ई फोर्स - बिल्डर्स, कंत्राटदार आणि कामगारांचा त्रिवेणी संगम रिअल इस्टेट उद्योगक्षेत्राच्या अडचणी होणार दूर

 ई फोर्स  - बिल्डर्स, कंत्राटदार आणि कामगारांचा त्रिवेणी संगम 

रिअल इस्टेट उद्योगक्षेत्राच्या अडचणी होणार दूर

 

मागील दशकापासून भारतीय रिअल इस्टेट उद्योगाला मोठा संघर्ष करावा लागतो आहे. मोठ्या-मोठ्या कंपन्या  तंत्रज्ञानासमवेत ताळमेळ राखण्यात अयशस्वी होत आहेत. कामगार पुरवठा सुरळीत न झाल्याने योजना वेळेवर पूर्ण करणे शक्य झालेले नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेतील विद्यापीठात संगणक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आशुतोष कात्याल यांनी आपल्या देशातील बिल्डर्स, कॉंट्रॅक्टर आणि कामगारांकरिता एका मोबाईल अॅपचा विचार केला. ज्यामुळे एकमेकांसोबत ताळमेळ राखणे सुलभ होईल. कात्याल यांनी हा विचार करून रिअल इस्टेट मार्केट प्लस ई फोर्स अॅपची निर्मिती केली आणि ते कंपनीचे सीईओ पद भूषवत आहेत. तंत्रज्ञानाने युक्त हे मोबाईल अॅप्लिकेशन अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपच्या साह्याने बिल्डर्स त्यांच्या वास्तविक वेळेच्या आधारावर गरजांनुरूप कामगारांचे कंत्राटदार शोधण्यात मदत करणार असल्याची माहिती कात्याल यांनी दिली.


या मंचाच्या माध्यमातून सर्वसाधारण कंत्राटदार आणि विकासक आपला प्रकल्प या मोबाईल अॅपवर नोंदवू शकतो. आपल्या गरजांप्रमाणे कॉंट्रॅक्टरचा शोध घेऊ शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, वास्तविक वेळेत पूर्ण देशात सुरू असलेले प्रकल्प आणि उपलब्ध कामाची माहिती सबकॉंन्ट्रॅक्टर्सना उपलब्ध होईल, त्याप्रमाणे ते आवश्यकतेनुसार कामकाजाचे लक्ष्य गाठू शकतात.   

याविषयी अधिक माहिती देताना कात्याल यांनी सांगितले की, सर्वसामान्य कंत्राटदार आणि कामगारांना नोंदणीकरण करण्याकरिता केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हे अतिशय सरळ आणि सोपे आहे. सर्वसाधारण कंत्राटदार आणि लेबर कॉंन्ट्रॅक्टरला या अॅपवर नोंदणीकरण करण्याकरिता आपले पॅन कार्ड आणि जीएसटी विवरण नमूद करावे लागेल. पुढे त्यांनी सांगितले की, हा मंच इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे. यावर तुमचा डेटा शंभर टक्के गोपनीय राहतो. 


हा मंच बिल्डरना त्यांच्या प्रकल्पाकरिता शोध घेण्यास साह्य करतो. कात्याल यांनी सांगितले की, या अॅपचा वापर करणाऱ्या सर्वच कामगार कंत्राटदारांचे केव्हायसी वेरीफिकेशन पूर्ण झाले आहे. आपल्या मंचावर कामगार कंत्राटदाराचे नोंदणीकरण करताना भरपूर सावधगिरी बाळगली जाते. व्यावसायिक मानकांचे पालन करण्यात येते. ज्यावर उपभोक्त्याला गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होतात. त्यांचा अॅपवर विश्वास आहे.

हे अॅप लाईव्ह झाल्यानंतर 6 महिन्यांत ओबेरॉय रियल्टी, कॅपेसिटे  इंफ्राप्रोजेक्ट आणि टाटा प्रोजेक्ट यासारख्या सन्माननीय कंपन्यांनी साईटवर स्वत:ला  नोंदवले आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर 40 हून अधिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये याचा वापर होतो आहे.  

ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे सर्वात मोठे राज्य आहे. इथे प्रतिभावंतांची कमतरता नाही. त्यामुळे राज्यात सामान्य कंत्राटदाराला कुशल कामगार उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामान्य कंत्राटदार आणि विशेषता प्राप्त विक्रेत्यांदरम्यान असलेली दरी कमी करण्यासाठी साह्य मिळेल.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth