बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेसचा आयुष्मान खुराना ब्रँड अँम्बॅसेडर


बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेसचा आयुष्मान खुराना ब्रँड अँम्बॅसेडरमुंबई, २५ फेब्रुवारी २०२१ :- आता बधाई हो! म्हणण्याची शुभमंगल वेळ आली आहे कारण कोलकाता स्थित इंडियन एफएमसीजी प्रमुख इमामी लिमिटेड ने नवीन वर्ष २०२१ ची सुरुवात एका महत्वपूर्ण समर्थन कराराने केली आहे. इमामी द्वारा लाँच करण्यात आलेल्या, त्यांच्या नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेससाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाची ब्रँड अँम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतातील अग्रणी अँटिसेप्टिक क्रीम ब्रँड,  बोरोप्लस ने मागील वर्षाच्या त्यांच्या हायजिन पोर्टफोलिओच्या अंतर्गत सोप्स आणि हँड वॉशेस लाँच केले आहेत. नॅचरल अँटिसेप्टिक हर्ब्सने युक्त तसेच ९९.९९% जंतू आणि विषाणूंना नष्ट करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यात आलेले,नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेस हे आयुर्वेदिक असून पॅराबेन्स, सिलिकॉन आणि कृत्रिम रंग यांसारख्या हानिकारक रसायनांपासून मुक्त असून हे उत्पादन तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित आहे तसेच दैनंदिन वापरासाठी देखील उपयुक्त आहे. नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेस निम,तुळशी आणि कोरफड  तसेच नीम, निलगिरी आणि मध अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

आयुष्मान खुराना बरोबर या नवीन कराराबद्दल बोलतांना प्रीती ए सुरेका, अध्यक्ष इमामी लिमिटेड म्हणाल्या की, कोविड-१९ महामारीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूक असणे हे अत्यंत आवश्यक बनले आहे. सोप आणि हँडवॉशेस हे स्वच्छतेच्या उत्पादनांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे तसेच प्रत्येकासाठी आवश्यक देखील आहेत. बोरोप्लसने त्यांच्या आयुर्वेदिक, अँटिसेप्टिक आणि हीलिंग इक्विटीच्या गुणधर्मासह ग्राहकांना एक स्वच्छता समाधान प्रदान करण्यासाठी मागील  वर्षी या श्रेणीमध्ये प्रवेश केला जे त्यांना फक्त जंतूपासून मुक्त ठेवणार नाही तर पुरेश्या  मॉइश्चरायजेशनद्वारे त्यांच्या त्वचेची काळजी देखील घेईल. बोरोप्लसच्या या दोन लक्षित प्रकारांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, आम्हाला आयुष्मान खुरानासोबत भागीदारी करण्याबद्दल अत्यंत आनंद झाला आहे. टाइम मॅगझिन द्वारा  २०२० च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आयुष्मानला  केवळ वय आणि लिंग यांच्या पर्यंतच लोकांना प्रोत्साहित करण्यासाठीच नाही तर प्रेक्षकांना विश्वासार्ह, प्रामाणिक आणि सर्वोत्तम सामग्री प्रदान करण्यासाठी देखील ओळखले  जाते. आम्हाला विश्वास आहे कि त्याच्या व्यक्तिमत्वाचा फायदा बोरोप्लस ला नक्की होईल, एक असा  ब्रँड जो  विश्वास आणि काळजीचे प्रतीक आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.