मुंबईचे १-अवर ग्रोसरी डिलिव्‍हरी ॲप्स आज शहरभरात लाँच!

 मुंबईचे १-अवर ग्रोसरी डिलिव्‍हरी ॲप्स आज शहरभरात लाँच!



१६ फेब्रुवारी २०२१: भारताच्‍या वाढत्‍या हायपरलोकल डिलिव्‍हरी क्षेत्रामध्‍ये नुकतेच एका उत्‍साहवर्धक, नवीन कंपनीची भर झाली आहे. आजपासून मुंबईभरात किराणाकार्ट हे १-अवर ग्रोसरी डिलिव्‍हरी ॲप्स लाँच झाले आहे.

विकसित होणा-या या स्‍टार्ट-अपची स्‍थापना मुंबईतील दोन १८ वर्षीय स्‍टॅनफोर्ड विद्यार्थ्‍यांच्‍या टीमने केली होती. या दोघांनाही स्‍पर्धात्‍मक ग्रोसरी डिलिव्‍हरी क्षेत्रामध्‍ये प्रचंड, बराच वाव असलेली क्षमता दिसून आली. टीमच्‍या लवकर विकास करण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षेला मार्की गुंतवणूकदारांच्‍या आर्थिक साह्यतेचे पाठबळ मिळाले. यामध्‍ये वाय कॉम्‍बीनेटर, ग्‍लोबल फाऊंडर्स कॅपिटल अशा गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

किराणाकार्टची मुंबईभरात १-अवर ग्रोसरी डिलिव्‍हरी सेवा विस्‍तारित करण्‍यासाठी आणि इतर मेट्रो शहरांमध्‍ये विस्‍तारित होण्‍यापूर्वी शहरामध्‍ये जलदपणे विकसित होण्‍यासाठी निधीचा उपयोग करण्‍याची योजना आहे. त्‍यांच्‍या पहिल्‍या १००,००० ऑर्डर्ससाठी ते रू. १ डिलिव्‍हरी फी प्रमोशन ऑफर करणार आहेत.

या कटिबद्धतेबाबत विचारले असता सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आदित पलिचा म्‍हणाले, ''किराणाकार्ट विकसित होत असताना आमचा फोनवर किराणा माल ऑर्डर करण्‍याचा नाखूश करणारा अनुभव मिळालेल्‍या निष्‍ठावान लोकांचा समूह शोधण्‍यावर फोकस होता. आम्‍ही स्‍वत:ला कार्यपथावर ठेवले आहे, पण आता आम्‍ही या कार्याला मोठ्या स्‍तरावर पुढे घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहोत.''  

फूड डिलिव्‍हरी ॲप्सशी समानुपाती असलेले किराणाकार्ट तुमच्‍या जवळच्‍या विश्‍वसनीय सुविधाजनक स्‍टोअर्समधून ऑर्डर मिळण्‍याची खात्री देते. सध्‍या हे ॲप्स गोरेगाव ते कुलाबापर्यंत उपलब्‍ध असून आयातित पॉप-टार्टस् ते सुट्या डाळीपर्यंत ऑर्डर वितरित करत आहे.

सह-संस्‍थापक व सीटीओ कैवल्‍य वोहरा म्‍हणाले, ''आमचा विश्‍वास आहे की, आमचा तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टिकोन या क्षेत्रामधील प्रतिस्‍पर्ध्‍यांपेक्षा अधिक प्रबळ ठरेल. फूड डिलिव्‍हरी किंवा राइड-शेअरिंगप्रमाणे भारतातील त्‍वरित ग्रोसरी डिलिव्‍हरी बाजारपेठ यशस्‍वी ठरण्‍यापासून खूपच दूर आहे आणि आम्‍ही वेगळ्या दृष्टिकोनासह याची पोहोच वाढवण्यासाठी उत्‍सुक आहोत.'' 

किराणाकार्ट ॲप्स इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी प्‍ले स्‍टोअर व  ॲप्स स्‍टोअर लिंक्‍समधील त्‍यांची वेबसाइट https://kiranakart.app/ ला भेट द्या.


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth