कोटक स्टँडर्ड मल्टिकॅप फंडाचे नाव आता कोटक फ्लेक्सिकॅप फंड

 कोटक स्टँडर्ड मल्टिकॅप फंडाचे नाव आता कोटक फ्लेक्सिकॅप फंड


मुंबई, 22 फेब्रुवारी 2021: कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (KMAMC) ने आज त्यांच्या कोटक स्टँडर्ड मल्टिकॅप फंडाचे नाव बदलून कोटक फ्लेक्सिकॅप फंड करत असल्याची घोषणा केली. सेबीच्या वर्गीकरण नियमानुसार मल्टिकॅप फंडाने त्यांचा किमान 25 टक्के वाटा प्रत्येकी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणे अनिवार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. फ्लेक्सिकॅप फंडात मात्र किमान 65 टक्के असेट इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणुकीत टाकणे अनिवार्य आहे. मात्र यात लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅपमध्ये प्रत्येकी किती गुंतवणूक करावी, यावर बंधन नाही. या फंडामध्ये बाजारपेठीय कॅपिटलायझेशनप्रमाणे वैविध्यतेची लवचिकता आहे.

कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनीच्या इक्विटी विभागाचे अध्यक्ष आणि सीआयओ हर्ष उपाध्याय, ते या फंडाचे व्यवस्थापनही पाहतात, म्हणाले, "यातील गुंतवणूक प्रक्रिया, पोर्टफोलिओचे प्रमाण आणि अपेक्षित धोके/परतावे कायम राहतील. त्यामुळे यापुढेही गुंतवणूकदारांना आमच्या गुंतवणूक तत्वज्ञान आणि दृष्टिकोनावर विसंबून राहता येणार आहे. आता कोटक फ्लेक्सिकॅप फंड या नव्या नावामुळे आपल्याला विविध बाजारपेठीय कॅपिटलायझेशन विभागांतून निवड करण्याची अतिरिक्ति लवचिकता लाभेल."

"इक्विटी बाजारपेठेत गुंतवणूक करणे म्हणजे दीर्घकाळ संयम राखून इक्विटीजच्या एकूण क्षमतांचा लाभ घेण्याचा अनुभव आहे. लघुकालीन धोके टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी एसआयपी/एसटीपीच्या माध्यमातून आपल्या गुंतवणुकीत वैविध्य आणावे," असे हर्ष म्हणाले.

हा फंड यापुढेही बॉटम-अप स्टॉक पिक्ससोबत टॉप-डाऊन सेक्टरल दृष्टिकोन अंगिकारेल. तसेच स्टॉक पातळीवर हा फंड यापुढेही विशिष्ट सेक्टर अलॉकेशन अंगिकारेल. सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये सायलिकल आणि डिफेन्सिव्ह स्टॉकचा योग्य मेळ साधण्यात आला आहे तसेच यातील लार्ज-कॅपचा वाटा एकूण फंडाच्या सुमारे तीन चतुर्थांश (29 जानेवारी 2021 रोजी) आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.