कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) १६ मार्च २०२१ रोजी खुला होणार

 

कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर)

 १६ मार्च २०२१ रोजी खुला होणार

 

  • प्राईस बँड प्रति समभाग ८६ रुपये ते ८७ रुपये निश्चित करण्यात आला आहे. 
  • मंगळवार, १६ मार्च २०२१ पासून गुरुवार, १८ मार्च, २०२१ पर्यंत ऑफर खुली राहणार.

 

*कंपनी व विक्रेते समभागधारक, लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने अँकर गुंतवणूकदारांच्या सहभागाविषयी सेबी आयसीडीआर नियमांना अनुसरून निर्णय घेऊ शकतील.  अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिवस बोली/ऑफर खुली होण्याच्या तारखेच्या एक दिवस आधीचा कामकाजाचा दिवस असेल.

 

मुंबई, ११ मार्च, २०२१:  भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड ("कंपनी") टेक्नोपॅक रिपोर्टनुसार ३१ मार्च २०२० रोजीच्या महसुलाच्या आधारे प्रत्येकी                   १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांची इनिशियल पब्लिक ऑफर ("इक्विटी समभाग" व "ऑफर") १६ मार्च २०२१ रोजी खुली करणार आहे.  ही ऑफर १८ मार्च २०२१ रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्राईस बँड प्रति समभाग ८६ रुपये ते ८७ रुपये निश्चित करण्यात आला आहे. 

या ऑफरमध्ये कंपनीच्या एकूण १,१७,५०० लाख रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा समावेश आहे.  यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत -  (१) ८०,००० लाख रुपयांपर्यंतचे नव्याने जारी करण्यात आलेले समभाग ("फ्रेश इश्यू"); आणि (२) ३७,५०० लाख रुपयांपर्यंतच्या समभागांच्या विक्रीची ऑफर, ज्यामध्ये श्री. टी एस कल्याणरामन ("समभाग विक्रेते प्रमोटर") यांच्याकडून १२,५०० लाख रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची विक्री आणि हायडेल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ("समभाग विक्रेते गुंतवणूकदार") ("समभाग विक्रेते प्रमोटर" आणि "समभाग विक्रेते गुंतवणूकदार" यांना एकत्रितपणे विक्रेते समभागधारक" असे संबोधण्यात आले आहे) यांच्याकडून २५,००० लाख रुपयांच्या इक्विटी समभागांची विक्री यांचा समावेश आहे.

 या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करता यावे यासाठी एकूण २०० लाख रुपयांपर्यंत रिझर्वेशनचा ("एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन") (कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला भाग) समावेश आहे.  "एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन" वगळून उरलेल्या ऑफरला यापुढील मजकुरात "नेट ऑफर" (निव्वळ ऑफर) असे संबोधण्यात आले आहे.

 कमीत कमी १७२ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापुढे १७२ इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

 ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार संशोधित ("एससीआरआर"), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम, २०१८ च्या नियम ३१ नुसार ("सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स") बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(१) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना ("क्यूआयबी") ("क्यूआयबी पोर्शन") प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील.  अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे.  क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल.  यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.

 याशिवाय नेट ऑफरपेक्षा १५% पेक्षा कमी भाग विवेकानुसार वापराच्या आधारावर गैर-संस्थागत बोली लावणाऱ्यांसाठी आणि ३५% पेक्षा कमी भाग रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल आणि यामध्ये सेबी आयसीडीआर नियमाचे पालन केले जाईल.  यासाठी इश्यू किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे  आवश्यक आहे.  अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त सर्व संभाव्य बोली लावणारे अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट ("एएसबीए") प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या एएसबीए खात्यांची माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून ("एससीएसबी") किंवा युपीआय यंत्रणेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील.  अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

 फ्रेश इश्यूमधून उभी राहणारी निव्वळ रक्कम पुढील कामांसाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे:  (१) कंपनीचे खेळते भांडवल वाढवण्यासंबंधी आवश्यकता पूर्ण करणे, आणि (२) सर्वसामान्य कॉर्पोरेट कामे 

 ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड  हे या ऑफरचे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स व बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.          

 वर वापरण्यात आलेल्या सर्व भांडवलीकृत संज्ञा आणि ज्यांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही अशा संज्ञा, यांचा अर्थ कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, एर्नाकुलम यांच्याकडे ९ मार्च २०२१ रोजी सादर केलेल्या  रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. 

 

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App