शायकोकॅन, जगातील पहिले विषाणू प्रतिबंधक उपकरण भारतात विकसीत, महासाथी दरम्यान व्यवसाय पूर्वपदावर आणण्यात मोठी मदत

 शायकोकॅन, जगातील पहिले विषाणू प्रतिबंधक उपकरण भारतात विकसीत, 

महासाथी दरम्यान व्यवसाय पूर्वपदावर आणण्यात मोठी मदत

·       हे उपकरण प्रख्यात भारतीय वैज्ञानिक डॉ. राजाह विजय कुमार यांनी विकसीत केले असून याद्वारे घरातील कोरोना विषाणू आणि एन्फ्लूएन्झा विषाणू प्रजातीद्वारे होणाऱ्या धोकादायक फैलावाला अटकाव होणार आहे

·       शायकोकॅन ’ला वैद्यानिक पुरावा असून पृष्ठभागांवर (MS2 Phage) पसरलेल्या 99.994% तर हवेतील (एवियन कोरोना विषाणू) 100% विषाणूंना प्रतिबंध/अटकाव करतो

·       शायकोकॅन या विषाणूंच्या सर्व सध्याच्या आणि आगामी काळातील प्रकार तसेच उत्परिवर्तनांवर प्रभावीपणे काम करते  

·       भारतासोबत परदेशातून या उपकरणाला संस्थात्मक खरेदीदारांकडून मोठी मागणी आहे. या उपकरणाचा वापर भारत, अमेरिका, युरोप, आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेत अगोदरपासूनच सुरू झाला आहे

मुंबई 17 फेब्रुवारी, 2021:- प्रख्यात वैद्यानिक आणि संशोधक डॉ. राजाह विजय कुमार यांनी विषाणू प्रतिबंधक उपकरण विकसीत केले असून त्याच्या साह्याने घरातील जागा, शाळा, महाविद्यालये, घरे कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित ठेवता येतील. तसेच रुग्णालये, हॉटेल, कार्यालये, रेस्टॉरंट, ऑडीटोरियम, परिवहन, विक्री दालने तसेच विमानतळांवरील कामकाज पूर्वपदावर आणण्यास मदत मिळेल. अंतर्गत-बाह्य ग्राहकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देता येणार आहे.

हे शंकूकार आकाराचे उपकरण शायकोकॅन कॉर्पोरेशनने निर्माण केले असून त्याचे पूर्ण नाव स्केलेन हायपरचार्ज कोरोना ककोन असे आहे. हे उपकरण केवळ घरामधील जागेत वाढणाऱ्या कोरोना विषाणूला अटकाव करत नाही तर न्यूमोनिया, एआरडीएस, सार्स, मेर्स, कोव्हीड-19 आणि अन्य कोरोना विषाणू-निर्मीत विकारांना प्रतिबंध करते. तसेच दरवर्षी मोसमी हिवताप आणि स्वाईन फ्लू व बर्ड फ्लू सारख्या साथींना आमंत्रण देणाऱ्या एन्फ्लूएन्झा प्रजातीमधील विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. शायकोकॅन  सध्या अस्तित्वात असलेल्या तसेच आगामी काळातील सर्वच विषाणू प्रकारांचा बिमोड करण्यात मोलाची भूमिका बजावते. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याचे रक्षण होतेच, शिवाय लक्षावधी उत्पादक तासांची हानी रोखणे शक्य होते.

शायकोकॅन कॉर्पोरेशनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अलोक शर्मा म्हणाले की,  “शायकोकॅन घराच्या आत वाढणाऱ्या कोरोना विषाणू तसेच एन्फ्लूएन्झा विषाणूचा 99.994% कार्यक्षमतेने बिमोड करण्यात यशस्वी ठरले आहे. याला विविध जगातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या वायरोलॉजी रिपोर्टचा आधार प्राप्त आहे. या उपकरणाचा कोणताही विपरीत परिणाम मनुष्यांवर दिसून आलेला नाही. या उपकरणाचा अन्य कोणतेही जीवाणू, बुरशीवर परिणाम होत नाही. त्यामुळे पर्यावरणातील सूक्ष्म जीवांचा समतोल साधतो. शायकोकॅन  उपकरणाचा वापर भारतात अगोदरपासूनच होतो आहे. अमेरिकेसह युरोप, आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतही हे उपकरण वापरले जाते आहे. आम्ही आणखी काही देशांत हे मेड-इन-इंडिया उपकरण सादर केले आहे. भारत आणि परदेशातील संस्थात्मक खरेदीदारांकडून या उपकरणाला मोठी मागणी दिसून येते.”  

शायकोकॅनद्वारे कोरोना विषाणू तसेच एन्फ्ल्यूएन्झा विषाणूच्या प्रादुर्भावाला अटकाव करणे शक्य होते. त्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांवर हल्ला चढविण्याच्या विषाणू वृत्तीला आळा बसतो. मानवी पेशी पडद्यावर विषाणूचा नकारात्मक परिणाम होत असतो. मात्र कोरोना विषाणू हा पॉझिटिव्ह चार्ज व्हायरस असून तो मनुष्याच्या शरीरातील प्रोटीनवर हल्ला चढवतो. स्वत:च्या पेशींची हुबेहूब नक्कल तो मानवी शरीरात तयार करतो. शायकोकॅन या विषाणूच्या पॉझिटिव्ह चार्जचे शमन करण्याचे काम करते. ज्यामुळे कोरोना विषाणूची पेशींची नक्कल करण्याची क्षमता संपते आणि तो मनुष्याच्या पेशींशी संपर्क निर्माण करू शकत नाही.

शायकोकॅनचे संशोधक आणि ग्लोबल चेअरमन ऑफ ऑर्गनायझेशन डे स्केलेनचे डॉ. राजाह विजय कुमार यांनी हे खास आणि ठोस उपकरण दशकानुदशकांच्या संशोधनानंतर तयार केले आहे. ते उच्च, तीव्र स्वरुपाचे फोटोन तयार करते. हवेत, टेबल, खुर्ची, भिंती इत्यादींवर असलेल्या ठोस पृष्ठभूमीवरील विषाणूवर हे फोटोन हल्ला चढवते आणि इलेक्ट्रॉन उत्सर्जित करते. कोरोना विषाणू तसेच एन्फ्ल्यूएन्झा प्रकारातील कवचावरील विषाणूंच्या पॉझिटिव्ह प्रोटीनवर हे इलेक्ट्रॉन जोडले जातात.  इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये यासाठी यादिशेने प्रतिबंध प्रक्रिया सुरू होते आणि पॉझिटिव्ह चार्ज शांत केला जातो. शायकोकॅनमुळे एखादी व्यक्ती बाधित पृष्ठभूमीच्या संपर्कात आल्यास विषाणूची शक्ती नष्ट झाल्याने तिला/ त्याला संसर्गाचा धोका राहत नाही. हे शायकोकॅन उपकरण मोठ्या प्रमाणावर संरक्षण पुरवते. फोटोन निर्मिती करणारे या सर्वोत्तम धातू  बिघडत नाही, तो टिकाऊ आहे, त्याला साधारण सर्व्हिसिंगची आवश्यकता असते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth