गोदरेजचा लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म गोदरेज ल’फायरचा सामाजिक व्यापार क्षेत्रात प्रवेश, लाइफस्टाइल क्षेत्राशी संबंधित अंतर्गत व बाह्य ब्रँड्सचा करणार समावेश

 

गोदरेजचा लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म गोदरेज लफायरचा सामाजिक व्यापार क्षेत्रात प्रवेश, लाइफस्टाइल क्षेत्राशी संबंधित अंतर्गत व बाह्य ब्रँड्सचा करणार समावेश

मुंबई, 000 फेब्रुवारी – गोदरेज लफायर या गोदरेज समूहाच्या प्रयोगशील लाइफस्टाइल प्लॅटफॉर्मने सामाजिक व्यापार (सोशल कॉमर्स) क्षेत्रात प्रवेश केला असून त्याद्वारे जीवनशैली क्षेत्राशी संबंधित आशय त्याच्या सोशल मीडियावर उपलब्ध केला जाईल आणि ग्राहकांना ब्रँड्सकडून थेट खरेदी करणे शक्य होईल. यासाठी फायरतर्फे गोदरेजसह जीवनशैलीशी संबंधित 40 ब्रँड्स तसे बाहेरच्या, थेट स्पर्धा नसलेल्या ब्रँड्सना वाव दिला जाणार आहे. 14 फेब्रुवारी रोजीपासून हे ब्रँड्स #LiveItUp सेल अंतर्गत फायरच्या व्यापक डिजिटल लाइफस्टाइल प्रयोगाचा फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा भाग बनतील. #LiveItUp सेल 28 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 

गोदरेजचा हा सामाजिक व्यापार उपक्रम प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आलेला प्रकल्प आहे, ज्यात गोदरेज फायर जीवनशैली क्षेत्राशी संबंधित ब्रँडसाठीचा प्लॅटफॉर्म बनणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे गोदरेज व इतर जीवनशैलीविषयक ब्रँड्सकडून ग्राहकांशी लाइव्ह सेशन्स, प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असलेला वेब कंटेंट, युजर – जनरटेडेड (युजीसी) कंटेंट अनबॉक्सिंग, फ्लॅश स्पर्धा आणि सेलच्या माध्यमातून उपलब्ध केले जातील. यामुळे ब्रँड्सद्वारे ग्राहकांना खाद्यपदार्थ, सौंदर्य, रिटेल, फुटवेयर, घरगुती सजावट आणि इंटेरियर्स, उपकरणे, बेबी केयर, वैयक्तिक काळजी घेण्यास मदत करणारी उत्पादने, केसांची काळजी घेण्यास मदत करणारी उत्पादने, स्वास्थ्य, दागिने व अशा विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध होणार आहेत.

या घडामोडीविषयी गोदरेज समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी तान्या दुबाश म्हणाल्या, सध्या उदयोन्मुख टप्प्यात असलेली भारतातील सामाजिक व्यापार बाजारपेठ येत्या काही वर्षांत वेगाने विस्तारणार असल्याचा अंदाज आहे. आम्ही गोदरेज लफायरच्या मदतीने जीवनैली क्षेत्राशी संबंधित ब्रँड्सना थेट ग्राहकांशी जोडण्यास मदत करणार आहोत. ई- कॉमर्सच्या या पुढच्या टप्प्याची क्षमता समजून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या प्रायोगिक प्रकल्पातून मिळालेली शिकवण बाह्य ब्रँड्ससह सर्व 40 ब्रँड्ससाठी समृद्ध करणारी असेल.

गोदरेज एयर, गोदरेज प्रोफेशनल, गुडनेस मी, गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स (ईव्हीई होम कॅमेरा, होम लॉकर्स, यूव्ही केस), गोदरेज लॉक्स (अडव्हांटीस पेन्टाबोल्ट), गोदरेज अप्लायन्सेस, स्क्रिप्ट, गोदरेज इंटेरियो, इंडिया सर्कस, बीब्लंटस गोदरेज एक्सपर्ट, सिंथॉल, गोदरेज प्रोटेक्ट, गोदरेज हिट, गोदरेज यम्मीझ, गोदरेज रियल गुड चिकन, गोदरेज जर्सी, गोदरेज व्हेज ऑइल्स, गोदरेज इंटेरियो किचन, स्किडो बाय गोदरेज, गुडनाइट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज हाउसिंग फायनान्स हे गोदरेजचे काही ब्रँड्स असून ते #LiveItUp सेलमधे सहभागी होतील.

गोदरेजने #LiveItUp सेलच्या माध्यमातून भारतातील ब्रँड्सना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या ब्रँड्समधे पार्क अव्हेन्यू, हँड पेंटेड डिझायनर बॅग्ज पॉल अडम्स, लक्झरी प्रेट ब्रँड एमएक्सएस, विक्रम फडणीस क्लोदिंग इंडिया,

 

ऑनलाइन रिटेलर रिडेसन, फुटवर रिटेलर मायरा, हँडक्राफ्टेड अपॅरल आणि अक्सेसरी ब्रँड ओखई, ईशायरा ज्वेलरी, रेने कॉस्मेटिक्स, ऑरगॅनिक न्युट्रिशन ब्रँड वेलबिईंग न्युट्रीशन, फँटसी चॉकलेट, बॉम्बे आयलंड कॉफी, स्टोरिया फुड्स आणि बेव्हरेजेस, टेक अवे रेस्टॉरंट वरूण इनामदार्स मुंबई लोकल तवा, साउथ स्ट्रीट- साउथ इंडियन कम्फर्ट फूड आणि शुक बॉम्बे – तेल- अविवच्या रस्त्यांवरून थेट मुंबईत यांचा समावेश असेल.

या सहकार्याविषयी एमएक्सएसच्या संस्थापक आणि डिझाइयनर श्वेता बच्चन नंदा म्हणाल्या, फॅशनप्रेमी असलेल्या प्रत्येकाला एमएक्सएसच्या डिझाइन्स आपल्याशा वाटतील. हे गोदरेज एल'अफायरच्या तत्वांशी सुसंगत असून ते आमच्यासाठी आदर्श जीवनशैली भागीदार आहेत. आमच्यासारख्या फॅशन ब्रँड्सना ग्राहकांना प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी सामाजिक व्यवसाय हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. गोदरेज एल'अफायरचे सामाजिक व्यापार ब्रँड्ससाठीचे सामाजिक केंद्र हे आपले स्थान बळकट करेल आणि प्रीमियम जीवनशैली ब्रँड्सवर सर्वोत्तम डील्ससह चांगला आशय समाविष्ट करण्याची संधी देईल.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.