पंजाब नॅशनल बँकेने ई-डीलरच्या वित्तपुरवठ्यासाठी इंडियन ऑइलशी सामंजस्य करार केला

 पंजाब नॅशनल बँकेने ई-डीलरच्या वित्तपुरवठ्यासाठी इंडियन ऑइलशी सामंजस्य करार केला

 

इंडियन ऑईल डीलर्सना कमी व्याज दरावर आर्थिक उपाययोजना प्रदान केल्या जातील

 

मुंबई, 11 फेब्रुवारी 2021: देशातील सर्वात मोठी सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने आज इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर द्विपक्षीय (सामंजस्य करार) केला. त्याअंतर्गत इंडियन ऑईल डीलर्सच्या आर्थिक गरजा भागवल्या जातील. या सामंजस्य करारांतर्गत इंडियन ऑईलच्या विक्रेत्यांना पीएनबी ई-डीलर योजनेद्वारे शून्य मार्जिनने कोणत्याही जामिनाशिवाय कमी व्याज दराने कर्ज दिले जाईल.

या कराराच्या निमित्ताने एमएसएमई विभाग पंजाब नॅशनल बँकचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. राजीव पुरी म्हणाले, हा सामंजस्य करार आमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण “कोरोना साथी नंतर मागणी वाढत असून या मागणीची पूर्तता करण्यासाठी एमएसएमई क्षेत्र देशाच्या वाढीला हातभार लावण्यासाठी पुढे येत आहे  पीएनबी आपल्या श्रेणीतील चांगल्या  ई-डीलर योजनेत विविधता आणि गरजा-आधारित उत्पादनांसह इंडियन ऑइलच्या सहकार्याने ऑफर करत आहे, जे डीलरशिपच्या आर्थिक संरचनेत झालेल्या नवीन बदलाचे साक्षीदार ठरू शकतात. या प्रकारातील हा पहिला करार आहे जो भविष्यात आवश्यकतेनुसार आर्थिक उत्पादने सादर करण्याचा मार्ग मोकळा करेल आणि पीएनबी 2.0 पॉलिसीला वेगळी दिशा देईल. "

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.