हेरिटेज नोवंडी फूड्सतर्फे योगर्टचा प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड ‘मॅमी योवा’ भारतीय बाजारपेठेत दाखल

 

हेरिटेज नोवंडी फूड्सतर्फे योगर्टचा प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड

‘मॅमी योवा’ भारतीय बाजारपेठेत दाखल

 


 

मुंबई,  हेरिटेज फूड्स प्रा.लिमिटेड आणि नोवंडी फूड्स यांच्या संयुक्त भागीदारीत, २०१७ साली फ्रान्स मध्ये सुरुवात झालेली अँड्रॉसची सहाय्यक कंपनी आपल्या प्रथम वर्गाच्या उत्पादनांसह भारतीय बाजारपेठेत उतरली आहे. मूळ प्रस्थापित कंपन्यांचा नऊ दशकांचा एकत्रित वारसा लाभलेली ही नवी कंपनी: मॅमी योवा, त्यांच्या योगर्ट ब्रँडच्या माध्यमातून भारतीय बाजारासाठी फ्रेंच दही म्हणजे योगर्टच्या पाककृती घेऊन आली आहे. त्या प्रसंगी श्रीमती ब्राह्मणि नारा,  श्रीमती एमिली मौलार्ड आणि श्री. विवेक मणी हजर होते. सुरुवातीच्या टप्प्यात, या ब्रँडची उत्पादने मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद आणि बडोदा या भारतातील ५ शहरांमध्ये उपलब्ध होतील आणि लवकरच याचा विस्तार हैदराबाद आणि बंगलोरपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

 

हेरिटेज नोवंडी फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक मणी म्हणाले की, “दर घासागणिक ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याप्रती मॅमी योवाची उत्पादने कटिबद्ध आहेत. मॅमी योवाचे दूध, ताजी फळे वापरून बनवलेल्या फ्रेंच पाककृती, 'स्टर्ड योगर्ट्स', 'यो पॉप' (एक पिण्यायोग्य दही) ही सर्व उत्पादने म्हणजे चवीने खाणाऱ्या भारतीयांसाठी पोषण आणि पूर्तता याचे एक कमाल मिश्रण आणि अनुभव ठरणार आहे. मॅमी योवा अन्न क्षेत्रातील दोन दिग्गजांचा वारसा आणि कौशल्य घेऊन अविस्मरणीय अनुभवासाठी एक अद्वितीय भागीदारी आणत आहेत. आपले मत व्यक्त करताना हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका श्रीमती ब्राह्मणि नारा म्हणाल्या,  आम्ही पालघर, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे हा भारतीय ग्राहकांसाठी भारतात तयार होणारा ब्रँड ठरणार आहे.’’

 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.