अनुपम रसायन इंडिया लिमिटेड’च्या इक्विटी शेअरचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफर) शुक्रवार, 12 मार्च 2021 रोजी खुला

अनुपम रसायन इंडिया लिमिटेड’च्या इक्विटी शेअरचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (इनिशियल पब्लिक ऑफर) शुक्रवार, 12 मार्च 2021 रोजी खुला

 

·         अनुपम रसायन इंडिया लिमिटेड (“इक्विटी शेअर”) चे दर्शनी मूल्य प्रती शेअर रु. 10, किंमत पट्टा प्रती शेअर रु. 553.00 – रु. 555.00

·         बोली सुरू होण्याची तारीख शुक्रवार, 12 मार्च 2021 आणि बोली समाप्त होण्याची तारीख – मंगळवार, 16 मार्च, 2021

·         किमान बोली गठ्ठा 27 इक्विटी शेअरचा तर त्यानंतर 27 इक्विटी शेअरच्या पटीत

·         फ्लोअर प्राईज इक्विटी शेअरच्या 55.30 पटीत तर कॅप प्राईज इक्विटी शेअरच्या 55.50 पटीत


 

  मुंबई, 8 मार्च, 2021: सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेड (“कंपनीकिंवा अनुपम रसायन”), चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाची बोली (“इश्यू” / “बोली”) शुक्रवार, 12 मार्च 2021 रोजी खुला होणार असून मंगळवार, 16 ,मार्च 2021 रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती शेअर रु. 553.00 – रु. 555.00 दरम्यान निश्चित करण्यात आला. ही कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) च्या सल्ल्यानुसार, पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर्स) चा सहभाग बोली खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवसाअगोदर बुधवार, 10 मार्च, 2021 लक्षात घेणार आहे.

या व्यवहारात रु. 7,600 दशलक्ष इक्विटी शेअरचा पूर्ण ताजा इश्यू समाविष्ट असून तो बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होईल. या व्यवहारातून जमा होणारी रक्कम कंपनी काही कर्जांचा परतावा/ मुदतपूर्व परतावा करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणास्तव वापरणार आहे.

अनुपम रसायन ही एक अग्रगण्य कंपनी असून ती भारतात कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत आहे. (स्त्रोत: “इंडीपेन्डेट मार्केट रिपोर्ट ऑन क्रॉप प्रोटेक्शन, फार्मास्युटिकल्स अँड कस्टम सिंथेसीस” दिनांक 14 डिसेंबर 2020) (“एफ अँड एस रिपोर्ट”) फ्रॉस्ट अँड सुल्लीवन निर्मित आणि प्रकाशित, कंपनीने इश्यूच्या संदर्भात कमिशन व भरणा केला. ही कंपनी दोन प्रकारच्या कार्य परिघात काम करते. त्यापैकी एक लाईफ सायन्सेस असून यामध्ये विशेष रसायनांचा समावेश असलेली उत्पादने तयार करण्यात येतात. ज्यामध्ये अॅग्रोकेमिकल्स, पर्सनल केअर आणि फार्मास्युटिकल; तसेच अन्य विशेष रसायने, विशेष पिगमेंट आणि डाय, पॉलिमर अॅक्टीव्हीटीचा समावेश आहे. अनुपम रसायनने विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसह बळकट आणि दीर्घकालीन नाते विकसीत केले आहे. ज्यामध्ये सिजेंटा एशिया पॅसिफिक पीटीई लिमिटेड, सुमीटोमो केमिकल कंपनी लिमिटेड आणि युपीएल लिमिटेडचा समावेश आहे. यामुळे कंपनीची उत्पादन श्रेणी वाढली व ती युरोप, जपान, अमेरिका आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीचे कामकाज भारतातील गुजरातमधील सहा बहुउद्देशीय निर्मिती सुविधाकेंद्रांतून चालते. चार सुविधाकेंद्रे सचिन, सुरत, गुजरात येथे तर दोन झगाडीया, भरूच, गुजरात येथे आहे.

 

आर्थिक वर्ष 18 ते आर्थिक वर्ष 20 दरम्यान कंपनीच्या एकूण महसुलात 24.29 % सीएजीआरने वाढ झाली कंपनीच्या सुविधाकेंद्रात सुरू झालेल्या कामकाजातून आर्थिक वर्ष 20 करिता ईबीआयटीडीए 1,348.96 दशलक्ष एवढा राहिला. कामाच्या पद्धतीत झालेला बदल तसेच मर्यादित कर्मचारी बळ या स्थितीचा परिणाम महसुलावर दिसून आला. कोविड-19 महासाथीचा प्रभाव असूनही कंपनीच्या कामकाजातून जमा झालेल्या महसुलात 45.03% ची महत्त्वपूर्ण वाढ झाल्याचे आढळले. 31 डिसेंबर 2019 रोजी संपलेल्या नऊमाहीत ती रकम 3,718.07 दशलक्ष दरम्यान राहिली तर 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंत महसुलाची रक्कम 5,392.20 दशलक्ष याप्रमाणे होती.  

एक्सिस कॅपिटल लिमिटेड, अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या प्रस्तावाचे बुक रनिंग मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.

या इश्यू बुक बिल्डींग प्राईजच्या माध्यमातून सेबी आयसीडीआर नियमन 6 (1) अनुसार खुला करण्यात आला असून  कंपनीला मिळालेल्या बीआरएलएमच्या सल्ल्यानुसार पायाभूत संस्थात्मक खरेदीदार (“क्यूआयबी”) (“क्युआयबी” भागना गुणोत्तर आधारे वाटपासाठी उपलब्ध राहील.   अर्थात कंपनी आणि विक्री समभागधारकांनी बीआरएलएमचा सल्ला मानून क्यूआयबीचा 60% भाग पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) किमतीवरपायाभूत गुंतवणूकदारांकरिता स्वैच्छिक तत्वावर राखून ठेवावा. ज्यापैकी एक तृतियांश भाग स्वदेशी म्युच्यूअल फंडांसाठी राखीव असून तो स्वदेशी म्युच्यूअल फंडांकडून येणा-या वैध बोलीच्या किंवा  पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या बोलीच्या अधीन आहे. त्याशिवाय क्यूआयबी वर्गाच्या 5% भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध करुन दिला जाईल. निव्वळ क्यूआयबी भाग उर्वरितक्यूआयबी (पायाभूत गुंतवणूकदार वगळता)म्युच्युअल फंडासहप्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेलत्यांच्याकडून मिळणाऱ्या वैध बोलीवर किंवा बोली रक्कमेहून अधिक किमतीच्या अधीन राहील. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी गुणोत्तर आधारित उपलब्ध नेट इश्यू 50% हून अधिकचा नसेल.

 

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth