लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इक्विटी शेअरची इनिशियल पब्लिक ऑफर सोमवार, 15 मार्च 2021 रोजी खुली होणार


लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इक्विटी शेअरची 

इनिशियल पब्लिक ऑफर सोमवार, 15 मार्च 2021 रोजी खुली होणार

 

·         लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (“इक्विटी शेअर”) रु. 2 दर्शनी मूल्य इक्विटी शेअरचा किंमत पट्टा रु. 129 – रु.  130  प्रती

·         प्रस्ताव खुला होण्याची तारीखसोमवार, 15 मार्च, 2021 आणि प्रस्ताव बंद होण्याची तारीख  – बुधवार, 17 मार्च, 2021

·         किमान बोली गठ्ठा  115 इक्विटी शेअर आणि त्यानंतर 115 इक्विटी शेअरच्या पटीत

·         फ्लोअर प्राईज ही इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 64.50 पटीत आणि कॅप प्राईज ही इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 65.00  पटीत याप्रमाणे राहील

 

 


मुंबई, 9 मार्च 2021: लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (“कंपनीकिंवालक्ष्मी ऑर्गेनिक”), चा इक्विटी समभागाचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (“ऑफर”/ “आयपीओ”) सोमवार, 15 मार्च, 2021 रोजी खुला होणार असून हा व्यवहार  बुधवार, 17 मार्च, 2021 रोजी समाप्त होईल. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर रु. 129 – रु. 130 याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. ही कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”च्या सल्ल्यानुसारपायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर्स) चा सहभाग बोली खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवसाअगोदर शुक्रवार, 12 मार्च, 2021 लक्षात घेणार आहे.

हा प्रस्ताव सरासरी रुपये 600 कोटींचा असून इक्विटी शेअरचा ताजा इश्यू रुपये 300 कोटी (“फ्रेश इश्यू”) आणि प्रवर्तक विक्रेते समभागधारक यलो स्टोन ट्रस्ट (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) “ऑफर फॉर सेल” आणि फ्रेश इश्यू “ऑफर” एकत्रित) यांच्याद्वारे चा विक्री प्रस्ताव रुपये 300 कोटी  असा राहील.

हा प्रस्ताव सिक्युरिटी कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन रूल1957च्या 19(2)(बीसुधारणेनुसार (“एससीआरआर), नियमन 31 नुसार आहेहा प्रस्ताव सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (कॅपिटल इश्यू आणि डिस्क्लोजर आवश्यकतानियमन 2018 मधी (सेबी आयडीसीआर नियम), सुधारणेनुसार नियम 6(1) आधारीत बुक बिल्डींग प्रोसेसच्या माध्यमातून करण्यात येईलकिमान 50%  पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी)साठी राखून ठेवण्यात आला आहेअर्थात कंपनी आणि विक्री समभागधारकांनी जीसीबीआरएलएम आणि बीआरएलएमचा सल्ला मानून क्यूआयबीचा 60% भाग पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टरकिमतीवरपायाभूत गुंतवणूकदारांकरिता स्वैच्छिक तत्वावर राखून ठेवावा. ज्यापैकी एक तृतियांश भाग स्वदेशी म्युच्यूअल फंडांसाठी राखीव असून तो स्वदेशी म्युच्यूअल फंडांकडून येणा-या वैध बोलीच्या किंवा  पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या बोलीच्या अधीन आहे.  त्याशिवाय क्यूआयबी वर्गाच्या 5% भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध करुन दिला जाईल. निव्वळ क्यूआयबी भाग उर्वरितक्यूआयबी (पायाभूत गुंतवणूकदार वगळता)म्युच्युअल फंडासहप्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेलत्यांच्याकडून मिळणाऱ्या वैध बोलीवर किंवा बोली रक्कमेहून अधिक किमतीच्या अधीन राहील. जर म्युच्युअल फंडकडून किमान प्रस्तावाच्या 5% हून कमी सरासरी मागणी राहिली तर म्युच्युअल फंडाच्या वाटपासाठी असलेले म्युच्युअल फंड भाग क्यूआयबीन गुणोत्तर वाटपासाठीच्या निव्वळ क्यूआयबी भागात वर्ग करण्यात येतील. शिवायसेबी आयसीडीआर नियमनानुसारविना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)ना 15% पेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या 35हून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाहीवैध बोली प्रस्ताव किंमत/इश्यू प्राईज इतकी किंवा त्यावर राहील. त्याशिवाय इक्विटी सेअर हे कर्मचारी आरक्षण भागातंर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांच्या गुणोत्तराच्या आधारावर राहीलहा व्यवहार त्यांच्या अधीन असलेल्या वैध बोलीच्या किंवा प्रस्ताव किमतीच्या वर असेल. सर्व पात्र बोलीधारक (पायाभूत गुंतवणूकदार वगळता,) एएसबीए – अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट ही संबंधित एएसबीए खात्यातंर्गत आणि युपीआय यंत्रणालागू असल्यासएससीएसबी किंवा युपीआय यंत्रणेतंर्गत प्रायोजित बँकेकडून बोली रक्कम ही खात्यातून ब्लॉक करण्यात येईल. पायाभूत गुंतवणुकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे या प्रस्तावात सामील होण्याची संमती नाही.  

कंपनीने बीआरएलएमच्या सल्ल्यानुसार रु. 2,000 दशलक्ष (“प्री-आयपीओ प्लेसमेंट”) ची 15,503,875 इक्विटी शेअर्सची प्रायव्हेट प्लेसमेंट ठेवली. प्री-आयपीओ प्लेसमेंटनंतर फ्रेश इश्यूचे आकारमान रु. 5,000 दशलक्षहून रु. 3,000 दशलक्षपर्यंत कमी करण्यात आले आणि परिणामी प्रस्तावाचे आकारमान रु. 8000 दशलक्षवरून रु. 6,000  दशलक्षपर्यंत कमी करण्यात आले.     

या व्यवहारातून उभी राहिलेली रक्कम कंपनीने कर्ज म्हणून घेतलेल्या रक्कमेचा पूर्ण किंवा काही भाग हा पूर्व-भरणा किंवा पुनर्भरणा करण्यासाठी वापरला जाईल. कंपनीच्या पूर्ण मालकीची असलेली उपकंपनी यलोस्टोन फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (“YFCPL”)च्या गुंतवणूक अनुषंगाने फ्ल्यूलोस्पेशियलीस्ट केमिकल्स (“प्रस्तावित सुविधा”) निर्मिती सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने भांडवल खर्च उभारण्यासाठी; YFCPL मध्ये केलेली गुंतवणूक ही खेळत्या भांडवलाच्या गरजांना निधी पुरविण्यासाठी करण्यात येईल; भांडवली खर्चासाठी उभारलेला निधी एसआय निर्मिती सुविधेच्या विस्ताराकरिता (“प्रस्तावित विस्तार”); कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी निधी उभारणे; त्यांच्या एसआय निर्मिती सुविधा केंद्रात पायाभूत विकास स्थापनेच्या अनुषंगाने प्रकल्प आणि यंत्रांची खरेदी करण्यासाठी; तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणास्तव.     या ऑफर अंतर्गत देऊ करण्यात येणारे इक्विटी शेअर हे बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहे तसेच लिस्टिंगनंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होण्याकरिता प्रस्तावित आहेत. 

फ्रॉस्ट अँड सुल्लीवन रिपोर्ट अनुसार, लक्ष्मी ऑर्गेनिक हे सध्या भारतातील इथीयल एक्सेटेटचे सर्वात मोठे निर्माते मानले जातात. त्यांच्याकडे भारताच्या इथियल एक्सेटेट बाजाराचा सुमारे 30% बाजार भाग आहे. ही कंपनी स्पेशियलिटी इंटरमीजीएटमध्ये विविध प्रकारच्या रसायनांचा पोर्टफोलियो वृद्धिंगत करण्यावर विश्वास ठेवते. ज्यामुळे त्यांनी स्वत:चे विशेषत्व सिद्ध केले आहे. लक्ष्मी ऑर्गेनिक हे भारतात डिकेटीन डेरेव्हेटीव्हजचे एकमेव निर्माते मानले जातात. 2020 च्या आर्थिक वर्षातील महसूलानुसार भारतातील डिकेटीन डेरेव्हेटीव्हजचा अंदाजे 55% भाग लक्ष्मी ऑर्गेनिककडे असल्याने त्यांच्याकडे डिकेटीन उत्पादनांचा सर्वात मोठा पोर्टफोलियो आहे. 

या कंपनीचे अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड, हेतेरो लॅब्ज लिमिटेड, लौरस लॅब्ज लिमिटेड, मॅकलीओड्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड, न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड, सुवेन फार्मास्युटिकल्स, ग्रॅन्यूएल्स इंडिया, यूपीएल लिमिटेड, सिंजेन्टा एशिया पॅसिफिक पीटीई. लिमिटेड आणि सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा  निरनिराळ्या उपभोक्त्यांसोबत दीर्घकालीन संबंध आहेत. त्याचप्रमाणे चीन, नेदरलँड्स, रशिया, सिंगापूर, युनायटेड अरब एमिरात, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासह 30 हून अधिक देशांत कंपनीचे कामकाज विस्तारलेले आहे आणि उपभोक्त्यांसह जागतिक पटलावर पाउलखुणा उमटवल्या आहेत.

एक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड (पूर्वीची आयडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड)ला या प्रस्तावाचे बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम’ज”) नियुक्त करण्यात आले आहे.  

इथे वापरण्यात आलेल्या भांडवली संज्ञांचा अर्थ आणि रेड हेरिंग प्रोस्पेक्टस (“आरएचपी”)मधील अर्थ एकसमान असतील असे नाही.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24