‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सिल्व्होस्टाईल ज्वेलरीवर आकर्षक ऑफर भारतातील सर्व पीएनजी दालनांमध्ये ही ऑफर उपलब्ध

‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सिल्व्होस्टाईल ज्वेलरीवर आकर्षक ऑफर

भारतातील सर्व पीएनजी दालनांमध्ये ही ऑफर उपलब्ध

6 फेब्रुवारी 2021 :  ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे भारतातील सर्व दालनांमध्ये निवडक सिल्व्होस्टाईल सिल्व्हर ज्वेलरीवर 25 टक्के सवलतीच्या अनोख्या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी असलेल्या सिल्व्होस्टाईल या चांदीच्या दागिन्यांमध्ये लक्ष वेधून घेणा-या आकर्षक डिझाईन्सचा समावेश आहे. चांदीच्या दागिन्यांची युवा पिढीमध्ये अत्यंत लोकप्रियता दिसून येत आहे. 

ब-याच काळापासून प्रथम खरेदीदार युवा तसेच जोडप्यांना चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण आहे. 92% शुद्ध चांदीचे दागिने कोणत्याही स्टाईल स्टेटमेंटला शोभून दिसतात आणि कोणत्याही विशेष प्रसंगी भेट देण्यासाठी अत्यंत योग्य असतात, या कारणांमुळे अनेक वर्षांपासून नवीन पिढीमध्ये चांदीच्या दागिन्यांची लोकप्रियता दिसून येते. पहिल्यांदाच खरेदी करणा-यांना चांदीचे दागिने ही परवडणारी वस्तू असते. सिल्व्होस्टाईल ज्वेलरीची किंमत रूपये 250 पासून पुढे आहे.

आकर्षक, सुंदर डिझाईन्स आणि टिकाऊपणा यामुळे चांदीचे दागिने तरुण पिढीसाठी नेहमीच पसंतीचे ठरले आहेत. आपल्या प्रियजनांना चांदीचे दागिने भेटवस्तू देण्यासाठी योग्य पर्याय आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ब्रँडला आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी विशेष करायचे होते. ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘‘आम्ही ही नवीन ऑफर सुरू करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत असेल. आम्ही आशा करतो की, आमच्या ग्राहकांना ही नवीन ऑफर नक्कीच आवडेल, जी यापूर्वी इतक्या कमी मूल्यांमध्ये सादर केली गेली नाही. आमच्या डिझाईन्सची विस्तृत श्रेणी एकीकडे आमच्या ग्राहकांना पसंतीसाठी आणि विशेष प्रसंगी भेटवस्तू अनेक पर्याय देऊ करेल! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने, आम्हाला खात्री आहे की ग्राहक हे केवळ दीर्घकालीन मूल्यासाठी या भेटवस्तू घेत नाहीत तर त्याद्वारे एक संदेश देखील पोहचवितात. एकीकडे ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ आला असताना, ही नवीन ऑफर उत्साहवर्धक आहे

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.