटांच्या चाचणीनंतर त्यांना हा प्रवास सुरु करण्यासाठी आधीच संधी देत आहे, डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स बनण्याचे त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना सक्षम बनवत आहे. विभिन्न सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आकाशमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी देत आहे. 

या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येईल आणि त्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सविस्तर माहिती मिळेल, आयएसीएसटी सोबत विद्यार्थी त्वरित प्रवेश घेऊ शकतील आणि आकाश च्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाखाली तयारी करू शकतील. अधिक माहितीसाठी  https://iacst.aakash.ac.in/iacstexam वर लॉग ऑन करा. 

क्लासरूम आणि हायब्रीड शिक्षण अशा दोन्ही प्रोग्रामसाठी वैद्यकीय, इंजिनीअरिंग आणि फाउंडेशन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती असेल. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विशेष रिपीटर अभ्यासक्रमांचा पर्याय निवडू शकतील. विद्यार्थी त्यांनी ठरविलेल्या परीक्षेच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजता दरम्यानची कोणतीही वेळ निवडू शकतात.  

2020 दरम्यान आकाश इन्स्टिट्यूटने जीईई आणि एनईईटी या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम निकाल दिला. जेईई ऍडव्हान्स 2020 स्पर्धा परीक्षेत दिल्लीच्या आकाशच्या चिराग फलोरने ऑल इंडिया रँक मध्ये देशभरातून अव्वल (एआयआर 01) स्थान मिळवले, तर आकाशने पुरविलेल्या गुणवत्तापूर्ण अभ्यासामुळे एनईईटी 2020 परीक्षेत टॉप 3 रँक आकाशच्या विद्यार्थ्यांनी पटकावले (शोएब आफताब एआयआर 01, आकांशा सिंग एआयआर 02 आणि स्निखिता टी एआयआर 03) 

आयएसीएसटीच्या शुभारंभाबद्दल बोलताना आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) चे व्यवस्थापकीय संचालक श्री, आकाश चौधरी म्हणाले, "हजारो हुशार विद्यार्थ्यांच्या सोयी आणि सुविधेसाठी एईएसएलने ऑनलाईन त्वरीत ॲडमिशन-कम-स्कॉलरशिप टेस्ट (आयएसीएसटी) सुरू केली आहे. कोविड – 19 आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे आपल्याला जे शिकविले ते विद्यार्थ्यांसाठी सोयीचे आणि डिजिटली वापरण्यायोग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार घरी बसून चाचणी देण्याची आणि झटपट निकाल आणि प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली. आम्ही पात्र विद्यार्थ्यांसाठी 90% शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत आहोत. मला खात्री आहे की विद्यार्थी या संधीचा सर्वोत्तम फायदा करून घेतील. " 

शैक्षणिक यश मिळविणासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कामात मदत करणे हे आकाश संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. नॅशनल अकॅडेमिक टीमच्या नेतृत्वाखाली अभ्यासक्रम आणि कन्टेन्ट डेव्हलपमेंट आणि शिक्षण प्रशिक्षण आणि त्यावर लक्ष ठेवण्याची केंद्रीय व्यवस्था आहे. वर्षानुवर्षे एईएसएलच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि एनटीएसई, केव्हीपीवाय आणि ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवून आपली निवड सार्थ ठरविली आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.