उत्तर प्रदेश स्थित, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतर्फे 1350 कोटी रुपयांचे आयपीओ जारी

 

उत्तर प्रदेश स्थित, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतर्फे 1350 कोटी रुपयांचे आयपीओ जारी

 

मार्च 05, 2021: भारतातील अग्रणी स्मॉल फायनान्स बँक असणाऱ्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून एकंदर Rs. 1350 कोटी उभारण्यासाठी नियामकांकडे त्यांची कागदपत्रे दाखल केली आहेत. या पब्लिक इश्यू समभागांची दर्शनी किंमत प्रत्येकी Rs.10 इतकी असून यामध्ये नव्या Rs. 750 कोटीच्या नव्या इश्यूचा आणि समभागधारक उत्कर्ष कोरइन्व्हेस्ट लिमिटेडच्या विक्रीतून एकंदर Rs. 600 कोटीपर्यंतच्या विक्री ऑफरचा समावेश आहे. 

मान्यताप्राप्त संस्थेतील खरेदीदारांसाठी 75% पर्यंतचा वाटा, संस्थाएतर गुंतवणूकदारांसाठी 15% वाटा आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% वाटा राखून ठेवण्यात आला आहे. 

डीआरएचपीमध्ये नमूद केल्यानुसार, कर्ज आणि आगाऊ रक्कम इ. ने मालमत्तेत झालेल्या वाढीमुळे भविष्यातील भांडवल गरजा भागविण्यासाठी टीअर 1 कॅपिटल बेस वाढविण्यासाठी नव्या इश्यूमधून प्राप्त झालेल्या एकूण उत्पन्नाचा उपयोग करण्याचा कंपनीचा मानस आहे.  प्री आयपीओ प्लेसमेंटद्वारे 250 कोटी रुपये उभे करण्याचा विचार कंपनी करू शकते.  या इश्यूसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आघाडीच्या व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला जाईल.  

 

वेगाने प्रगती करत असलेल्या वाराणसी मुख्यालय कंपनीच्या एसएफबीला 2016 मध्ये मान्यता देण्यात आली होती आणि तिने 2017 पासून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. क्रिसिलच्या अहवालानुसार, 2020 या आर्थिक वर्षातील ही देशातील सर्वात जास्त नफा कमावणारी स्मॉल फायनान्स बँक आहे. मायक्रोफायनान्स विभागातील सखोल समज असलेल्या उत्कर्षने एनबीएफसी म्हणून 2010 सालापासून आपले काम सुरू केले आणि त्यांतर संयुक्त लायबिलिटी समूह, उत्पन्न निर्माण करणारी छोटी कर्जे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या गरीब महिलांसाठी सूक्ष्म उद्योग कर्ज देऊ करण्यावर लक्ष केंद्रित करणारी एनबीएफसी एमएफआय म्हणून ती रुपांतरीत झाली.  

सप्टेंबर 30, 2020 रोजी, रिटेल आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून, स्मॉल फायनान्स बँकेने 528 बँकिंग आउटलेट्सच्या माध्यमातून 2.74 दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरवली आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील मुख्यत्वे करून ग्रामीण आणि अर्ध शहरी भागातील हे ग्राहक असून येथील महत्त्वाचा बाजार अजून दुर्लक्षितच आहे. 2018-20 या आर्थिक वर्षांच्या दरम्यान त्यांच्या ठेवी आणि वितरणात अनुक्रमे 54.48% आणि 33.66% सीएजीआरने वाढ झाली आहे आणि अन्य एसएफबींच्या तुलनेत, 31 मार्च 2020 रोजी त्यांचे एकूण आणि निव्वळ एनपीए गुणोत्तर सर्वात कमी होते. समाधानकारक लिक्विडीटी प्रोफाईल, ठोस भांडवल आधार, उत्पन्नाच्या तुलनेत कमी खर्च असणाऱ्या या बँकेकडे बचत खाती, वेतन खाती, करंट खाती, आवर्ती आणि मुदत ठेवी आणि लॉकर सुविधा अशा ठेवी उत्पादनांची मोठीश्रेणी तसेच ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय व्यक्ती, स्वयंरोजगार कमावणाऱ्या व्यक्ती आणि पगारदार व्यक्तींसाठी वैविध्यपूर्ण लायबिलिटी उत्पादने आहेत आणि ते मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सेवेच्या माध्यमातून व्यवहार करू शकतात/ संवाद साधू शकतात/ गुंतवणूक करू शकतात. 

17-20 या आर्थिक वर्षांच्या दरम्यान, स्मॉल फायनान्स बँकांनी 30% सीएजीआर एयुएम विकास दर नोंदविला आहे आणि नजीकच्या काळात कर्ज पोर्टफोलियोमध्ये 22% ची वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

अविष्कारने पाठींबा दिलेल्या अग्रणी एनबीएफसी एमएफआय, आरोहन फायनान्शिअल सर्विसेसने नुकतेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून Rs. 1800 कोटी वाढविण्यासाठी दाखल केले. ही कोलकातास्थित कंपनी 17 राज्यांमधील 2.21 दशलक्ष कर्जदारांना सेवा पुरवत आहे आणि त्यांच्या एकूण कर्ज पोर्टफोलियोनुसार, पूर्व भारतातील ती सर्वात मोठी एनबीएफसी एमएफआय आहे. 

 

आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सेक्युरिटीज लिमिटेड आणि कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या इश्यूचे बीआरएलएमएस आहेत. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth