अमृत विश्व विद्यापीठमतर्फे यूजीसी-मान्यताप्राप्त ऑनलाइन पूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू

 अमृत विश्व विद्यापीठमतर्फे यूजीसी-मान्यताप्राप्त 

ऑनलाइन पूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू 


 

  • अमृत अहेड असे ब्रँडिंग असलेले हे अभ्यासक्रम अंडर-ग्रॅज्युएट्सफ्रेश ग्रॅज्युएट्स आणि वर्किंग प्रोफेशनल्ससाठी आहेत आणि विद्यापीठाच्या ऑन-कॅम्पस पदव्यांचा समतुल्य आहेत. 
  • अमृतच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांसह विद्यार्थी काही सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसह द्विपदवी प्राप्त करू शकतात आणि इंटरनॅशनल एक्स्चेंज आणि परदेशातील प्लेसमेंट संधींचा लाभ घेऊ शकतात 
  • विद्यापीठाच्या ९५ टक्क्यांहून अधिक प्लेसमेंट रेकॉर्ड असलेल्या करिअर साहाय्य कार्यक्रमाकडून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सपोर्ट मिळतो. 

 

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२१ : भारतातील सर्व नागरिकांना उच्च शिक्षण अॅक्सेसिबल व्हावे यासाठी NIRF २०२० मध्ये भारतातील चौथे सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून मानांकन मिळालेल्या अमृत विश्व विद्यापीठमतर्फे नव्या शैक्षणिक धोरणाशी सुसुंगत असलेले ऑनलाइन पदवी कार्यक्रम सुरू करत असल्याची घोषणा करण्यात आली. या अभ्यासक्रमांमध्ये बीबीएएमबीएबीसीएएमसीएआर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये एमसीए आणि सायबरसिक्युरिटीमध्ये एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. महाभारतावरील सहा आठवड्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. अमृत अहेड (Amrita AHEAD) असे ब्रँडिंग असलेले हे अभ्यासक्रम पूर्णपणे यूजीसी मान्यताप्राप्त आहेत आणि विद्यापीठाच्या ऑन-कॅम्पस पदवी अभ्यासक्रमांच्या समतुल्य आहेत. 

 

अमृत विश्व विद्यापीठमचे कुलगुरू डॉ. पी. वेंकट रंगन म्हणाले, “अमृत अहेड अभ्यासक्रमांमुळे उच्च शिक्षणातील समन्याय आणि अॅक्सेसिबिलिटीबाबत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होते. आता कोठेही राहणारे विद्यार्थी भारतातील एकूण सर्वोत्तम विद्यापीठाचे मानांकन मिळालेल्या अमृत विश्व विद्यापीठमची पूर्ण पदवी प्राप्त करू शकतात. भारतातील आणि परदेशातील अनुभवी शिक्षकांचा समावेश असलेल्या जागतिक दर्जाच्या अध्ययन वातावरणात ते घरबसल्या आणि त्यांच्या वेगाने अभ्यास करू शकतात. ऑनलाइन पदव्या आमच्या ऑन-कॅम्पस पदव्यांच्या समतुल्य आहेतया पदव्या आमच्या ऑनलाइन विद्यार्थ्यांना आमच्या फिजिकल कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसारख्याच शैक्षणिक व करिअर संधी उपलब्ध करून देतात. 

 

अमृत विश्व विद्यापीठमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अधिष्ठाता डॉ. कृष्णाश्री अच्युतन म्हणाल्या, “अमृत अहेड पदव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातर्फे सहामाही इंटर्नशिप्स अंडर-ग्रॅज्युएट पातळीवरही उपलब्ध करून देण्यात येतातज्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रत्यक्ष कामाशी संबंधित राहते. विद्यार्थी काही सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून द्विपदवी प्राप्त करू शकतात आणि आमच्या २०० हून अधिक संलग्नतांमध्ये इंटरनॅशनल एक्स्चेंज आणि प्लेसमेंटच्या संधींचा लाभ घेऊ शकतात. या क्षेत्रासोबत हे अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षक विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम शिकवतात आणि त्यांना प्रत्यक्ष-आयुष्यात या अभ्यासक्रमांचा उपयोग करण्यास सक्षम करतात. हे अभ्यासक्रम भविष्यासाठी सज्ज असावे आणि उद्योगक्षेत्रांच्या गरजांशी सुसंगत असावे यासाठी अमृतने मायक्रोसॉफ्टसिस्कोअॅमेझॉन एडब्ल्यूएस आणि फोर्टीनेट यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी एकाधिक सहयोग केले आहेत. 

 

अमृत अहेड ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शकउद्योगक्षेत्रातील प्रकल्पउद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांसह होणारी परस्परसंवादी सत्रेविविध प्रकारची इंडस्ट्री सर्टिफिकेशन्स आणि ९५ टक्क्यांहून अधिक प्लेसमेंट रेकॉर्ड असलेल्या विद्यापीठाच्या करिअर साहाय्य कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. 

 

पुरस्कारप्राप्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेली लेक्चर्सडिस्कशन फोरम्सशंकानिरसन करण्यासाठी अनुभवी शिक्षक आणि मार्गदर्शकांसह होणारी लाइव्ह इंटरॅक्शन्स यांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींमुळे अनुभवात्मक अध्ययन करता येतेफ्रेशर्स व वर्किंग प्रोफेशनल्सना वैयक्तिकृत मार्गदर्शन व इंटरॅक्टिव्हिटीसह ‘कधीही अॅक्सेस’ आणि फ्लेक्सिबिलिटी मिळते.  

 

अमृत अहेड ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी www.amrita.edu/ahead या वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा ahead@amrita.edu येथे ईमेल करू शकतात. 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.