ग्लेनमार्कतर्फे सुटीब (सुनिटिनिब) बाजारात दाखल

 ग्लेनमार्कतर्फे सुटीब (सुनिटिनिब) बाजारात दाखल


- इनोव्हेटर ब्रँडच्या तुलनेत ९६ टक्के कमी किमतीत उपलब्ध. मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या वाढीचा धोका ५८ टक्क्यांनी कमी होतो

 


 मुंबई, १६ फेब्रुवारी २०२१ः ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, या संशोधनपर आणि ग्लोबल इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल कंपनीने सुटीब, या सुनिटिनिब (अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनने मान्यता दिलेल्या) ओरल कॅप्स्युलची जेनरिक आवृत्ती बाजारात दाखल केली आहे. भारतातील मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांसाठी या गोळ्यांचा उपयोग होणार आहे. इनोव्हेटर ब्रँडच्या तुलनेत ९६ टक्के कमी किमतीत या गोळ्या आता बाजारात उपलब्ध होणार आहेत. ५० एमजी गोळी रु. ७,०००, २५ एमजी गोळी रु. ३६०० आणि १२.५ एमजी गोळी रु. १८४० प्रति महिना एवढ्या कमी किमतीत हे औषध आता उपलब्ध झाले आहे. 

 

मूत्रपिंडाचा कर्करोग (रिनल सेल कार्सिनोमा) हा आजार मूत्रपिंडातील छोट्या ट्यूबच्या लायनिंगमधील पेशींच्या अनियंत्रितपणे वाढीमुळे उदभवणारा आजार आहे. गेल्या दशकामध्ये या आजारावरील संशोधन आणि औषधनिर्माण विकासामध्ये झालेल्या प्रगतीमुळे बरेच बदल झाले आहेत. सुनिटिनिब ही ओरल मल्टि-किनॅसे इन्हिबिटर (एमकेआय) आहे. पेशींची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी त्यासंबंधित एन्झायम्सला लगाम घालण्याचे काम हे औषध करते. प्रगत टप्प्यातील रिनल सेल कार्सिनोमा आणि काही रुग्णांमध्ये आढळणाऱ्या गॅस्ट्रोइन्टेस्टिनल स्ट्रोमल ट्यूमरवरील उपचारांमध्ये त्याचा उपयोग होतो. पॅनक्रियाटिक न्यूरोएन्डाॅक्राईन ट्यूमर्स असलेल्या काही रुग्णांसाठीही हे औषध वापरता येते. 

 

ग्लोबोकॅन २०२० च्या अहवालानुसार, भारतामध्ये रिनल कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास ४० हजार आहे. जलदगतीने पसरणाऱ्या (मेटास्टॅटिक) रिनल कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये उपचार पद्धतींमध्ये गोल्ड स्टँडर्ड म्हणून सुनिटिनिबची ओळख गेल्या दशकभराहून अधिकच्या काळात निर्माण झाली आहे. या रिनल कॅन्सरच्या वाढीचा धोका ५८ टक्क्यांनी कमी करण्यासाठी सुनिटिनिब उपयुक्त ठरल्याचे संशोधनांती दिसून आले आहे. 

 

लाँचविषयी बोलताना, श्री आलोक मलिक, समूह उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड, इंडिया फाॅर्म्युलेशन्स म्हणाले, “ग्लेनमार्कसाठी आॅन्कोलाॅजी हे महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे. प्रगत टप्प्यातील मूत्रपिंडाचा कर्करोग हा क्लिष्ट आजार आहे आणि भारतातील रुग्णांना या आजारावरील मर्यादित उपचार उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणीव आहे. रुग्ण व डाॅक्टरांच्या दृष्टीने परवडणाऱ्या दरात परिणामकारक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ग्लेनमार्क नेहमीच कटिबद्ध आहे.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202