नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, 09 मार्च 2021 दरम्यान खुला, दर्शनी मूल्य प्रती रु. 10च्या निश्चित मूल्यावर किंमत पट्टा रु. 37 प्रती इक्विटी शेअर

 

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, 09 मार्च 2021 दरम्यान खुला, दर्शनी मूल्य प्रती रु. 10च्या निश्चित मूल्यावर किंमत पट्टा रु. 37 प्रती इक्विटी शेअर  

 

·         प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफर) 27,36,000 इक्विटी शेअरचा.

·         किंमत पट्टा रु. 37 प्रती इक्विटी शेअर.

·         3000 इक्विटी शेअरची किमान बोली तसेच त्यानंतर 3000 इक्विटी शेअरच्या पटीत.

·         इश्यू खुला होण्याची तारीख  मंगळवार, 09 मार्च, 2021 आणि इश्यू बंद होण्याची तारीखशुक्रवार, 12 मार्च, 2021

·         कंपनी पोस्ट-इश्यू पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलचा पब्लिक इश्यू आणि नेट इश्यू अनुक्रमे 26.73% आणि  25.32%.

 

06 मार्च, 2021: नॉलेज मरीन अँड इंजिनिअरींग वर्क्स लिमिटेड (“कंपनी”) मरीन क्राफ्ट आणि सागरी पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि निगा/ कायापालट तसेच गाळ उपसणीसाठी लागणारी मरीन क्राफ्टची मालकी, त्यांची व्यवस्था पाहणारी आणि मरीन क्राफ्ट भाडे तत्वावर देणारी कंपनी आहे. या कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफर (“आयपीओ” किंवा “प्रस्ताव”) मंगळवार, 09 मार्च रोजी खुला होणार असून शुक्रवार, 12 मार्च 2021 रोजी बंद होणार आहे. दर्शनी मूल्य प्रती रु. 10च्या निश्चित मूल्यावर किंमत पट्टा रु. 37 प्रती इक्विटी शेअर याप्रमाणे हा  व्यवहार पूर्ण होईल. 

 

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरींग वर्क्स लिमिटेड (“कंपनी” किंवा “KMEWL” किंवा “जारीकर्ता”) च्या वतीने रु. 10 दर्शनी मूल्याच्या 27,36,000 इक्विटी शेअरचा प्रस्ताव देण्यात आला असून प्रती इक्विटी शेअर रु. 37 च्या इश्यू प्राईज राहील. या व्यवहारात सरासरी रु. 1012.32 लाख (“पब्लिक इश्यू”) यामध्ये प्रती रु. 10 दर्शनी मूल्याचे 1,44,000 इक्विटी शेअर रोख रकमेवर, रु. 53.28  लाख किंमतीचा इश्यू मार्केट मेकर वाटप (द”मार्केट मेकर रिझर्व्हेशन पोर्शन”)साठी आरक्षित ठेवला आहे, मार्केट मेकर रिझर्व्हेशन पोर्शन वगळून जसे की, रु. 10 दर्शनी मूल्याचे 25,92,000 इक्विटी शेअर हे प्रती शेअर रु. 37 ला उपलब्ध राहतील. यानंतर रु. 959.04 लाखांच्या शेअरना “नेट इश्यू” संबोधले जाईल आणि कंपनी पोस्ट-इश्यू पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलचा पब्लिक इश्यू आणि नेट इश्यू अनुक्रमे 26.73% आणि  25.32% याप्रमाणे असेल.

 

या प्रस्तावातून कंपनीकडे जमा झालेल्या सर्व रकमेला व्यवहाराचा फ्रेश इश्यू संबोधण्यात येणार आहे.

 

एचईएम सिक्युरिटीज लिमिटेड हे या प्रस्तावाचे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) असतील.

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरींग वर्क्स लिमिटेडचे इक्विटी शेअर हे बीएसईच्या एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth