टेंडरकट्सने पॅरागॉन पार्टनर्स आणि नॅबव्हेंचर्स यांच्या नेतृत्वात १५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला

 टेंडरकट्सने पॅरागॉन पार्टनर्स आणि नॅबव्हेंचर्स यांच्या नेतृत्वात

 १५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारलामुंबई, ८ फेब्रुवारी २०२१: टेंडरकट्स या भारतातील एकमेव ओमनीचॅनेल मीट आणि सीफुड ब्रॅण्डने आज सिद्धार्थ पारेख आणि सुमीत निंद्राजोग यांनी स्थापन केलेल्या पॅरागॉन पार्टनर्स या मिड-मार्केट पीई फंड कंपनीच्या नेतृत्वाखाली तसेच नॅबव्हेंचर्स या नाबार्डचा पाठिंबा असलेल्या अग्रणी कृषी खाद्य टेक व्हीसीचा सहभाग असलेल्या फेरीमध्ये रुपये ११० कोटींचा (१५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) निधी उभारल्याची घोषणा केली.


या निधीतून टेंडरकट्सला सध्याचे कामकाज वाढविण्यास तसेच सेंद्रिय आणि असेंद्रिय विकासाच्या संधींचा पाठपुरावा करण्यास वाव मिळेल. तसेच या निधीमुळे कंपनीला आपल्या पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधेमध्ये इनोव्हेशनला पाठिंबा देण्यासाठी आणि उत्पादने तसेच सेवांच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

निशांत चंद्रन यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेली, टेंडरकट्स भारतात मांस आणि सीफूडची विक्री करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवत आहे. भारतीय ग्राहक ताजे (कधीही न गोठविलेले) मांस आणि सीफूड पसंत करतात. तसेच, बरेच ग्राहक त्यांच्या मांस आणि माशाच्या तुकड्यांच्या बाबतीत विशिष्ट पसंती दर्शवितात. टेंडरकट ग्राहकांना त्यांच्या खास शेजारच्या दुकानात ताजे कापलेले मांस आणि सीफूड पुरवतात जे केवळ वॉक-इन ग्राहकांनाच नाही तर ऑनलाइन खरेदीदारांना देखील उपलब्ध करून देतात. हे सर्व स्वतःच्या तंत्रज्ञानाद्वारे संपूर्णपणे एकत्रित पुरवठा शृंखलाद्वारे चालविले जाते.


भारतातील मांस आणि समुद्री खाद्य बाजारपेठेचे मूल्य १०० अब्ज डॉलर्स आहे, तथापि, ९५% पेक्षा जास्त बाजार असंघटित आहे. गुणवत्ता, आरोग्य, स्वच्छता आणि सुविधा यावर लक्ष केंद्रित करणार्‍या लोकांची संख्या वाढल्यामुळे या महारामारीच्या कालावधीमध्ये संघटित मांस विभागातील व्यवसायाला प्रचंड चालना मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.