बाजारात पार्टी क्रूजर्सचा दिमाख, समभाग रू. 54 वर सूचीबद्ध

 

बाजारात पार्टी क्रूजर्सचा दिमाख, समभाग रू. 54 वर सूचीबद्ध

 

भारतीय विवाह आणि इवेंट मॅनेजमेंट क्षेत्रात परिवर्तन आणणारे आद्यकर्ते झुझेर लकनौवाला आणि रचना लकनौवाला संस्थापित पार्टी क्रूजर्स इंडिया लिमिटेड आज दिनांक 05 मार्च 2021 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)च्या इमर्ज मंचावर सूचीबद्ध झाली. 

पार्टी क्रूजर्स इंडिया लिमिटेड (पीसीएल) ची स्थापना 1994 दरम्यान झाली, या कंपनीचा आयपीओ 22 फेब्रुवारी रोजी खुला झाला आणि रु. 7.75 कोटी उभारले. या इश्यूचे मूल्य रु. 51 प्रती समभाग याप्रमाणे निश्चित झाले होते. भांडवल उभारणीसाठी कंपनीने 1520000 इक्विटी शेअर उपलब्ध करून दिले होते. 

पार्टी क्रूजर्स ही विवाह आणि इवेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील विशेष कंपनी असून विविध प्रकारच्या विवाह आणि इवेंट ऑफर देऊ करते. ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव म्हणजे “AWE”चे उद्दिष्ट कंपनीने बाळगलेले आहे. कंपनीच्या सर्व क्लायंटना “सुंदर” म्हणजे “AESTHETIC” वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी कंपनी कार्यरत आहे. PCL’ची इवेंट सर्विस अगदी नियोजनापासून विपणन ते निर्मिती आणि सजावटीची जबाबदारी घेते. ही कंपनी सोहळ्याच्या सुरुवातीपासूनच्या प्री-इवेंट पब्लिसिटी, वेन्यू रिसर्च आणि बुकिंग तसेच वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या सोयीसाठी त्याच्या मागणीनुसार तत्काळ टर्नकी प्रोडक्शन (सेट अप, ऑन-साईट मॅनेजमेंट, स्टाफिंग, स्टेज डिझाईनिंग, एंटरटेनमेंट) ते पोस्ट-इवेंट सपोर्ट मिळतो.    

या कंपनीच्या यशस्वी सूचीबद्धतेविषयी बोलताना पार्टी क्रुजर्स इंडियाचे सीईओ झुझेर लकनौवाला म्हणाले की, “आमच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जो भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. पीसीएलच्या दृष्टीने हा अभिमानाचा प्रसंग आहे. आम्हाला लोकप्रिय स्टॉक एक्सचेंजचा भाग होता आले. आमच्या गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासाशिवाय हे शक्य नव्हते. आगामी काळात आमशी निगडीत सर्व घटकांना योग्य तो मोबदला मिळेल याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो.”

पार्टी क्रूजर्स आता लोकांची कंपनी झाली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्याशी निगडीत घटक आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक मूल्य मिळवून देण्याचा आमचा अजेंडा आहे. PCL ने बाजारात चांगले नाव कमावले आहे. हा ब्रँड लोकप्रिय असून हे एक नफा कमावणारे फ्रेंचायजी मॉडेल बनले आहे. जे स्पर्धात्मक वातावरणात स्वत:चा ठसा उमटवणारे आहे. ही कंपनी विविध व्यवसायात कार्यरत असून चांगला महसूल निर्माण करते. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इवेंट व्यवस्थापनात आपले अस्तित्व विस्तारण्याच्या दृष्टीने कंपनीचा भर असून भारतीय इवेंट मॅनेजमेंट क्षेत्रात पार्टी क्रूजर्स इंडियाचा चांगलीच घोडदौड सुरू आहे”, असे फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल लिमिटेडचे डायरेक्टर सत्येन दलाल म्हणाले.   

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202