लेग्रँड इंडियाने सादर केली मायरिअस नेक्स्ट जेन

 लेग्रँड इंडियाने सादर केली मायरिअस नेक्स्ट जेन

 

डिझायनिअरिंग आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करत वायरिंग उपकरणांच्या नव्या रेंजमध्ये टाकले पाऊल

 


मुंबई, १७ फेब्रुवारी २०२१ : इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या लेग्रँड इंडियाने आज ‘मायरिअस नेक्स्ट जेन’ ही प्रिमिअम प्रोडक्ट असॉर्टमेंट ही वायरिंग उपकरणांची नवीन रेंज सादर केली. मायरिअस नेक्स्ट जेन आपल्या आधुनिक तंत्रज्ञानासह प्रिमिअम सेगमेंटमध्ये मूल्यनिर्मिती करेल आणि लेग्रँडचे अस्तित्व अधिक बळकट करेल, अशी अपेक्षा आहे. निवासी आणि व्यावसायिक सेगमेंट हे या प्रोडक्ट रेंजचे टारगेट आहे आणि त्यात वास्तुरचनाकार, बिल्डर्स, इलेक्ट्रिशिअन्स, सल्लागार, कंत्राटदार, विकासक, सिस्टिम इंटिग्रेटर्स आणि रिटेलर्स यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

 

लेग्रँड टीमने आपल्या भारतीय संस्कृती आणि वारशापासून प्रेरणा घेत खास रूपचिन्ह कलेक्शन प्लेट्स विकसित केल्या आहेत. उदा. गूढ मिरीचा कोश असलेल्या दक्षिण पश्चिम भारतातील घनदाट जंगलापासून डार्क फेड प्लेट्स प्रेरीत आहेत. केरळ आणि तामिळनाडूमधील विस्तृत मिरीच्या लागवडीपासून घेण्यात आलेले डार्क फेड्स कोणत्याही सामान्य इंटिरिअरमध्ये एक प्रकारची झिंग आणतात. या ठिकाणी आयएमडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून एक वेगळी वाट चोखाळण्यात आली आहे आणि हे या कॅटेगरीमध्ये प्रथमच घडत आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनाची शोभा वाढते आणि ते टिकाऊ होते, त्याचप्रमाणे होम डेकोरच्या आधुनिक शैलीला शोभून दिसते.

 

या उत्पादनांची नवीन रेंज आयओटीचा इंटेलिजन्स वापरून विकसित करण्यात आली आहेत. यात वायरलेस तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्याने ही उत्पादने दूरस्थपणे नियंत्रित करता येतात (घरापासून लांब असतानाही), आवाजाने नियंत्रित करता येतात, अॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात, वीजेच्या वापरावर लक्ष ठेवता येते आणि अलर्ट्स मिळतात. यासह ब्रँड आपल्या ग्राहकांना बचत, सुरक्षितता, सुविधा आणि नियंत्रण यांचे वचन देतो. त्याचप्रमाणे या उत्पादनांमुळे आरामदायीपणा आणि मनःशांती लाभते. लेग्रँडचा आयओटीने सक्षम असलेला होम/अवे वायरलेस मास्टर स्विच केवळ घरातील एक स्विच दाबून किंवा तुम्ही घरी नसताना तुमच्या फोनमधील अॅपवर टॅप करून फोनआपल्या युझर्सना सर्व दिवे, शर्टर्स किंवा सॉकेट्स स्विच ऑन किंवा ऑफ करण्याची सुविधा देतो. या रेंजमधील सर्व उत्पादने अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून रेट्रोफिट करता येतील. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर बदलायची गरज नाही.

 

लेग्रँड इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टोनी बरलँड म्हणाले, “महामारीमुळे २०२० हे संपूर्ण जगासाठी एक कठीण वर्ष होते आणि भारतीय इलेक्ट्रिकल ब्रँडही त्याला अपवाद नव्हते. पण अशा कठीण परिस्थितीतही आम्ही आमच्या कस्टमरसाठी डिझायनिअरिंग आणि तंत्रज्ञानावर भर देणारी वायरिंग उपकरणांची नवीन रेंज सादर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नवीन उत्पादनांचा विकास हा आमच्या वाढीचा अविभाज्य भाग आहे आणि याच तत्वानुसार काम करण्याची आमची योजना आहे. आमच्या मायरिअस नेक्स्ट जेन या नव्या ब्रँडसह प्रीमिअम प्रोडक्ट असॉर्टमेंटची नवीन रेंज सादर केल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”

 

 

लेग्रँड इंडियाच्या मार्केटिंग विभागाचे संचालक श्री. समीर सक्सेना म्हणाले, “नावीन्यतेच्या केंद्रस्थानी ग्राहक असतात यावर लेग्रँडचा मनापासून विश्वास आहे. ग्राहक हेच आमचे प्राधान्य आहेत हे लक्षात घेत आम्ही मायरिअस नेक्स्ट जेन सादर करण्याचे ठरविले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे संभाव्य ट्रेंड्स आणि त्यांच्या भविष्यातील अपेक्षा या विषयी आम्हाला अंदाज बांधता आला. ताज्या आयओटी तंत्रज्ञानासह आमच्या ग्राहकांना सुविधा प्रदान करणे ही या उत्पादन रेंजमागील भावना होती. आमच्या सर्वा ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण अनभव आणि पर्याय प्राप्त व्हावे यासाठी भारतीय वारास आणि समृद्ध संस्कृतीतून प्रेरणा घेऊन आम्ही रूपचिन्हांचे खास कलेक्शन डिझाइन केले.”

 

ग्राहकांचे आरोग्य आणि आरोग्यविषयक स्वच्छता यांना विशेषतः कोव्हिडच्या या परिस्थितीत प्राधान्य देत ब्रँडची संकल्पना मांडण्यात आली आणि प्रेरणा घेण्यात आली. सिल्व्हर आयनची पॉवर लाभलेल्या लेग्रँडने अँटि-बॅक्टेरिअल फीचर तयार केले जे वारंवार स्पर्श केले जाणारे स्विचेस आणि प्लेट्सवरील जीवाणूंची वाढीला प्रतिबंध करते.


लेग्रँड ही जगातील आघाडीची इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग सोल्युशन्स पुरवठादार कंपनी असून त्यांची जागति उलाढाल ५.५ अब्ज युरो एवढी आहे. भारतीय बाजारपेठेत प्रीमिअम वायरिंग उपकरणे आणि एमसीबीमध्ये कंपनी सर्वात आघाडीवर आहे. त्यांची उत्पादने निवासी, कमर्शिअल, औद्योगिक आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात. लेग्रँड इंडियाने त्यांच्या स्मार्ट कनेक्टेड होम उत्पादनांसह पुढील पाऊल टाकले आहे. आयओटी क्षेत्रात पदार्पण करून आपल्या स्मार्ट कनेक्टेड होम उत्पादनांच्याही पूढे झेप घेत आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.