दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टिकेल, लवकर ओसरेल– न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचे मत
दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टिकेल, लवकर ओसरेल– न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचे मत
26 फेब्रुवारी, 2021: “कोरोना विषाणू – प्रकार आणि लसीकरण” या विषयावर न्यूबर्ग’च्या सदस्य मंडळाच्या झालेल्या चर्चेत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येणार असली तरीही ती पहिल्या लाटेइतकी गंभीर नसेल आणि लवकर विरून जाईल अशी माहिती समोर आली.
अपोलो हॉस्पिटलचे संसर्ग विकार तज्ज्ञ डॉ. व्ही रामसुब्रमण्यम म्हणाले की, “अमेरीका,ब्रिटन, ब्राझील आणि युरोपातील काही अन्य देशांत कोरोना विषाणूंची दुसरी लाट आली आहे. हे अपरिहार्य होते. भारत या परिस्थितीला अपवाद ठरण्याचे काही कारण नव्हते. कदाचित दुसऱ्या लाटेचा प्रभाव हा बहुतांशी सौम्य असेल, कारण आपल्या लोकसंख्येत 60% नागरिक हे युवावस्थेतील आहेत. त्यामुळे आपल्याकडील दुसरी लाट ही ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत सौम्य असेल. काही राज्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, मात्र ती पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल. अल्पावधीतच ती शांत होईल.”
डॉ. व्ही. रवी हे एनआयएमएचएएन येथे न्युरोव्हायरोलॉजीचे माजी प्राध्यापक तसेच जिनोमिक कंफर्मेशन ऑफ सार्स-कोव्ह-2 कर्नाटक सरकारकरिता नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले की, “जर तुम्हाला संसर्ग झालेला नसेल किंवा लस घेतली नसेल तर विषाणू कधीही तुमच्या शरीरात शिरकाव करू शकतो. लवकर अथवा उशीरा, आपल्यापैकी अनेकांना या विषाणूंचा सामना करावा लागणार आहे.”
जेव्हा संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला, त्यावेळी लोक जबाबदारीने वागली. त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण खाली आले. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो, त्यावेळी संसर्गाची सातत्याने चाचणी घेण्यात येते, त्याची नोंद ठेवली जाते आहे, त्याचा शोध घेतला जातो. जेव्हा पहिली लाट ओसरली तेव्हा वातवरणात समाधान आले. ज्यावेळी एखादी श्वसनसंबंधी संसर्गाची लाट येते, त्यावेळी कायमच दुसऱ्या लाटेची शक्यता असते, याला इतिहास साक्षी आहे. याचा अर्थ आपल्याकडे दुसरी लाट येईल. मात्र तिची तीव्रता पहिल्या लाटेप्रमाणे नसेल.”
न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या चीफ मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ. सरन्या नारायण म्हणाल्या की, “काही प्रमाणात दुसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी लस साह्यकारी ठरू शकते.”
Comments
Post a Comment