'एमजी हेक्टर २०२१' सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायात उपलब्ध

 'एमजी हेक्टर २०२१' सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायात उपलब्ध


मुंबई, ११ फेब्रुवारी २०२१: एमजी मोटर इंडियाने हेक्टर २०२१ मधील सर्वात नवा ऑप्शन सीव्हीटी (CVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय लाँच केला आहे. १६,५१,८०० रुपयांपासून (एक्स शोरुम, नवी दिल्ली) तिची किंमत आहे. सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय बाजारात उतरवल्यानंतर एमजी ने हेक्टर २०२१ पेट्रोल इंजिन लाइनअपमध्ये विविध चार पर्याय दिले आहेत. त्यात एमटी, हायब्रिड एमटी, सीव्हीटी, आणि डिसीटी यांचा पर्याय आहे.

सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय एमजी हेक्टर २०२१ मधील ५ आसनी तसेच हेक्टर प्लस सहा- आसनी या दोहोंमध्ये उपलब्ध आहे. सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे सध्याच्या डिसीटी पर्यायात उपलब्ध आहे. स्टॉप-गो वाहतुकीसाठी अधिक योग्य असलेल्या सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे आरामदायी व धक्का विरहित प्रवासाचा अनुभव मिळतो. डिसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे वाहन चालवताना गिअर तत्काळ बदलता येतात, यामुळे ओव्हरटेक करणे सोपे जाते.

एमजी मोटर इंडियाचे मुख्य कमर्शिअल ऑफिसर, श्री गौरव गुप्ता म्हणाले, “अतुलनीय वैशिष्ट्यांमुळे, हेक्टर, जी एमजीसारखाच एक ब्रँड आहे, तिने स्वत:साठी एक अनोखा वारसा तयार केला आहे. हेक्टर २०२१ सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाँच करण्यासह, ग्राहकांना विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता राखली आहे. आरामदायी व सुलभ वाहन चालवण्याच्या अनुभवाला प्राधान्य देणाऱ्या खरेदीदारांमध्ये सीव्हीटी हे लोकप्रिय ट्रान्समिशन आहे. त्यामुळे नवे ट्रान्समिशन खरेदीदारांसाठी योग्य पर्याय ठरेल व एमजी हेक्टरची लोकप्रियताही यामुळे वाढेल.”

एमजी हेक्टर २०२१ ही श्रेणी या क्षेत्रातील प्रथमच एमजी शील्डची सुविधा देत आरामदायी मालकीचा अनुभव प्रदान करते. याअंतर्गत, एमजी सर्वोत्कृष्ट टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप प्रदान करते. याद्वारे ५ वर्षे/अमर्याद किमीसाठी वॉरंटी, 5 वर्षे रोडसाइड असिस्टन्स व पहिल्या पाच नियमित सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्ज मिळेल. एमजी हेक्टर सुरुवातीला पेट्रोलच्या पर्यायात ४५ पैसे प्रति किमी व डिझेलसाठी ६० पैसे प्रति किमी एवढा कमी मेंटेनन्स किंमत प्रदान करते. (१००,००० किमीपर्यंत मोजले जाते.)

या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या एमजी हेक्टर २०२१ मध्ये हिंग्लिश कमांड्स, iSMART कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जिंग व व्हँटिलेटेड सीट्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ६ एअरबॅग्स,बल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिल, १८ इंच ड्युएल टोन अॅलॉय आणि ड्युएल टोन इंटेरिअर व एक्सटेरिअरचे पर्याय यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth