महामारीला सामोरे जाण्यासाठी स्थानिकांचे सबलीकरण करण्यासाठी भारतात लिव्हिंगार्डकेअर्स या उपक्रमाची सुरुवात

 ~पॅडस्क्वॅड यांच्याशी भागीदारी करत मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, आयकर विभाग आणि इतरांना पुनर्वापर करण्यासारखे ५०,००० मास्क्स आणि पुनर्वापर करण्यासारखे ४३,५०० सॅनिटरी नॅपकिन यांचे लिव्हिंगार्ड एजी यांच्यातर्फे सध्या सुरू असलेल्या महामारीला सामोरे जाण्यासाठी स्थानिकांचे सबलीकरण करण्यासाठी भारतात लिव्हिंगार्डकेअर्स या उपक्रमाची सुरुवात


१६ फेब्रुवारी २०२१, मुंबई : या महामारीने जगाच्या चलनवलनामध्ये बदल घडवून आणला आहे. जे पूर्वी ‘नॉर्मल’ समजले जात असे तेही आता बदलले आहे. या जगरहाटीला अचानक खीळ बसली आहे आणि लोकांना आपल्या आप्तेष्टांचे संरक्षण करण्यासाठी लोकांना एकमेकांपासून अंतर ठेवावे लागत आहे. कामावर जाणे, प्रवास करणे, नातेवाईकांना व मित्रांना भेटणे हे सगळे कठीण, धोकादायक झाले आहे किंवा अशक्यच होऊन बसले. आपल्यापैकी काहींना घरी बसून राहणे शक्य असले तरी अनेकांना ही चैन परवडण्यासारखी नव्हती. आपल्याला सुरक्षित व निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे समाजातील घटक म्हणजेच आपले डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी, दुकानदार, कचरावेचक, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि अशा प्रकारची कामे करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या प्रकारामुळे दररोज या विषाणूचा सामना करावा लागत होता. कोव्हिड-१९पासून या व्यक्तींना सर्वोत्तम संरक्षण प्रदान करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या लिव्हिंगार्ड एजी या ब्रँडने पॅड स्क्वॅडसोबत भागीदारी केली आणि  लिव्हिंगार्डकेअर्स (LivinguardCARES) या जागतिक पातळीवरील उपक्रमांतर्गत पुनर्वापर करण्याजोगे ५०,००० अँटिव्हायरल मास्क्स आणि पुनर्वापर करण्याजोगे ४३,५०० अँटिमायक्रोबिअल सॅनिटरी नॅपकीन्स - ‘साफकिन्स’चे वाटप करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस खात्याचे विविध विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका, राज्य महिला विकास संस्था, आयकर विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना हे वाटप करण्यात येईल. तसेच लाभार्थींमध्ये झोपडपट्ट्यांमधील रहिवासी आणि त्या परिसरातील दुकानदारांचाही समावेश आहे. लिव्हिंगार्ड तंत्रज्ञानाने प्रक्रिया केलेल्या कापडाने SARS-CoV-2 सह (कोव्हिड-१९ साठी कारणीभूत ठरणारा विषाणू) ९९.९ टक्के जीवाणू व विषाणू नष्ट होतात असे बर्लिनमधील फाये उनिव्हर्सिटॅट आणि अॅरिझोनामधील पर्यावरण विज्ञान विभागातील संशोधकांनी सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे ते ६ महिन्यांपर्यंत धुवून वापरता येऊ शकतात, म्हणजेच २१० सिंगल-युझ (एकल-वापर) मास्क्सच्या ऐवजी वापरले जाऊ शकतात.


या उपक्रमाबद्दल माहिती देताना लिव्हिंगार्ड एजीचे संस्थापक, इन्व्हेंटर आणि सीईओ श्री. संजीव स्वामी म्हणाले, “आपल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना दररोज या विषाणूला सामोरे लागते. या आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपण सर्वाधिक मदत केली पाहिजे असे लिव्हिंगार्डमध्ये आम्हाला वाटते. आमच्या तंत्रज्ञानामुळे SARS-CoV-2चे ९९.९% विषाणू नष्ट होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे आणि लिव्हिंगार्ड तंत्रज्ञानयुक्त मास्क्स जगभरातील कोव्हिडयोद्ध्यांचे संरक्षण करत आहे. आमचे मास्क धुता येण्यासारखे आणि पुनर्वापर करण्याजोगे असतात आणि बहुधा ते सुती असतात, त्यामुळे इको-फ्रेंडली तसेच शाश्वत असतात. संशोधन दाखवते की, जर १० लाख व्यक्तींनी एक रियुझेबल लिव्हिंगार्ड मास्क २१० वेळा (६ महिन्यांपर्यंत) वापरला तर आपण ३६,००० टन कचरा होण्याला प्रतिबंध करू शकतो. आमचे मास्क आठवड्यातून एकदा फक्त पाण्याने धुण्याची आवश्यकता असते आणि म्हणून ते ६ महिने टिकतात. आमचे ‘साफकिन्स’मध्येही  या रियुझेबल, धुण्यासारख्या पिरियट पँटिज आणि नॅपकिन्स यांच्यातही लिव्हिंगार्डच्या क्रांतिकारी अँटिमायक्रोबिअल तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ मिळतो.  फक्त दोन साफकिन्स महिलांना आणि मुलींना संपूर्ण वर्षासाठी सॅनिटरी संरक्षण देऊ शकतात आणि पर्यावरणावर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करतात. वैयक्तिक आरोग्य आणि पृथ्वीचे आरोग्य हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत, अशी लिव्हिंगार्डमध्ये आमची धारणा आहे आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाचा हाच पाया आहे. पॅडस्क्वॅड, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, आयकर विभाग आणि सागरी मंडळाशी ही ऐतिहासिक भागीदारी केल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या निमित्ताने निरोगी आणि अधिक शाश्वत भविष्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यासाठी खासगी, सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रे एकत्र आली आहेत.”


बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पी. वेलरसू म्हणाले, “लिव्हिंगार्ड, पॅडस्क्वॅड आणि ‘लिव्ह टू गिव्ह’शी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मुंबईच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण लिव्हिंगार्डचे वैशिष्ट्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण अँटिव्हायरल मास्क्स करू शकतील. लिव्हिंगार्डच्या प्रवर्तक तंत्रज्ञानामुळे मास्क्सचा ६ महिने पुनर्वापर करता येतो आणि ते धुता येतात. त्यामुळे पारंपरिक, एकल-वापर मास्कमुळे होणाऱ्या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. लोकांचे आणि ग्रहाचे संरक्षण करण्याच्या आमच्या लढ्यामध्ये लिव्हिंगार्ड सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे.”


मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक म्हणाले, “लिव्हिंगार्डचे नावीन्यपूर्ण अँटिव्हायरल मास्क्स संरक्षण पुरवतील, आमच्या दलाला कवच प्राप्त करून देतील आणि आपली जबाबदारी पार पाडताना त्यांना सुरक्षित ठेवतील. ही अत्यंत अनपेक्षित परिस्थिती आहे आणि लिव्हिंगार्ड, लिव्ह टू गिव्ह आणि पॅडस्क्वॅडसारख्या भागीदारांसह आपण एकत्र काम करून अधिक बळकट होऊ शकतो. क्रांतिकारी पुनर्वापर करता येण्याजोगे सॅनिटरी नॅपकिन्स, साफकिन्स हे सुद्धा आमच्या दलातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, जेणेकरून त्या जबाबदारी पार पाडत असताना उत्तम आरोग्य आणि हायजीन राखू शकतील. या फलदायी आणि दीर्घकालीन सहयोगाबद्दल आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24