येणाऱ्या महिन्यात एचसीएल टेक्नॉलॉजीज,नागपूर मध्ये १००० कर्मचाऱ्यांचा समावेश करेल

 येणाऱ्या महिन्यात एचसीएल टेक्नॉलॉजीज,नागपूर मध्ये  १००० कर्मचाऱ्यांचा समावेश करेल 


 आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी,एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आज मिहान, नागपूर येथील एचसीएल कॅम्पसमध्ये १००० फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्स ला  रोजगाराची संधी देण्याची घोषणा केली आहे. 

कॉलेज फ्रेशर्ससाठी तसेच कार्यरत प्रोफेशनल्स साठी, सर्वोत्तम कौशल्ये आणि अनुभवासह या जॉबसाठी अर्ज करण्यासाठी हि एक उत्तम संधी असेल. 

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकरचा कॅम्पस एप्रिल २०१८ पासून २००० कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कॉन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित कॅम्पसच्या एलिट लीगचा भाग आहे. 

एचसीएलचे नागपूर येथील केंद्र आता अत्याधुनिक ग्लोबल आयटी डेवलपमेंट सेंटर बनविणे, भर्ती करणे, प्रशिक्षण देणे, तसेच स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यासाठी शाश्वत इकोसिस्टम तयार व ऑपरेट करणे या एचसीएलच्या तत्वज्ञानासारखे आहे. एचसीएल नागपूर, अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस), अनुप्रयोग विकास आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसायावर लक्ष केंद्रित करते. 

एचसीएल नागपुरची  'कम बॅक होम' ही मोहीम नागपुरातील प्रतिभावान लोकांपर्यंत पोहचत, त्यांना त्यांच्या घरी वापस बोलवून ईआरएस,अप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करियर बनविण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच 'स्टे रूटेड' हि मोहीम  पदवीधरांसाठी त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर केंद्रित असून ही मोहीम नवीन  संधींसह नवीन लोकांपर्यंत देखील पोहोचते. 

एचसीएल प्रवेश-स्तरीय नोकरीच्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट कौशल्य-आधारित प्रशिक्षण कार्यक्रम देखील ऑफर करते. एचसीएलसह त्यांचे आयटी करियर सुरु करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार त्यांच्या प्रशिक्षण आणि नोकरीच्या कार्यक्रमांसाठी अर्ज करू शकतात. एचसीएल बारावी, विज्ञान पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील ऑफर करते. 

एचसीएलच्या कर्मचाऱ्यांना एचसीएलच्या बेनिफिटबॉक्स नामक लाभ कार्यक्रमा मध्ये देखील प्रवेश मिळतो. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, एचसीएलच्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणासह,सुविधा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलत आणि अनेक ऑफर देखील प्रदान केली जाते. 

अनुभवी व्यावसायिक जावा, , नेट, सेल्सफोर्स, म्यूलसॉफ्ट, पीएलएम, ऑटोमेशन टेस्टिंग, एंड-यूज़र कंप्यूटिंग, डेटा सेंटर ऑपरेशंस,सर्विस डिलीवरी मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर, प्रोजेक्ट आणि प्रोग्राम मॅनेजर यांसारख्या  लीडरशिप रोल सह मुख्य तंत्रज्ञानामध्ये २-२० वर्षाच्या अनुभवासह एचसीएलमध्ये सामील होऊ शकतात. इच्छुक उमेदवार recruit.nagpur@hcl.com वर त्यांचे रिज्यूमे पाठवू शकतात. 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.