झंडु च्यवनप्राश द्वारे गुळाच्या नैसर्गिक गुणधर्मासह आणखीन एक नवीन प्रकार लाँच

 

झंडु च्यवनप्राश द्वारे गुळाच्या नैसर्गिक गुणधर्मासह आणखीन एक नवीन प्रकार लाँच 


 

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या नैसर्गिक गुणाने बनलेले, नवीन झंडु  च्यवनप्राश अवलेह जॅगरी (गूळ) मध्ये रिफाइंड साखर नाही आहे तसेच या च्यवनप्राशचे रोज सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती दुप्पटीने वाढेल हे देखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२१ :-  इमामी लिमिटेडच्या घरातून, १०० वर्षांपेक्षा अधिक आयुर्वेदिक कौशल्यासह, विश्वसनीय ब्रँड झंडु ने भारतातील ग्राहकांसाठी पहिल्यांदाच, गुळाच्या नैसर्गिक गुणधर्मांसह,झंडु च्यवनप्राश अवलेहचा नवीनतम प्रकार सादर केला आहे.

सर्वोत्तम ३९ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींनी बनलेले नवीन झंडु च्यवनप्राश अवलेह जॅगरी (गुळ) हे एक प्रामाणिक आयुर्वेदिक रचना आहे आणि जे आयुर्वेदिक साहित्य, सारंगधारा संहिता पासून उत्पन्न करण्यात आले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची रिफाईंड साखर (व्हाईट साखर/ टेबल साखर) नसून हे नैसर्गिक गुळापासून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती दुप्पटीने वाढेल हे देखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

नैसर्गिक गुळाला,आवश्यक जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म पोषक घटक  प्रदान करण्यासाठी  ओळखले जाते.तसेच हे अँटी-ऑक्सिडंट्स वाढविण्यासाठी आणि श्वसन आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत करते. आरोग्य आणि पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून, गुळाला संपूर्ण जगात, रिफाईंड साखरेपेक्षा (व्हाईट साखर/ टेबल साखर)  एक उत्तम पर्याय मानले जाते, कारण रिफाईंड साखरे मध्ये  पौष्टिक मूल्ये कमी असतात तसेच याचे कोणतेही मोठे आरोग्य फायदे देखील नाहीत.

या नवीन ऑफरबद्दल बोलतांना श्री हर्ष व्ही अग्रवाल, संचालक, इमामी लिमिटेड म्हणाले की, वर्तमान काळातील ग्राहक जागरूकता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या उद्दिष्टांसह, ग्राहक आता नैसर्गिक आयुर्वेदिक उपायांबद्दल अधिक जागरूक झाले आहेत ज्यावर ते विश्वास करू शकतील की ते सुरक्षित आहे. च्यवनप्राश एक अतिशय लोकप्रिय आयुर्वेदिक उत्पादन आहे ज्याला  तुमची रोग  प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच तुम्हाला आतून अधिक मजबूत करण्यासाठी ओळखले जाते.झंडु च्यवनप्राश अवलेह जॅगरी(गूळ) हे भारतातील पहिले असे च्यवनप्राश आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.